India vs Pakistan T20 World Cup Ticket Price: टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारत पाकिस्तान सामन्याची क्रीडाप्रेमी मोठ्या उत्साहाने वाट पाहात आहे. पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या या संघाचे चाहते या सामन्यासाठी आतुर आहेत. टी-20 वर्ल्डकप २०२४ चा सर्वात मोठा सामना आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळला जाणार आहे. भारतीय संघ आपला पहिला सामना जिंकून येथे पोहोचला आहे, तर पाकिस्तानला आपल्या पहिल्या सामन्यात अमेरिकेविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. आज दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघ न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी इंटरनॅशनल स्टेडियमवर आमनेसामने येतील. दरम्यान भारत-पाकिस्तान सामन्यातील एका तिकिटाची किंमत ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. या सामन्याचे तिकीट मुंबईतील एखाद्या फ्लॅटपेक्षाही महाग झाले आहे.
भारत-पाकिस्तान सामन्यातील एका तिकीटाची किंमत काय ?
न्यूयॉर्कमधील नसाउ इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे. या मैदानाची क्षमता जवळपास ३४,००० आहे. या स्टेडियममध्ये एक सीट २५२ सेक्सनमध्ये 20व्या रांगेत आहे. ३० क्रमांकाचे हे सीट आहे. या सीटची किंमत १७४,४०० US डॉलर म्हणजेच अंदाजे १.४६ कोटी रुपये आहे.साधारणत: मुंबई, पुण्यातील लग्झरी फ्लॅट इतका महाग असतो. परंतु भारत-पाकिस्तान मॅचचा असा जोश आहे की एका सीटची किंमत कोटींवर पोहोचली आहे. मात्र, ही किंमत आयसीसीची नाही. खरं तर, Stubhub पपवरील आहे. या ठिकाणी तिकिटांची पुनर्विक्री केली जाते. अमेरिकेमध्ये ही विक्री पूर्णपणे कायदेशीर आहे. या सीटची किंमत १.४६ कोटी रुपये आहे. या तिकिटासाठी बोली लावली जाऊ शकते. परंतु एका तिकिटाची इतकी किंमत ठेवणे आश्चर्यकारक आहे.
भारत-पाक सामन्याचे तिकीट कसे खरेदी करावे
१. या सामन्याचे सर्वात स्वस्त तिकीट ६६ हजार रुपयांपेक्षा जास्त असल्याचे सांगण्यात येत आहे.
२. भारत आणि पाकिस्तान सामन्याची तिकिटे खरेदी करण्यासाठी, तुम्हाला T20 वर्ल्ड कपच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
३. वेबसाइट विंडो उघडल्यानंतर आणि तिकीट बुकिंग पर्यायावर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला स्थान निवडावे लागेल. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना नासाऊ क्रिकेट स्टेडियममध्ये होणार असल्याने तुम्हाला या स्टेडियमच्या नावावर क्लिक करावे लागेल.
हेही वाचा >> Ind vs Pak: “आझम खान आज पाकिस्तानला खाऊन टाकणार” क्रिकेट फॅन्स घेतायेत फिरकी; मीम्स पाहून पोट धरुन हसाल
४. ठिकाण निवडल्यानंतर भारत-पाकिस्तान सामना निवडा. तिकिटांची संख्या सेट केल्यानंतर, तुम्हाला पेमेंट पर्यायावर क्लिक करावे लागेल. ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, तुम्हाला ई-मेलद्वारे तिकिटे मिळतील.