Jasprit Bumrah Viral Funny Video Post IND vs ENG: गयाना येथे झालेल्या टी २० विश्वचषकात उपांत्य फेरीच्या लढतीत भारताने इंग्लंडविरुद्ध दणदणीत विजय मिळवला. रोहित शर्मा आणि कंपनीने ६८ धावांनी विजय मिळवत विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक दिली. भारतीय वेळेनुसार २८ जूनच्या पहाटेपर्यंत खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताने इंग्लंडला १७२ धावांचे आव्हान दिले होते. दुसऱ्या इनिंगमध्ये भारतीय गोलंदाजांनी अवघ्या १०३ धावांमध्येच इंग्लंडच्या संपूर्ण संघाला तंबूत धाडले. अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांनी अनुक्रमे तीन बळी घेतले. तर जसप्रीत बुमराहला सुद्धा दोन विकेट काढता आल्या. सामन्याची शेवटची विकेट सुद्धा बुमराहने पटकावली होती. बुमराहने विजयावर शिक्कामोर्तब करत घेतलेली विकेट लक्षवेधी होतीच पण त्याहीपेक्षा सामन्यानंतर बुमराह व अंपायरची भेट चर्चेचा मुद्दा ठरली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यानंतर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये, सर्व भारतीय खेळाडू पंचांची भेट घ्यायला गेले असता बुमराहकडे अंपायरने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. कदाचित अनावधानानेच दुर्लक्ष झाले असावे पण अवघ्या काही सेकंदांची ही क्लिप नेटकरी तुफान व्हायरल करत आहेत. विशेष म्हणजे बुमराह हात पुढे करून हस्तांदोलन करण्याचा प्रयत्न करताना पंचांच्या अगदी बाजूलाच उभा होता. इतकंच नाही तर, एका क्षणी, पंच त्याच्याकडे वळले पण तेव्हाही त्यांनी दुसऱ्याच खेळाडूशी हात मिळवला. बुमराहचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी तर “अरे तू ये माझ्याशी हात मिळव”, असं मस्करीत म्हटलं आहे.

Video: बुमराहकडे दुर्लक्ष? बाजूला असूनही पंचांनी हात मिळवला नाहीच!

हे ही वाचा<< “हिंदुस्थान जिंकल्याचा मला..”, म्हणत शोएब अख्तरने पोस्ट केलेला Video चर्चेत; माजी पाक खेळाडूने विचारलं, “कुणी हा सल्ला..”

दरम्यान यंदाच्या T20 विश्वचषकातील हा भारताचा सातवा विजय होता. आता शनिवारी विश्वचषक विजेतेपदासाठी भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका असा सामना होणार आहे. टीम इंडियाने तब्बल १० वर्षांनी अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. यापूर्वी २०१४ मध्ये भारत विश्वचषकाचा अंतिम सामना खेळला होता. तर २००७ मध्ये एम. एस. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने विश्वचषक आपल्या नावे केला होता.

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jasprit bumrah ignored by ind vs eng umpire funny video makes fans feel sad for indian pacer watch t 20 world cup highlights svs