T20 World Cup 2024, IND vs SA Final: भारताने १७ वर्षानंतर दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकला आहे. बार्बाडोस येथे खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने रोमहर्षक सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव केला. या सामन्यात सूर्यकुमार यादवने डेव्हिड मिलरचा घेतलेला उत्कृष्ट झेल निर्णायक ठरला. तत्पूर्वी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकांत ७ गडी गमावून १७६ धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेला २० षटकांत आठ गडी गमावून १६९ धावा करता आल्या. या विजयासह भारताचा ११ वर्षांचा आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपला. भारताने यापूर्वी २०१३ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. त्याचबरोबर भारताने १७ वर्षांनंतर टी-२० विश्वचषक जिंकला आहे. त्याचबरोबर २०११ साली भारताने एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

ICC T20 World Cup 2024, India vs South Africa Final Highlights : टी-२० क्रिकेटमध्ये भारताचा दक्षिण आफ्रिकेवर वरचष्मा राहिला आहे. या दोघांमध्ये एकूण २६ सामने खेळले गेले आहेत. यापैकी भारताने १४ आणि आफ्रिकेने ११ सामने जिंकले आहेत. त्याचवेळी एक सामना अनिर्णित राहिला. टी-२० विश्वचषकातही भारताचे दक्षिण आफ्रिकेवर वर्चस्व आहे. दोन्ही संघ ७ वेळा आमनेसामने आले आहेत, ज्यात भारताने पाच सामने जिंकले आहेत तर दक्षिण आफ्रिकेने दोन सामने जिंकले आहेत.

19:19 (IST) 29 Jun 2024
IND vs SA Final : टीम इंडिया बार्बाडोसमध्ये दाखल

भारतीय संघ बार्बाडोसला पोहोचला

भारत आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ अंतिम सामन्यासाठी स्टेडियमवर पोहोचले आहेत. बार्बाडोसमधील हवामान स्वच्छ दिसते. ही चाहत्यांसाठी आनंदाची बाब आहे. अशा स्थितीत नाणेफेक वेळेवर होणे अपेक्षित आहे.

18:44 (IST) 29 Jun 2024
IND vs SA Final : इथे भारताचा वरचष्मा का आहे?

इथे भारताचा वरचष्मा का आहे?

सध्याच्या विश्वचषकात भारतीय संघ बार्बाडोसमध्ये एक सामना खेळला आहे. तो येथे जिंकला होता. त्याचबरोबर या स्पर्धेत बार्बाडोसमध्ये खेळण्याची दक्षिण आफ्रिकेच्या संघाची ही पहिलीच वेळ असेल. अशा परिस्थितीत त्यांना परिस्थितीनुसार स्वत:ला जुळवून घेण्याचे आव्हान असेल. त्याचबरोबर भारताला आपल्या भूतकाळातील अनुभवाचा फायदा मिळू शकतो. टी-२० विश्वचषक सामन्यांबद्दल बोलायचे झाले तर दोन्ही संघ आतापर्यंत सहा वेळा आमनेसामने आले आहेत. यापैकी चार वेळा भारताने बाजी मारली आहे. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेला दोनदा विजय मिळवण्यात यश आले आहे. या बाबतीतही भारताचा वरचष्मा आहे.

18:13 (IST) 29 Jun 2024
IND vs SA Final : दक्षिण आफ्रिका संघाची कमजोरी काय?

दक्षिण आफ्रिका संघाची कमजोरी

हेन्रिच क्लासेनच्या बॅटने अद्याप आयपीएलमध्ये जशी बॅटिंग केली होती, तशी बॅटिंग स्पर्धेत झालेली नाही. क्लासेनने ८ सामन्यात ११२ च्या स्ट्राईक रेटने १३८ धावा केल्या आहेत. कर्णधार मार्करमलाही आतापर्यंत फलंदाजीत छाप पाडता आलेली नाही. त्याला अंतिम फेरीत जबाबदारी स्वीकारावी लागणार आहे. तसेच अनुभवी डेव्हिड मिलरने केवळ एक अर्धशतक झळकावले आहे. सुपर-८ मध्ये त्याने ०, ४३, ४ धावांची इनिंग खेळली होती.

