T20 World Cup 2024, IND vs SA Final: भारताने १७ वर्षानंतर दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकला आहे. बार्बाडोस येथे खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने रोमहर्षक सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव केला. या सामन्यात सूर्यकुमार यादवने डेव्हिड मिलरचा घेतलेला उत्कृष्ट झेल निर्णायक ठरला. तत्पूर्वी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकांत ७ गडी गमावून १७६ धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेला २० षटकांत आठ गडी गमावून १६९ धावा करता आल्या. या विजयासह भारताचा ११ वर्षांचा आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपला. भारताने यापूर्वी २०१३ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. त्याचबरोबर भारताने १७ वर्षांनंतर टी-२० विश्वचषक जिंकला आहे. त्याचबरोबर २०११ साली भारताने एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता.
ICC T20 World Cup 2024, India vs South Africa Final Highlights : टी-२० क्रिकेटमध्ये भारताचा दक्षिण आफ्रिकेवर वरचष्मा राहिला आहे. या दोघांमध्ये एकूण २६ सामने खेळले गेले आहेत. यापैकी भारताने १४ आणि आफ्रिकेने ११ सामने जिंकले आहेत. त्याचवेळी एक सामना अनिर्णित राहिला. टी-२० विश्वचषकातही भारताचे दक्षिण आफ्रिकेवर वर्चस्व आहे. दोन्ही संघ ७ वेळा आमनेसामने आले आहेत, ज्यात भारताने पाच सामने जिंकले आहेत तर दक्षिण आफ्रिकेने दोन सामने जिंकले आहेत.
भारताने १७ वर्षानंतर दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकला आहे. बार्बाडोस येथे खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने रोमहर्षक सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकांत ७गडी गमावून १७६ धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेच्या संघाला २० षटकांत आठ गडी गमावून १६९ धावा करता आल्या.
https://twitter.com/PINTUJANGID900/status/1807114017468813607
बार्बाडोस येथे खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने रोमहर्षक सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव केला. या सामन्यात सूर्यकुमार यादवने डेव्हिड मिलरचा घेतलेला उत्कृष्ट झेल निर्णायक ठरला. या विजयासह भारताचा ११ वर्षांचा आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपला. भारताने यापूर्वी २०१३ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. त्याचबरोबर भारताने १७ वर्षांनंतर टी-२० विश्वचषक जिंकला आहे. त्याचबरोबर २०११ साली भारताने एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता.
https://twitter.com/JAISALKUMAR97/status/1807114738780016760
भारताने १७ व्या षटकात सामन्याचे चित्र फिरवले. १६ षटकांत दक्षिण आफ्रिकेने चार गड्यांच्या मोबदल्यात १५१ धावा केल्या होत्या. त्यानंतर मिलर आणि क्लासेन क्रीजवर होते. दक्षिण आफ्रिकेला शेवटच्या २४ चेंडूत २६ धावांची गरज होती. यानंतर १७ व्या षटकात हार्दिकने क्लासेनला बाद करत केवळ चार धावा दिल्या. १८ व्या षटकात बुमराहने यानसेनला बाद करत दोन धावा दिल्या. अर्शदीपने १९व्या षटकात चार धावा दिल्या. दक्षिण आफ्रिकेला शेवटच्या षटकात १६ धावांची गरज होती. हार्दिकने पहिल्याच चेंडूवर मिलरला बाद केले. दुसऱ्या चेंडूवर रबाडाने चार धावा केल्या. रबाडाने तिसऱ्या चेंडूवर एक धाव घेतली. महाराजने चौथ्या चेंडूवर एक धाव घेतली. त्याचा पुढचा चेंडू वाईड होता. हार्दिकने पाचव्या चेंडूवर रबाडाला बाद केले. शेवटच्या चेंडूवर एक धाव आली आणि भारताने सात धावांनी विजय मिळवला.
बुमराहने जॅनसेनला पॅव्हेलियनमध्ये पाठवले
जसप्रीत बुमराहने 18 व्या षटकात दक्षिण आफ्रिकेला सहावा धक्का दिला. मार्को जॅनसेनला चार चेंडूत दोन धावा करून बाद झाला. भारताने जोरदार पुनरागमन केले आहे. मात्र, दुसऱ्या टोकाला डेव्हिड मिलर उपस्थित आहे.
