ऑस्ट्रेलियामध्ये सुरु असणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये वेस्ट इंडिजचा संघ अव्वल १२ मधून बाहेर पडल्यानंतरचा दुसरा धक्कादायक निकाल आज लागला. आयर्लंडच्या संघाने डकवर्थ लुईस नियमानुसार गतविजेत्या इंग्लंडच्या संघाचा पाच धावांनी पराभव केला. साडेपाच षटकांचा सामना शिल्लक असताना अचानक जोरदार पाऊस आला तेव्हा डकवर्थ लुईस नियमानुसार इंग्लंडचा संघ हा अपेक्षित धावसंख्येपेक्षा पाच धावा मागे होता. पाऊस न थांबल्याने सामन्याचा निकाल जैसे थे स्थितीत लावण्यात आला अन् आयर्लंडने सामना पाच धावांनी जिंकला. या विजयानंतर आयर्लंडच्या संघावर कौतुकाचा वर्षावर होत असतानाच इंग्लंडच्या संघाला ट्रोल केलं जात आहे. काही आठवड्यांपूर्वी माहिला क्रिकेटच्या सामन्यामध्ये माकंडिंग प्रकरणामुळे झालेल्या वादाचा अप्रत्यक्ष संदर्भ देत आजच्या सामन्यानंतर भारताच्या माजी क्रिकेटपटूने इंग्लडच्या संघाला ट्रोल केलं आहे.
नक्की वाचा >> T20 World Cup: “विराटने टी-२० मधून निवृत्त व्हावं कारण…”; भारताच्या विजयाचं विश्लेषण करताना शोएब अख्तरचं विधान
भारताचा माजी फिरकी गोलंदाज अमित मिश्राने आजच्या सामन्यानंतर आयर्लंडच्या संघाचं कौतुक केलं आहे. मात्र त्याचवेळी त्याने इंग्लंडच्या संघाला खोचक शब्दांमध्ये टोला लगावला आहे. इंग्लंड आता या सामन्याच्या निकालानंतर पुन्हा रडगाणं करत हा निकाल खेळभावनेला धरुन नाही अशी आरडाओरड करणार नाही अशा आशयाची पोस्ट अमित मिश्राने केली आहे. त्याने या पोस्टमध्ये आयर्लंडच्या संघाचा फोटोही पोस्ट केला आहे. तसेच क्रिकेट आयर्लंडच्या ट्वीटर हॅण्डललाही टॅग केलं आहे.
नक्की वाचा >> Ind vs Pak: “…तर भारताला विश्वचषक जिंकणं शक्य नाही”; रोमहर्षक सामना भारताने जिंकल्यानंतर इंझमाम-उल-हकचं विधान
मागील महिन्यात झालेल्या भारत विरुद्ध इंग्लंडच्या महिला संघांच्या एकदिवसीय मालिकेत तिसऱ्या सामन्यात भारताची गोलंदाज दिप्ती शर्माने इंग्लंडच्या शार्लोट डीनला मांकडींग पद्धतीने बाद करत सामना जिंकला होता. नॉनस्ट्राइकर एण्डला असलेल्या डीनने दिप्ती चेंडू टाकण्याआधी क्रिझ सोडलं होतं. नव्या नियमांनुसार अशापद्धतीने फलंदाला धावबाद करता येतं. दिप्तीने तेच केलं. मात्र हा प्रकार खेळ भावनेला धरुन नसल्याचं सांगत इंग्लंडच्या आजी माजी पुरुष क्रिकेटपटूंनी रान उठवलं होतं. मात्र भारताच्या आजी-माजी क्रिकेटपटूंनीही जर नियम आहे तर नियमानुसार दिप्तीने केलं ते बरोबर आहे म्हणत महिला संघाची पाठराखण केलेली. यावरुन बरेच आठवडे सोशल मीडियावर शाब्दिक वाद सुरु होता. आजच्या सामन्यानंतर अमित मिश्राने त्याच शिळ्या कढीला पुन्हा फोडणी देण्याचा प्रयत्न ट्वीटमधून केलाय. “आज मिळवलेल्या मोठ्या विजयासाठी आयर्लंडच्या संघाचं अभिनंदन! डकवर्थ लुईसच्या नियमानुसार आयर्लंडने सामना जिंकणं हे खेळ भावनेच्याविरोधात आहे असं इंग्लंडने म्हटलं नाही म्हणजे मिळवलं,” असं ट्वीट अमित मिश्राने केलं आहे.
नक्की वाचा >> Ind vs Pak: “रोहितने टॉसदरम्यान मुद्दाम नाणं उंच उडवत लांब फेकलं आणि…”; पराभवानंतर पाकिस्तानमधील TV चर्चेत अजब तर्क
नक्की वाचा >> Ind vs Pak: शेवटच्या दोन ओव्हर पाहण्यासाठी उड्डाण पाच मिनिटांनी लांबवलं? विमान मुंबई एअरपोर्टच्या रनवेवर धावत असतानाच…
या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. आयर्लंडने १९.२ षटकात सर्व गडी बाद १५७ धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ १४.३ षटकांत ५ बाद १०५ धावा खेळत असताना पाऊस आला. डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे इंग्लंडचा संघ निर्धारित लक्ष्याहून पाच धावांनी मागे होता. हाच फरक नंतर सामना न होऊ शकल्याने निर्णयक ठरला. या सामन्यामध्ये इंग्लंडच्या फलंदाजांना नावाला साजेशी खेळी करता आली नाही. कर्णधार जोस बटलर तर भोपळाही न फोडता तंबूत परतला. आणि हेल्स सात धावांवर माघारी परतला. जोशुआ लिटलनेच या दोघांनाही तंबूत धाडले.
नक्की वाचा >> Ind vs Pak: “…लाज वाटते का?” भारताच्या विजयानंतर गौतम गंभीर ठरतोय टीकेचा धनी; जाणून घ्या टीकेमागील ‘विराट कनेक्शन’
इंग्लंडचा कर्णधार जॉश बटलरने सामन्यापूर्वीच आयर्लंड आम्हाला या सामन्यात कडवी टक्कर देऊ शकतो असे म्हणाला होता. सामना संपल्यानंतर बटलरने सर्वत बाबतीत त्यांनी आमच्यापेक्षा चांगला खेळ केला आणि आजच्या दिवसातील उत्तम संघ जिंकला अशी प्रतिक्रिया नोंदवली.