India vs New Zealand Warm-Up Match Highlights Score Updates: टी२० विश्वचषक २०२२ मध्ये आज टीम इंडियाचा न्यूझीलंडबरोबर दुसरा सराव सामना होणार होता पण धुव्वाधार पावसामुळे सामना होऊ शकला नाही. ब्रिस्बेनमध्ये नाणेफेकही न होता सामना रद्द करण्यात आला. भारत-न्यूझीलंड सामन्याआधी पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील सराव सामना त्याच मैदानावर सुरु असताना अचानक पावसाला सुरुवात झाली आणि सामना मध्येच थांबविण्यात आला. पाऊस खूप वेळ सुरु असण्याने शेवटी तो ही सामना रद्द करण्यात आला. तेव्हापासून जो पाऊस सुरु झाला तो अजूनही सुरूच होता. त्यामुळे दोन्ही संघांनी एकत्र येत सर्वसंमतीने सामना रद्द करण्यात आला. त्याआधी पाकिस्तान आणि अफगाणिस्तान सामन्यात अफगाणिस्तानची फलंदाजी करून झाली होती.
पहिल्या सराव सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा ६ धावांनी पराभव केला होता, त्यामुळे येथे टीम इंडियाला इतर प्रयोग करण्याची संधी होती पण पावसामुळे ती संधी हुकली. कारण यानंतर आता टी२० विश्वचषकाची खऱ्या परीक्षेला सुरुवात होणार आहे. २३ ऑक्टोबरला भारत वि पाकिस्तान सामन्याने टीम इंडियाची सुरुवात होणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिला सराव सामना जिंकल्यानंतर भारताला आज दुसरा सराव सामना न्यूझीलंडसोबत खेळायचा आहे पण तो पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. पहिल्या सामन्यात केएल राहुल, सूर्यकुमार यादव आणि नंतर शेवटच्या षटकात मोहम्मद शमीचा चमत्कार पाहायला मिळाला. आता न्यूझीलंडविरुद्ध, टीम इंडियाला रोहित शर्मा, विराट कोहली, भुवनेश्वर कुमार यांसारख्या मोठ्या खेळाडूंना चांगले प्रदर्शन करून दाखवण्याची ही शेवटची संधी होती पण त्यावर पावसाने विरजण टाकले.
यजमान ऑस्ट्रेलियाप्रमाणेच न्यूझीलंड देखील एक बलाढ्य संघ आहे आणि स्पर्धेचे विजेतेपद जिंकण्यासाठी प्रमुख दावेदार देखील. अशात भारताला त्यांच्याविरुद्ध खेळल्यानंतर स्वतःची गुणवत्ता समजवून घेण्याची चांगली संधी होती मात्र ती संधी पावसाने हिरावून घेतली. आता थेट २३ तारखेला टीम इंडिया पाकिस्तानशी भिडणार आहे.
India vs New Zealand T20 WC 2022 Warm-Up Match Highlights: भारत विरुद्ध न्यूझीलंड टी२० विश्वचषक सराव सामना हायलाईट्स
नाणेफेकही न होता भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. बीसीसीआयने ट्विटर ट्विट करत माहिती दिली.
https://twitter.com/BCCI/status/1582651522613383168?s=20&t=ht-4hYCRbjgy1LMcuoLTVQ
ब्रिस्बेनमध्ये सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. अशा परिस्थितीत सामना वेळेवर सुरू होईल अशी शक्यता फार कमी आहे. सध्या संपूर्ण मैदानावर कव्हर झाकले असून तरी दोन्ही संघांचे खेळाडू स्टेडियममध्ये पोहोचले आहेत.
ब्रिस्बेनमध्ये पाऊस सुरु असून नाणेफेकीस विलंब होणार आहे. भारत-न्यूझीलंड सामन्याआधी पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील सराव सामना त्याच मैदानावर सुरु असताना अचानक पावसाला सुरुवात झाली आणि सामना मध्येच रद्द करण्यात आला. अफगाणिस्तानची फलंदाजी करून झाली होती.
भारततीय वेळेनुसार दुपारी १.३० वाजता भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी२० सराव सामना सुरू होईल. या सामन्याची नाणेफेक दुपारी एक वाजता केली जाईल.
भारत आणि न्यूझीलंड सराव सामना हा ब्रिस्बेनच्या गाबा स्टेडियमवर होणार असून या मैदानाची खेळपट्टी ही फलंदाजीला साथ देणारी आहे.
India vs New Zealand T20 WC 2022 Warm-Up Match Highlights: भारत विरुद्ध न्यूझीलंड टी२० विश्वचषक सराव सामनाहायलाईट्स
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील दुसरा सराव सामना पावसामुळे रद्द करण्यात आला.