T20 World Cup 2024, IND vs SA Final: भारतानं शनिवारी इतिहास घडवत टी २० विश्वचषक पुन्हा एकदा आपल्या नावावर केला. २००७ साली झालेल्या पहिल्या वहिल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं विजय मिळवला होता. त्यानंतर तब्बल १७ वर्षांनी हा विजय भारतीय संघानं खेचून आणला. या विजयामध्ये कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे अशा फलंदाजांसोबतच बुमराह, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल यांच्या गोलंदाजीचीही अमिट छाप उमटली आहे. पण अंतिम सामन्याच्या ‘अंतिम’ पाच षटकांमध्ये घडलेल्या घडामोडींमुळे खऱ्या अर्थानं दक्षिण आफ्रिकेच्या हातून सामना आणि पर्यायाने विश्वचषकही निसटला!

काय घडलं शेवटच्या पाच षटकांमध्ये?

सोळाव्या षटकाला सुरुवात होण्यापूर्वी स्कोअर होता दक्षिण आफ्रिका ४ बाद १४७ धावा. तोपर्यंत दक्षिण आफ्रिकेचा रनरेट होता तब्बल ९.८० आणि त्यांना आवश्यक रनरेट होता फक्त ६, अर्थात उरलेल्या ३० चेंडूंमध्ये त्यांना करायच्या होत्या फक्त ३० धावा! तरीदेखील त्यांच्या हातातून सामना निसटण्यासाठी जसा सूर्यकुमारचा अप्रतिम झेल कारणीभूत ठरला, तशीच भारताचा भरंवशाचा बुम बुम बुमराहची टिच्चून केलेली गोलंदाजीही. त्याचवेळी हार्दिक पंड्याचं शेवटचं षटक आणि अर्शदीप सिंगनं केलेला भेदक मारा. शिवाय या सगळ्याला जोड होती ती आख्ख्या टीम इंडियाची आणि कोट्यवधी भारतीयांच्या शुभेच्छांची!

Rohit Sharma Statement on India Win
IND vs ENG: टीम इंडियाच्या फायनल प्रवेशासह रोहित शर्माचे विराट कोहलीवर मोठे वक्तव्य; म्हणाला, “१५ वर्ष खेळलेल्या…”
South African fans object to Surya's catch
सूर्यकुमार यादवच्या ‘कॅच’वरुन पेटला नवा वाद, दक्षिण आफ्रिकन चाहत्याने VIDEO शेअर करत केला फसवणूक झाल्याचा दावा
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात काय आहे स्थिती? कुणाला मिळाला विजय; कोण आघाडीवर? जाणून घ्या…
devendra fadnavis analysis
“आपण तीन नाही, तर चार पक्षांशी लढत होतो, तो चौथा पक्ष म्हणजे…”; देवेंद्र फडणवीसांकडून लोकसभेतील निकालाचं विश्लेषण!
Virat Kohli Arshdeep Singh Dance On Tunak Tunak Song
IND vs SA Final : विराट कोहली-अर्शदीप सिंगने केला भांगडा, ‘तुनक तुनक’ गाण्यावर डान्स करतानाचा VIDEO व्हायरल
Rohit Sharma Announces Retirement from T20 Cricket in Marathi
Rohit Sharma T20 Retirement: रोहित शर्मानेही जाहीर केली टी-२० मधून निवृत्ती, वर्ल्डकप विजयानंतर ‘रो-को’ चा भारतीय चाहत्यांना धक्का
vishal patil and uddhav thackeray
“उद्धव ठाकरेंना…”, काँग्रेसला पाठिंबा दिल्यानंतर अपक्ष आमदार विशाल पाटलांचं विधान

विश्वविजय साजरा करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला ३० चेंडूंमध्ये ३० धावा करायच्या असताना तडाखेबाज फलंदाज मिलर आणि क्लासेन दोघेही भरात होते! नेमकं तेव्हाच कर्णधार रोहित शर्मानं आपलं ब्रह्मास्त्र अर्थात जसप्रीत बुमराहला चेंडू सोपवला. जबाबदारी एकच, विकेट!

