भारताचा माजी जलदगती गोलंदाज इरफान पठाणनने टी-२० विश्वचषक स्पर्धेसंदर्भात एक रोखठोक मत व्यक्त केलं आहे. भारताला आपल्या अंतिम सामन्यामध्ये झिम्बाब्वेला पराभूत करता आलं नाही तर भारतीय संघ उपांत्यफेरीमध्ये खेळण्यासाठी पात्र ठरत नाही असं पठाणने म्हटलं आहे. विशेष म्हणजे हा सामना पराभूत झाल्यास भारताच्या उपांत्यफेरीच्या आशा पूर्णपणे संपणार नसून नेट रन रेटवर अव्वल दोन संघ कोण असतील हे निश्चित होईल. असं असतानाही झिम्बाब्वेविरुद्धचा सामना हरल्यास भारत खरोखरच उपांत्यफेरीत खेळण्यासाठी लायक संघ नाही असं पठाणने म्हटलं आहे.
नक्की वाचा >> Ind vs Zim: शेवटच्या सामन्यात पाऊस पडला तर…; पाकिस्तानपेक्षा कमी नेट रन रेट असल्याने भारत स्पर्धेबाहेर पडणार की…
रविवारी सुपर १२ फेरीमधील भारताचा सामना झिम्बाब्वेविरुद्ध होणार आहे. मेलबर्नलच्या मैदानावर हा सामना खेळवला जाणार असून उपांत्यफेरीत पात्र ठरण्यासाठी भारताला हा सामना जिंकणं महत्त्वाचं आहे. हा सामना जिंकल्यास भारत गट फेरीमध्ये आपलं पहिलं स्थान निश्चित करेल. मात्र याच जवळजवळ करो या मरो स्थितीमधील सामन्याबद्दल बोलताना इरफान पठाणने आपलं स्पष्ट मत मांडलं. स्टार स्फोर्ट्सवरील टॉक शोमध्ये फरफानने हा सामना पराभूत झाल्यास भारत उपांत्यफेरीच्या दर्जाचा संघ नसेल असं म्हटलं आहे.
नक्की वाचा >> विश्लेषण: नेट रन रेटवर पाकिस्तान In की Out ठरणार? पण NRR कॉलमखाली दिसणारा ‘नेट रन रेट’ म्हणजे काय? तो कसा मोजतात?
“तुम्ही जर झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात पराभूत होत असाल तर तुम्ही खरोखरच उपांत्यफेरीमध्ये खेळण्याच्या लायक नाही, असं मला वाटतं. सध्याच्या झिम्बाब्वेच्या संघाची गोलंदाजी उत्तम असली तरी त्यांची फलंदाजी फारशी प्रभावी नाही. त्यामुळे हा सामना मोठ्या फरकाने जिंकला पाहिजे,” असं पठाणने म्हटलं आहे. पठाणने हा सामना भारताने हलक्यात घेता कामा नये असाही सल्ला रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला दिला आहे. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात भारताने निसटता विजय मिळवल्याचा संदर्भ पठाणने हे विधान करताना दिला.
नक्की वाचा >> Ind vs Ban: याला म्हणतात Sportsmanship… भारताच्या विजयानंतर विराट डायनिंग हॉलमध्ये बसलेल्या लिटन दास जवळ गेला अन्…
“बांगलादेशविरुद्धचा सामना आपण पाहिला. तो फारच अटीतटीचा सामना झाला. पाऊस पडला नसता तर सामना बांगलादेशच्या बाजूने फिरला असता आणि ते सामना जिंकलेही असते. त्यामुळे प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे,” असं पठाणने म्हटलं आहे.