When Indian Team Reach India After Winning T20 World Cup 2024: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली, भारतीय क्रिकेट संघाने २९ जून रोजी बार्बाडोसमधील केन्सिंग्टन ओव्हल मैदानावर टी-२० विश्वचषकाचे जेतेपद पटकावले. दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या अंतिम सामन्यात ७ धावांनी रोमहर्षक विजय मिळवत ११ वर्षांपासून सुरू असलेला आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवला. तेव्हापासून सर्व भारतीय चाहते संघाच्या देशात परतण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. पण बार्बाडोसमधील चक्रिवादळामुळे संघ दोन दिवस तिथेच अडकला होता. पण आता भारतीय संघ मायदेशात कधी परतणार याचे अपडेट समोर आले आहेत.

हेही वाचा – “तो कधी सीमारेषेजवळ नसतो पण…”, सूर्यकुमारचा फायनलमधील कॅचबद्दल मोठा खुलासा; म्हणाला, “रोहितकडे चेंडू फेकणार होतो”

Special train from Konkan route , Konkan train ,
कोकण मार्गावरून विशेष रेल्वेगाडी
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Vijay Hazare Trophy Mumbai Beat Arunachal Pradesh by 9 Wickets Under Shardul Thakur Captaincy
Vijay Hazare Trophy: शार्दूल ठाकूरच्या नेतृत्वात मुंबईने उडवला अरुणाचलचा धुव्वा; अवघ्या ३३ चेंडूत जिंकला सामना
IND vs AUS Boxing Day Test Sam Konstas hit six against Jasprit Bumrah after 4483 balls
IND vs AUS : १९ वर्षीय खेळाडूने जसप्रीत बुमराहविरुद्ध केला मोठा पराक्रम, ११४५ दिवसांनी मोडला खास विक्रम
Tanush Kotian set to replace R Ashwin in India Test squad for last two Australia Tests IND vs AUS
IND vs AUS: टीम इंडियात अश्विनच्या निवृत्तीनंतर मोठा बदल, मुंबई क्रिकेट संघाच्या ‘या’ खेळाडूला दिली संधी
Speeding tempo overturns in Maval drunk driver arrested
वाघोलीतील घटनेची पुनरावृत्ती टळली; मावळमध्ये भरधाव टेम्पो पलटी, मद्यधुंद चालकाला बेड्या
Shreyas Iyer 40 Runs Inning Made Mumbai Win in Low Scoring Match vs Hyderabad Vijay Hazare Trophy
Shreys Iyer: श्रेयस अय्यरची कमाल, ९व्या क्रमांकावर फलंदाजीला आला अन् २० चेंडूत पालटला सामना; मुंबईचा दणदणीत विजय
Nivali-Haatkhamba villagers protest demanding cancellation of flyover at Nivali
निवळी येथील उड्डाणपूल रद्द व्हावा या मागणीसाठी निवळी-हातखंबा ग्रामस्थांचे आंदोलन

अंतिम सामन्यानंतर बार्बाडोसमध्ये चक्रीवादळामुळे विमानतळावरून उड्डाणे बंद केल्यामुळे टीम इंडियाला तिथेच थांबाव लागलं. आता संघाच्या पुनरागमनाबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे ज्यात त्यांच्या लवकरच रवाना होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

हेही वाचा – T20 WC 2024: रोहित ऋषभची ‘ती’ युक्ती ठरली सामन्याचा खरा टर्निंग पॉईंट, १७ व्या षटकापूर्वी नेमकं काय घडलं? चर्चेला आलंय उधाण

बार्बाडोसमध्ये आलेल्या चक्रीवादळानंतर तेथील पंतप्रधानांनी २ जुलै रोजी दिलेल्या निवेदनात पुढील ६ ते १२ तासांत विमानतळाचे काम सुरू केले जाऊ शकते, अशी माहिती दिली होती. अनेक रिपोर्ट्सनुसार, टीम इंडिया ३ जुलै रोजी स्थानिक वेळेनुसार पहाटे १ वाजता बार्बाडोसवरून रवाना होईल, त्यानंतर संघ गुरुवार, ४ जुलै रोजी भारतात पोहोचेल. अंतिम सामना पाहण्यासाठी बार्बाडोसमध्ये पोहोचलेले बीसीसीआयचे सचिव जय शाह देखील टीम इंडियासोबत परतणार आहेत, ज्यात खेळाडूंव्यतिरिक्त सपोर्ट स्टाफचाही समावेश आहे.

वर्ल्डकप कव्हर करण्यासाठी भारतीय मीडियादेखील कॅरेबियनमध्ये पोहोचला होता. आता त्यांना भारतीय संघ आणि सपोर्ट स्टफसह भारतात आणण्याची व्यवस्था बीसीसीआय आणि जय शाह यांनी केली आहे. २० पत्रकारांची तुकडी असलेला संघ स्पेशल विमानाने परतणार आहे. बार्बाडोसमध्ये अडकलेल्या काही पत्रकारांनी ट्विट करत भारतीय संघ मायदेशी कधी परतेल याचे अपडेट दिले आहेत. विश्वविजेता भारतीय संघ ४ जुलै रोजी पहाटे ४ वाजता दिल्लीला पोहोचेल, अशी माहिती देण्यात आली आहे. त्याचसोबत आज सकाळी ट्रॉफीचा एक व्हीडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे, संघ ट्रॉफी घेऊन लवकरच मायदेशी येईल असा मेसेज दिला आहे.

Story img Loader