T20 World Cup 2022, IND vs SA Highlights Score Updates: टी२० विश्वचषक २०२२ मधील हा ३० वा सामना असून पर्थ येथे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला गेला आणि दक्षिण आफ्रिकेने तो सामना पाच गडी राखून जिंकला. या विजयाने आफ्रिका संघ उपांत्य फेरीच्या एक पाऊल अजून जवळ गेला आहे. एडन मार्कराम आणि डेव्हिड मिलरच्या दमदार भागीदारीने भारताला विजयापासून लांब नेले. सुर्यकुमार यादवची ६८ धावांची खेळी व्यर्थ गेली. लुंगी एनगिडीला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
टीम इंडियाने पहिल्या दहा षटकात शानदार गोलंदाजी केली. डावखुरा गोलंदाज अर्शदीप सिंगने दोन गडी झटपट बाद करत दक्षिण आफ्रिका संघाला अडचणीत आणले. पण त्यानंतर डेव्हिड मिलर आणि एडन मार्कराम यांनी शानदार अर्धशतके झळकावत दक्षिण आफ्रिकेला विजयाचा उंबरठ्यावर नेले.खराब चेंडूंचा समाचार घेत त्यांनी संघाला विजयाच्या जवळ नेले. यादरम्यान दोघांना टीम इंडियाने गचाळ क्षेत्ररक्षण करत दोन जीवदान देखील दिले. चौथ्या गड्यासाठी ७६ धावांची भागीदारी केल्यानंतर मार्करम ५२ धावा करत बाद झाला. डेव्हिड मिलरने ४६ चेंडूत ५९ धावा करत नाबाद राहिला.
भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर १३४ धावांचे लक्ष्य ठेवले होते. कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि टीम इंडियाने २० षटकांत ९ गडी गमावून १३३ धावा केल्या. भारताची सुरुवात खूपच खराब झाली. टीम इंडियाला २३ धावांवर पहिला धक्का बसला. कर्णधार रोहित शर्मा १४ चेंडूत १५ धावा करून बाद झाला. त्यानंतर विकेट्सची झुंबड उडाली. केएल राहुल ९ धावा तर विराट कोहली १२ धावा काढून बाद झाला. तिघांनाही लुंगी एनगिडीने तंबूत पाठवले. यानंतर अक्षर पटेलच्या जागी संघात समाविष्ट करण्यात आलेला दीपक हुडाही अपयशी ठरला. त्याला खातेही उघडता आले नाही. हुडाला नॉर्टजेने यष्टिरक्षक डी कॉकच्या हाती झेलबाद केले. त्यानंतर हार्दिक पंड्या दोन धावा करून बाद झाला. एनगिडीने हार्दिकला तंबूत पाठवले.
४९ धावांवर पाच विकेट पडल्यानंतर सूर्यकुमार यादवने दिनेश कार्तिकसह टीम इंडियाचा डाव सावरला. दोघांनी सहाव्या विकेटसाठी ४० चेंडूत ५२ धावांची भागीदारी केली. सूर्यकुमारने ३० चेंडूंमध्ये टी२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ११वे अर्धशतक ठोकले. या दोघांनी मिळून भारताला १०० धावांच्या पुढे नेले. कार्तिक १६व्या षटकात वेन पारनेलकरवी झेलबाद झाला. त्याचा झेल रिले रुसोने घेतला. कार्तिकला १५ चेंडूत केवळ सहा धावा करता आल्या.
India vs South Africa T20 World Cup 2022 Highlights Updates: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी२० विश्वचषक सामना हायलाइट्स
दक्षिण आफ्रिकेचा भारतावर पाच गडी राखून विजय झाला.
दक्षिण आफ्रिका १३७-५
दक्षिण आफ्रिकेला ५ चेंडूत ६ धावांची गरज आहे
दक्षिण आफ्रिका १२८-५
दक्षिण आफ्रिकेचा डावखुरा फलंदाज डेव्हिड मिलरचे अर्धशतक पूर्ण झाले.
दक्षिण आफ्रिका १२६-५
आर. अश्विनने षटकातील शेवटच्या चेंडूवर माकंडिंगचा प्रयत्न केला.
दक्षिण आफ्रिका १२२-५
आर. अश्विनने ट्रिस्टन जॅन्सेन स्टब्सला बाद केले. त्याने ६ धावा केल्या.
दक्षिण आफ्रिका १२२-५
हार्दिक पांड्याने भागीदारी तोडत एडन मार्करामला बाद केले. त्याने ५२ धावा केल्या.
दक्षिण आफ्रिका १००-४
सामन्यात दिनेश कार्तिकला दुखापत झाली असून तो मैदानाबाहेर गेला आहे. ऋषभ पंतने त्याची जागा घेतली असून तो आता विकेटकीपिंग करणार आहे.
दक्षिण आफ्रिका ९८-३
दक्षिण आफ्रिकेचा जबरदस्त फलंदाज एडन मार्करामने दमदार अर्धशतक झळकावत सामना आफ्रिकेच्या बाजूने झुकवला.
दक्षिण आफ्रिका ९५-३
एडन मार्कराम आणि डेव्हिड मिलर यांच्यात अर्धशतकी भागीदारी झाली असून दक्षिण आफ्रिका आता मजबूत स्थितीत दिसत आहे.
दक्षिण आफ्रिका ८५-३
डेव्हिड मिलर धावबाद होताना वाचला. पुन्हा एकदा रोहित शर्माने थ्रो चुकीचा केला. या सामन्यात दोन धावबाद आणि दोन झेल भारतीय संघाने सोडले.