बुमराहनं वातावरण तयार केलं!

सोळाव्या षटकात बुमराहला एकही विकेट काढता आली नाही. पण समोर क्लासन आणि मिलरसारखे तडाखेबाज फलंदाज असतानाही त्या षटकात बुमराहनं अवघ्या चार धावा दिल्या. त्यामुळे आफ्रिकेच्या जोडगोळीवरचा दबाव प्रचंड वाढला. जिथे ३० चेंडूत ३० धावा असं लक्ष्य होतं, ते आता २४ चेंडूंत २६ धावा असं झालं!

India won T20 WC 2024: …तेव्हा सचिन होता, आता राहुल द्रविड; टीम इंडियाचं दोन महान दिग्गजांसाठी ‘वर्ल्डकप सेलिब्रेशन’!

…आणि क्लासनचा अडसर दूर झाला!

बुमराहनं सोळाव्या षटकात आफ्रिकन फलंदाजांवर टाकलेल्या दबावाचा परिणाम पुढच्याच षटकात दिसून आला. सतराव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर हार्दिक पंड्यानं धोकादायक वाटत असलेल्या क्लासनला वाईड लाईनचा चेंडू टाकून यष्टिरक्षक रिषभ पंतकरवी झेलबाद केलं. अर्धशतक पूर्ण केलेला क्लासन तंबूत परतला!

या विकेटचा अपेक्षित परिणाम दिसून आला. त्यापुढच्या पाच चेंडूंवर यान्सन आणि मिलरला मिळून फक्त चार धावा दिल्या. आता आफ्रिकेला १८ चेंडूंत हव्या होत्या २२ धावा आणि त्यांनी सेट झालेल्या क्लासनची विकेट गमावली होती.

बुमराहवरच पुन्हा मदार!

अठरावं षटक अत्यंत महत्त्वाचं होतं. गेल्या दोन षटकांमध्ये तयार झालेला दबाव अजिबात हटता कामा नये हे पक्कं होतं. समोर मिलर येईल तो चेंडू मैदानाबाहेर तडकावण्यासाठी सज्ज होता. अशात कर्णधार रोहित शर्मानं त्याचा हुकमाचा एक्का अर्थात डेथ ओव्हर्सचा कलंदर गोलंदाज बुमराहकडे पुन्हा चेंडू सोपवला. ही बुमराहची शेवटची ओव्हर होती. समोर मिलर होता. शेवटी बुमराहच तो… पहिल्या दोन चेंडूंवर एकही धाव दिली नाही. दक्षिण आफ्रिकेला १६ चेंडूंत २२ धावांची गरज.

तिसऱ्या चेंडूवर मिलरनं मारलेला फटका क्षेत्ररक्षकाकडे जाऊन थांबला आणि फक्त एक धाव मिळाली. यान्सन स्ट्राईकवर आला. बुमराहसाठी ही सुवर्णसंधी होती आणि यान्सनसाठी भीषण साक्षात्कार! फटकेबाजी करणं अपेक्षित असतानाही यान्सन बुमराहच्या भीतीपोटी बचावात्कम शॉटचा प्रयत्न करू लागला आणि त्याचा डिफेन्स भेदून बुमराहचा चेंडू थेट यष्ट्यांवर जाऊन आदळला! पुढे पुन्हा अपेक्षित परिणाम! उरलेल्या दोन चेंडूंमध्ये फक्त एक धाव.

अर्शदीप सिंगचं टार्गेट केशव महाराज!

१९व्या षटकात गोलंदाजीसाठी उतरलेल्या अर्शदीप सिंगनं आफ्रिकेच्या शेपटावर वार करायला सुरुवात केली. पहिले दोन चेंडू निर्धाव गेल्यानंतर शेवटी तिसऱ्या चेंडूवर केशव महाराजला एक धाव घेता आली. पण मिलर स्ट्राईकवर येऊन काहीच उपयोग झाला नाही. अर्शदीपनं टिच्चून मारा केल्यामुळे उरलेल्या दोन चेंडूंवर फक्त तीन धावा आल्या. आता अंतिम षटकात दक्षिण आफ्रिकेसाठी लक्ष्य झालं ६ चेंडूंत १६ धावा!