हार्दिक पंड्याने हेनरिच क्लासेनला पॅव्हेलियन पाठवले
हार्दिक पांड्याने 17व्या षटकात हेनरिच क्लासेनला बाद करून भारताच्या आशा उंचावल्या आहेत. क्लासेन 27 चेंडूत 52 धावा करून बाद झाला. आफ्रिकेला 23 चेंडूत विजयासाठी 25 धावांची गरज आहे. भारतासाठी अडचण अशी आहे की बुमराहकडे फक्त एक ओव्हर शिल्लक आहे.
16 षटकांनंतर दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या 4 गड्यांच्या मोबदल्यात 151 धावा आहे. जसप्रीत बुमराहने फक्त चार धावा देत एक ओव्हर टाकला. हेनरिक क्लासेन 26 चेंडूत 52 धावांवर तर डेव्हिड मिलर 9 चेंडूत १५ धावांवर खेळत आहे. सामना आता पूर्णपणे दक्षिण आफ्रिकेच्या हातात आहे. आफ्रिकेला विजयासाठी 24 चेंडूत फक्त 26 धावा करायच्या आहेत.
डी कॉक पॅव्हेलियनमध्ये परतला
सामना दक्षिण आफ्रिकेकडे वळला असताना अर्शदीप सिंगने भारताचे पुनरागमन केले. अर्शदीपने डी कॉकला झेलबाद केले. तो 31 चेंडूत 39 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. 13 षटकांनंतर दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या 4 विकेटवर 109 धावा आहे. आता त्यांना विजयासाठी 42 चेंडूत 68 धावा करायच्या आहेत.
दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या शंभरी पार
12 षटकांनंतर दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या 3 विकेटवर 101 धावा आहे. क्विंटन डी कॉक 29 चेंडूंत 3 चौकार आणि 1 षटकारासह 35 धावांवर खेळत आहे. तर हेनरिक क्लासेन 13 चेंडूत 23 धावांवर खेळत आहे. त्याने 3 षटकार मारले आहेत. हा सामना आता भारताच्या पकडीतून निसटला आहे. दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 48 चेंडूत 76 धावा करायच्या आहेत.
दक्षिण आफ्रिकेची तिसरी विकेट पडली
दक्षिण आफ्रिकेची तिसरी विकेट 9व्या षटकात 70 धावांवर पडली. ट्रस्टन स्टब्स 21 चेंडूत 31 धावा करून बाद झाला. अक्षर पटेलने त्याला बोल्ड केले. स्टब्सने 3 चौकार आणि 1 षटकार मारला.
https://twitter.com/SportEccentric/status/1807097553592500482
डी कॉकने कुलदीपच्या षटकात ठोकला गगनचुंबी षटकार
कुलदीप यादवने आठवे षटक टाकले. या षटकात एकूण 13 धावा आल्या. डी कॉकने कुलदीप यादववर गगनचुंबी षटकार ठोकला. 8 षटकांनंतर दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या दोन गड्यांच्या मोबदल्यात 62 धावा आहे. क्विंटन डी कॉक 21 चेंडूंत 3 चौकार आणि 1 षटकारासह 28 धावांवर खेळत आहे. तर ट्रस्टन स्टब्स 17 चेंडूत 3 चौकारांसह 24 धावांवर खेळत आहे. दक्षिण आफ्रिकेला 72 चेंडूत 115 धावा करायच्या आहेत.
7 षटकांनंतर दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या दोन गड्यांच्या मोबदल्यात 49 धावा आहे. अक्षर पटेलने सातवे षटक टाकले. यामध्ये एका चौकारासह सात धावा आल्या. क्विंटन डी कॉक 18 चेंडूत 3 चौकारांसह 21 धावांवर खेळत आहे. तर ट्रस्टन स्टब्स १४ चेंडूंत दोन चौकारांसह १८ धावांवर खेळत आहे. दक्षिण आफ्रिकेला 78 चेंडूत 128 धावा करायच्या आहेत.
अक्षर पटेलने त्याच्या षटकात 10 धावा दिल्या.
अक्षर पटेलने पाचवे षटक टाकले. या षटकात एक चौकार स्टब्सने तर एक चौकार डी कॉकने मारला. 5 षटकांनंतर दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या दोन गड्यांच्या मोबदल्यात 32 धावा आहे. क्विंटन डी कॉक 12 चेंडूत 2 चौकारांसह 15 धावांवर खेळत आहे. तर ट्रस्टन स्टब्स आठ चेंडूत एक चौकारासह सात धावांवर खेळत आहे. दक्षिण आफ्रिकेला 90 चेंडूत 145 धावा करायच्या आहेत.