दक्षिण आफ्रिका ७४-३
आर. अश्विनच्या गोलंदाजीवर विराट कोहलीने एडन मार्करामचा झेल सोडला आता हा झेल टीम इंडियाला किती महागात पडेल हे येणारा काळच ठरवेल.
दक्षिण आफ्रिका ६५-३
दक्षिण आफ्रिकेला पहिल्या दहा षटकात ५० धावा देखील करता आल्या नाहीत.
दक्षिण आफ्रिका ४०-२
हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर एडन मार्कराम धावबाद होताना वाचला. रोहित शर्माने थ्रो केला मात्र तो स्टंप्सला लागला नाही.
दक्षिण आफ्रिका ३९-३
मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर डेव्हिड मिलरच्या बॅटच्या कोपऱ्याला चेंडू लागल्याने तो पायचीत होण्यापासून वाचला आणि भारतीय संघाने एक रिव्ह्यू गमावला.
दक्षिण आफ्रिका ३३-३
पॉवर-प्ले मध्ये दक्षिण आफ्रिकेची अडखळत सुरुवात झाली आहे. अर्शदीप सिंगच्या दोन विकेट्सने भारत या सामन्यात पुन्हा आला आहे. भुवनेश्वर कुमारला जरी विकेट मिळाली नसली तरी त्याने कसून गोलंदाजी केली आहे. शमीने एक गडी बाद करत चांगली साथ दिली.
दक्षिण आफ्रिका २४-३
https://twitter.com/BCCI/status/1586709026586660864?s=20&t=vF2x7T_RHT5nNtnlHhXZPg
कर्णधार टेम्बा बावुमा १० धावा करून बाद झाला. मोहम्मद शमीने त्याला दिनेश कार्तिक करवी झेलबाद केले.
दक्षिण आफ्रिका २४-३
https://twitter.com/BCCI/status/1586708674344636425?s=20&t=vF2x7T_RHT5nNtnlHhXZPg
अर्शदीप सिंगने दक्षिण आफ्रिकेला एकापाठोपाठ दोन धक्के दिले. रिली रोसोव भोपळाही न फोडता बाद झाला.
दक्षिण आफ्रिका ३-२
https://twitter.com/BCCI/status/1586703765532725249?s=20&t=kYje-695pGfKCBLvEdICKQ
क्विंटन डी कॉकला अवघ्या एका धावेवर माघारी धाडत अर्शदीप सिंगने दक्षिण आफ्रिकेला पहिला धक्का दिला.
दक्षिण आफ्रिका ३-१
भारताने दिलेल्या १३४ धावांचा पाठलाग करण्यासाठी आफ्रिकेचे सलामीवीर मैदानात आले.
दक्षिण आफ्रिका ०-०
सुर्यकुमार यादवच्या शानदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियाने १३४ धावांचे आव्हान ठेवले आहे.
भारत १३३-९
मोहम्मद शमी भोपळाही न फोडता धावबाद झाला आहे.
भारत १३०-९
सुर्यकुमार यादवची तुफानी खेळी समाप्त झाली. त्याने ४० चेंडूत ६८ धावांची शानदार खेळी केली.
भारत १२७-८
https://twitter.com/BCCI/status/1586697545807548416?s=20&t=dcj3NtvrowHWGQ_b5qzHpg
आर. आश्विनला वेन पारनेलने बाद केले. त्याने ११ चेंडूत ७ धावा केल्या.
भारत १२४-७
https://twitter.com/BCCI/status/1586696772025475073?s=20&t=dcj3NtvrowHWGQ_b5qzHpg
सुर्यकुमार यादवचा टेनिस फटका! चौकारांची आतिषबाजी करत भारताची धावसंख्या पुढे नेत आहे.
भारत १२४-६
अखेरच्या चार षटकात भारतीय संघाला धावगती वाढवण्याची गरज आहे. किमान १५० धावांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे.
भारत १०६-६
तब्बल १४ चेंडू खेळून काढत अवघ्या ६ धावा केल्या. त्याला वेन पारनेलने बाद केले.
भारत १०१-६
https://twitter.com/BCCI/status/1586693077334466560?s=20&t=UM7CBjPUJUD8UNGAXdde_A
टीम इंडिया अडचणीत असताना सूर्याने शानदार अर्धशतक झळकावले. भारताचे शतक देखील पूर्ण
भारत १००-५
https://twitter.com/BCCI/status/1586692425686601729?s=20&t=H1x_1EgB5ge1dTyHrZVajg
दिनेश कार्तिक स्ट्राइक रेट वाढवने गरजेचे आहे. तो १३ चेंडूत ५ धावांवर खेळत आहे.
भारत ८९-५
सुर्यकुमार यादव आणि दिनेश कार्तिक यांच्यात आतापर्यत ३५ धावांची भागीदारी झाली आहे.
भारत ८४-५
टीम इंडियाला मोठ्या भागीदारीची गरज असून राहुल द्रविडने सुर्यकुमार आणि कार्तिकशी चर्चा केली.
भारत ६७-५
India vs South Africa T20 World Cup 2022 Highlights Updates: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी२० विश्वचषक सामना हायलाइट्स
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात पर्थ येथे खेळला जाणार आहे. हा सामना जो जिंकेल तो उपांत्य फेरी गाठणार आहे. त्यामुळे दोन्ही संघासाठी हा सामना महत्वाचा आहे.