“माझ्या मित्रासाठी मी खूप आनंदी आहे”, सचिन तेंडुलकरची विश्वविजयानंतर टीम इंडियासाठी खास पोस्ट!

सूर्यकुमार यादवचा अविश्वसनीय झेल!

३० चेंडूंत ३० धावांवरून आफ्रिकेची स्थिती ६ चेंडूंत १६ धावांपर्यंत आली. शेवटच्या षटकात मिलर स्ट्राईकवर होता. तो खेळला तर पहिल्या तीन चेंडूंत सामना संपवू शकेल याची सगळ्यांनाच शक्यता नव्हे, तर खात्री होती. हार्दिक पंड्यानं वाईड लाईनवर फुल्ल टॉस चेंडू टाकला. मिलरनं अपेक्षेप्रमाणे उत्तुंग फटका लगावला. चेंडू हवेत गेला तशी कोट्यवधी भारतीयांची धडधड वाढली. सीमारेषेवर सूर्यकुमार यादव जिवाच्या आकांताने झेल पकडण्यासाठी पळत होता. अगदी सीमारेषेला जवळपास खेटेपर्यंत पोहोचला तेव्हा दोन्ही हात पुढे करून एक अविश्वसनीय झेल सूर्यकुमार यादवनं टिपला. तोल गेला म्हणून तो सीमारेषेच्या बाहेरही गेला, पण तेवढ्यात त्यानं चेंडू हवेत फेकला आणि पुन्हा आत येत चेंडू झेलला! मिलर बाद, आफ्रिकेच्या आशा जवळपास संपुष्टात!

पहिल्याच चेंडूवर मिलरला माघारी पाठवल्यानंतरही आफ्रिकेला ५ षटकांमध्ये १६ धावा करायच्या होत्या. धडधड अजून आटोक्यात आली नव्हती. दुसऱ्याच चेंडूवर रबाडाच्या बॅटची कड घेऊन मागे सीमारेषेपार गेलेल्या चेंडूने तमाम भारतीयांची धडधड आणखी वाढवली. शेवटच्या चार चेंडूंमध्ये १२ धावा हव्या असताना तिसऱ्या चेंडूवर रबाडाला चकवा देऊन हार्दिकचा चेंडू रिषभ पंतच्या हातात स्थिरावला. पण तोपर्यंत एक धाव काढली होती. केशव महाराज स्ट्राईकवर होता.

IND vs SA : सूर्यकुमार यादवच्या ‘कॅच’ने सामन्याला दिली कलाटणी, ज्यामुळे भारताने ११ वर्षानंतर ICC ट्रॉफीवर कोरलं नाव, पाहा VIDEO

…तर सुपर ओव्हर झाली असती!

चौथ्या चेंडूवर महाराजनंही चेंडू मारण्याचा प्रयत्न केला. पण स्क्वेअर लेगला गेलेला चेंडू फक्त एक धाव देऊन गेला. शेवटच्या दोन चेंडूंवर १० धावा करायच्या असताना हार्दिकनं वाईड बॉल टाकला आणि ते लक्ष्य ९ धावांवर आलं. उरलेल्या दोन चेंडूंवर दोन चौकार लागले असते तर सुपर ओव्हर झाली असती. पण ती वेळ आलीच नाही. रबाडानं मारलेला फटका कुलदीप यादवच्या हातात स्थिरावला आणि आफ्रिकेच्या आशा संपुष्टात आल्या. शेवटच्या चेंडूवर हार्दिकनं नॉटजेला टाकलेल्या चेंडूवर अवघी एक धाव निघाली आणि भारतानं चित्तथरारक झालेल्या या विश्वचषक अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर ७ धावांनी विजय मिळवला!

Video: इथे पाहा काय घडलं शेवटच्या पाच षटकांत!

ही शेवटची पाच षटकं टी २० विश्वचषक अंतिम सामन्याचा आणि पर्यायाने वर्ल्डकप स्पर्धेचा निकाल फिरवणारीच ठरली!