अर्शदीपने दिला दुसरा धक्का
वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने तिसऱ्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर कर्णधार एडन मार्करमला बाद केले. त्याला केवळ चार धावा करता आल्या. ट्रिस्टन स्टब्स चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे. त्याला साथ देण्यासाठी क्विंटन डी कॉक क्रीजवर उपस्थित आहे.
बुमराहने द. आफ्रिकेला पहिला धक्का
बुमराहने द. आफ्रिकेला पहिला धक्का सात धावांच्या स्कोअरवर दिला. त्याने डावाच्या दुसऱ्याच षटकात रीझा हेंड्रिक्सला बोल्ड केले. त्याला केवळ चार धावा करता आल्या. कर्णधार एडन मार्कराम तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे. त्याला साथ देण्यासाठी क्विंटन डी कॉक क्रीजवर उपस्थित आहे. दोन षटकांनंतर संघाची धावसंख्या 11/1 आहे.
https://twitter.com/jitendraknit26/status/1807090921382810076
टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 7 विकेट्स गमावत 176 धावा केल्या. भारताकडून विराट कोहलीने 59 चेंडूत 76 धावा केल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 6 चौकार आणि 2 षटकार आले. तर अक्षर पटेलने 31 चेंडूत 1 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 47 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. शिवम दुबेही शेवटी चमकला. त्याने 16 चेंडूत 3 चौकार आणि 1 षटकारासह 27 धावांची खेळी खेळली. दक्षिण आफ्रिकेकडून ॲनरिक नॉर्किया आणि केशव महाराज यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
विराट कोहली 59 चेंडूत 76 धावा करून बाद झाला
19व्या षटकात विराट कोहलीने मार्को यानसेनचा त्रिफळा उडवला. पहिल्या चेंडूवर तो बाद झाला असला तरी यान्सेनने नो-बॉल केला. त्यानंतर विराटने एक चौकार, एक दुहेरी आणि एक षटकार मारला. मात्र, पाचव्या चेंडूवर कोहली बाद झाला. विराटने 59 चेंडूत 76धावा केल्या.
https://twitter.com/hasimkhan7976/status/1807079791687864556
विराट कोहलीने अर्धशतक झळकावले
विराट कोहलीने 48 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने 50 धावा पूर्ण केल्या आहेत. किंग कोहलीचे या विश्वचषकातील हे पहिले अर्धशतक आहे. 17 षटकांत भारताची धावसंख्या 4 विकेटवर 134 धावा. शिवम दुबे 12 चेंडूत 21 धावांवर खेळत आहे. त्याने दोन चौकार आणि एक षटकार मारला आहे.
16 षटकांनंतर टीम इंडियाची धावसंख्या 4 विकेटवर 126 धावा आहे. शिवम दुबे कर्णधार रोहितच्या भरवशावर आहे. त्याने 9 चेंडूत 1 चौकार आणि 1 षटकारासह 15 धावा केल्या आहेत. तर किंग कोहली 45 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने 48 धावांवर खेळत आहे.
भारताला चौथा धक्का बसला
अक्षर पटेलच्या रूपाने भारताला चौथा धक्का बसला. 14व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर तो क्विंटन डी कॉकने धावबाद झाला. त्याला 31 चेंडूत 47 धावा करता आल्या. शिवम दुबे सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे. त्याला साथ देण्यासाठी विराट कोहली (44) क्रीझवर उपस्थित आहे. 14 ओव्हरनंतर स्कोअर 108/4 आहे.
https://twitter.com/Rameshyadav799/status/1807076343244378163
पॉवरप्लेमध्ये तीन विकेट्स गमावणाऱ्या भारतीय संघाला आता विराट कोहली आणि अक्षर पटेल यांची साथ आहे. दोघांनीही दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जबाबदारी स्वीकारली आहे. दोन्ही फलंदाज जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहेत. 12 षटकांनंतर संघाची धावसंख्या 93/3 आहे. कोहलीने 41 तर पटेलने 38 धावा केल्या आहेत.
10 षटकांनंतर टीम इंडियाची धावसंख्या 3 विकेटवर 75 धावा आहे. किंग कोहली अतिशय जबाबदारीने खेळत आहे. तो 29 चेंडूंत 4 चौकारांच्या मदतीने 36 धावांवर खेळत आहे. तर अक्षर पटेल 20 चेंडूत 1 चौकार आणि 2 षटकारांसह 26 धावांवर खेळत आहे. दोघांमध्ये 33 चेंडूत 41 धावांची भागीदारी आहे.
