भारतीय संघ येत्या ५ जूनपासून टी-२० विश्वचषक २०२४ च्या मोहिमेला सुरूवात करणार आहे. यादरम्यानच भारताच्या एका खेळाडूने निवृत्ती जाहीर केली आहे. या खेळाडूने सोशल मीडियावर पोस्ट करत क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेत असल्याची माहिती दिली. हा भारतीय क्रिकेटपटू म्हणजे मराठमोळा केदार जाधव. केदार जाधवने भावुक करणारी पोस्ट करत आपल्या क्रिकेट कारकिर्दीला पूर्णविराम दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केदार जाधवने त्याच्या निवृत्तीबाबत आपल्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. जी टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनीशी मिळतीजुळती आहे. धोनीने निवृत्तीच्या वेळीही अशीच एक नोट शेअर केली होती. केदारने त्याच्या कारकिर्दीतील काही फोटो देखील शेअर केले आहेत. या फोटोच्या बॅकग्राउंडला किशोर कुमारचे गाणंही आहे.

हेही वाचा – T20 WC 2024: वर्ल्डकपमध्ये सुपर ओव्हरचा थरार; डेव्हिड व्हिसा ठरला नामिबियाच्या विजयाचा शिल्पकार

केदारने २०२० मध्ये ऑकलंडमध्ये न्यूझीलंडविरुद्ध भारतीय संघासाठी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला, तेव्हापासून तो संघाबाहेर आहे. यापूर्वी इंग्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या एकदिवसीय विश्वचषक २०१९ च्या भारतीय संघाचा तो भाग होता. केदारने त्याच्या कारकिर्दीत त्याला पाठिंबा देण्याबद्दल आणि त्याला दिलेल्या प्रेमाबद्दल चाहत्यांचे आभार मानले.

हेही वाचा – हार्दिक-नताशाच्या घटस्फोट प्रकरणात मोठी अपडेट, पंड्याच्या बायकोने इन्स्टाग्रामवर पुन्हा केला बदल, ‘ते’ फोटो…

केदार जाधवने भारताकडून फक्त नऊ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आणि १२३.२३ च्या स्ट्राइक-रेटने केवळ १२२ धावा केल्या. विशेष म्हणजे २०१८ मध्ये चेन्नई सुपर किंग्जच्या विजेतेपदाच्या सामन्यात केदार जाधवने महत्त्वाची भूमिका बजावली होती. केदार आयपीएल २०२३ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून अखेरचा आयपीएल खेळताना दिसला होता. यादरम्यान केदार जिओ सिनेमासाठी मराठीत समालोचन करताना दिसला. एकूणच, RCB आणि CSK व्यतिरिक्त, तो आयपीएलमध्ये आणखी दोन संघ दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबादकडून खेळला.

केदार जाधवने टीम इंडियासाठी ७३ वनडे आणि ९ टी-२० सामने खेळले आहेत. केदारने ७३ एकदिवसीय सामन्यांमध्ये फलंदाजी करताना १३८९ धावा केल्या. ज्यामध्ये त्याने २ शतके आणि ६ अर्धशतके झळकावली. याशिवाय ९ टी-२० सामन्यात १२२ धावा केल्या. ज्यात एक अर्धशतकाचा समावेश आहे. केदारने आयपीएलमध्ये ९५ ​​सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने १२०८ धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये त्याच्या नावे ४ अर्धशतकेही आहेत.

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian cricketer kedar jadhav announces retirement from all formats of cricket in ms dhoni style bdg
Show comments