17:52 (IST) 29 Jun 2024
IND vs SA Final : टीम इंडियाच कमजोरी काय?

टीम इंडियाची कमजोरी

विराट कोहली सलामीवीर म्हणून न चालणे ही चिंतेची बाब आहे. आतापर्यंत त्याने १०.७१ च्या सरासरीने केवळ ७५ धावा केल्या आहेत. विराट कोहली लवकर बाद झाल्यानंतर ऋषभ पंतने मोठी खेळी साकारलेली नाही. मात्र त्याने सात सामन्यांत १२९ च्या स्ट्राईक रेटने १७१ धावा केल्या आहेत. शिवम दुबेला आतापर्यंत त्याची निवड सार्थ ठरवता आलेली नाही. उपांत्य फेरीतही तो पहिल्याच चेंडूवर बाद झाला होता.

17:28 (IST) 29 Jun 2024
IND vs SA Final : केन्सिंग्टन ओव्हल खेळपट्टी अहवाल काय आहे?

केन्सिंग्टन ओव्हल खेळपट्टी अहवाल

टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये केन्सिंग्टन ओव्हलवर वेगवान गोलंदाजांनी सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. २०.२२ च्या सरासरीने आणि ७.८८ च्या इकॉनॉमी रेटने ५९बळी घेतले आहेत. त्याचबरोबर या खेळपट्टीवर २०० च्या वर स्कोअर एकदाच केला गेला आहे. भारतीय संघ येथे एक सामना खेळला आहे. भारताने अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात १८१ धावा केल्या होत्या. जो सामना भारतानी ४७ धावांनी जिंकला होता. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने येथे एकही सामना खेळलेला नाही.

17:03 (IST) 29 Jun 2024
IND vs SA Final : बार्बाडोसमध्ये हवामान कसे असेल?

बार्बाडोसमध्ये हवामान कसे असेल?

Weather.com नुसार, पावसाचा अंदाज ७०% आहे आणि स्थानिक वेळेनुसार सकाळी १०:३० वाजता (भारतीय वेळेनुसार रात्री ८:००वाजता), सामना सुरू होण्याच्या वेळेस पावसाची ६६% शक्यता आहे. याशिवाय संध्याकाळीही हवामानाचा अंदाज असाच आहे. स्थानिक वेळेनुसार दुपारी ४:०० वाजता (भारतीय वेळेनुसार १:३० वाजता) पावसाची ५०% शक्यता आहे. त्यामुळे, पूर्ण सामना होण्याची शक्यता खूपच कमी दिसते. त्यामुळे सामना रविवारी (२९ जून) राखीव दिवशी सकाळी १०:३० वाजता (स्थानिक वेळेनुसार) सुरू होण्याची शक्यता आहे.

16:50 (IST) 29 Jun 2024
IND vs SA Final : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका हेड टू हेड रेकॉर्ड

टी-२० क्रिकेटमध्ये भारताचा दक्षिण आफ्रिकेवर वरचष्मा राहिला आहे. या दोघांमध्ये एकूण २६ सामने खेळले गेले आहेत. यापैकी भारताने १४ आणि आफ्रिकेने ११ सामने जिंकले आहेत. त्याचवेळी एक सामना अनिर्णित राहिला. टी-२० विश्वचषकातही भारताचे दक्षिण आफ्रिकेवर वर्चस्व आहे. दोन्ही संघ ६ वेळा आमनेसामने आले आहेत, ज्यात भारताने चार सामने जिंकले आहेत तर दक्षिण आफ्रिकेने दोन सामने जिंकले आहेत.

IND vs SA Highlights , T20 World Cup Final 2024 :टीम इंडियाने २०२४ च्या टी-२० वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव केला आहे. भारतीय संघाने १७ वर्षांनंतर टी-२० विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले आहे. दक्षिण आफ्रिका संघाला १७७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना १६९ धावाच करता आल्या.