अक्षर पटेलने मार्करमच्या षटकात ठोकला षटकार
अक्षर पटेलने आठव्या षटकात एडन मार्करमच्या षटकात शानदार षटकार ठोकला. या षटकात एकूण 10 धावा आल्या. 8 षटकांनंतर टीम इंडियाची धावसंख्या 3 विकेटवर 59 धावा आहे. विराट कोहली 24 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने 29 धावांवर खेळत आहे. तर अक्षर पटेल 13 चेंडूत 1 चौकार आणि 1 षटकारासह 18 धावांवर खेळत आहे. दोघांमध्ये 21 चेंडूत 25 धावांची भागीदारी आहे.
https://twitter.com/Drstrangefooty/status/1807068670230680053
7 षटकांनंतर टीम इंडियाची धावसंख्या 3 विकेटवर 49 धावा आहे. विराट कोहली 22 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने 27 धावांवर खेळत आहे. यासह अक्षर पटेल 9 चेंडूत 1 चौकारासह 10 धावांवर खेळत आहे.
https://twitter.com/devanshu20_07/status/1807067855029989853
टी-२० वर्ल्डकपमध्ये पहिल्यांदाच भारताने पॉवरप्लेमध्ये 3 विकेट्स गमावल्या
पॉवरप्ले दक्षिण आफ्रिकेच्या नावावर राहिला. भारताने पहिल्या 6 षटकात तीन विकेट गमावल्या. विशेष म्हणजे टी-२० वर्ल्डकपमध्ये पहिल्यांदाच भारताने पॉवरप्लेमध्ये ३ विकेट गमावल्या आहेत.6 षटकांनंतर टीम इंडियाची धावसंख्या 3 विकेट्सवर 45 धावा आहे. विराट कोहली 19 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने 25 धावांवर खेळत आहे. यासह अक्षर पटेल सहा चेंडूत एका चौकारासह आठ धावांवर खेळत आहे.
रोहित शर्मा- 9(5)
ऋषभ पंत - 0(2)
सूर्यकुमार यादव - 3(4)
सूर्यकुमारही पॅव्हेलियनमध्ये परतला
भारताला 34 धावांवर तिसरा धक्का बसला. पाचव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर कागिसो रबाडाने त्याला हेनरिक क्लासेनकरवी झेलबाद केले. त्याला केवळ तीन धावा करता आल्या. अक्षर पटेल पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे. त्याला साथ देण्यासाठी विराट कोहली (22) क्रीजवर उपस्थित आहे. पाच षटकांनंतर संघाची धावसंख्या 40/3 आहे.
पंत खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला
केशव महाराजांनीही भारताला दुसरा धक्का दिला. त्याने दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर ऋषभ पंतला क्विंटन डी कॉककरवी झेलबाद केले. सूर्यकुमार यादव चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे. त्याला साथ देण्यासाठी विराट कोहली क्रीजवर उपस्थित आहे. दोन षटकांनंतर स्कोअर 23/2 आहे.
https://twitter.com/lostCelesital/status/1807062832111853915
भारताला पहिला धक्का 23 धावांवर बसला. केशव महाराजने दुसऱ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर रोहित शर्माला हेन्रिक क्लासेनकरवी झेलबाद केले. तो 5 चेंडूत 9 धावा काढून बाद झाला
रोहित शर्मा आणि विराट कोहलीने दोन षटकांत चांगली फटकेबाजी करत चौकारांचा पाऊस पाडला आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील अंतिम सामन्याला सुरूवात झाली आहे. भारताकडून सलामी जोडी रोहित शर्मा आणि विराट कोहली मैदानात आहेत. तर आफ्रिकेकडून यान्सनने गोलंदाजीला सुरूवात केली आहे. यासह विराटने सामन्यातील पहिल्या दोन चेंडूवर चौकार लगावले आहेत.
अंतिम सामन्यापूर्वीच्या राष्ट्रगीतासाठी दोन्ही संघ मैदानात आले आहेत. भारताचं राष्ट्रगीत पहिल्यांदा गायलं जात आहे. दोन्ही संघ सारख्याच प्लेईंग इलेव्हनसह खेळत असून लक्ष वेधून घेणारी बाब म्हणजे दोन्ही संघांमध्ये मिळून पाच डावखुरे फिरकीपटू खेळत आहेत.
पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह.
https://twitter.com/mr_chaturvedi9/status/1807053221523026178
दक्षिण आफ्रिका: क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), रीझा हेंड्रिक्स, एडन मार्कराम (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, हेनरिच क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, ॲनरिक नॉर्खिया, तबरेझ शम्सी.
भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला
अंतिम सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही.