T20 World Cup 2024, India Won Against Pakistan: भारतीय संघाने टी-२० वर्ल्डकप २०२४ मधील सामन्यात पाकिस्तानवर ६ धावांनी रोमहर्षक विजय मिळवला. या विजयात भारतीय गोलंदाज हिरो ठरले. यापैकी जसप्रीत बुमराहने ३ विकेट्स घेत मोठी भूमिका बजावली.
४ षटकांमध्ये १४ धावा देत ४ विकेट्स घेत बुमराहने पाकिस्तानचे कंबरडे मोडले. भारताच्या शानदार विजयानंतर जसप्रीत बुमराहला या सामन्याचा सामनावीर म्हणूनही घोषित करण्यात आले. बुमराहने भारताच्या दोन्ही वर्ल्डकप सामन्यांमध्ये आपल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर सामनावीराचा पुरस्कार मिळवला आहे. पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यानंतर बुमराहची पत्नी अँकर संजना गणेशन हिने त्याची मुलाखत घेतली.
संवादादरम्यान, बुमराहने न्यूयॉर्कच्या कठीण खेळपट्टीवर भारताच्या प्रसिद्ध विजयाबद्दल सांगताना दिसला. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ११९ धावा करत ऑल आऊट झाला होता. या सामन्यात ऋषभ पंत आणि अक्षर पटेल च्या पॉवरप्लेमधील फटकेबाजीच्या जोरावर ही धावसंख्या गाठली. पंतने ४२ तर अक्षर पटेलने २० धावा केल्या. याशिवाय भारतीय संघाचा एकही फलंदाज फार काळ टिकू शकला नाही. भारतीय संघाने कमी धावसंख्या जरी धावफलकावर लावली असली तर संघ कधीच सामन्यात डगमगला नाही आणि यामुळेच आम्ही सामना जिंकू शकलो असे त्याने सांगितले. बुमराह त्याच्या कामगिरीवर आनंदी असल्याचेही तो म्हणाला.
हेही वाचा – बाबर आझमला इंग्रजीत विचारलेला प्रश्नच कळला नाही, पाकिस्तानच्या कर्णधाराचं उत्तर ऐकाल तर… VIDEO व्हायरल
रिजवानची विकेट ही सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरली, याबद्दलही बुमराहने भाष्य केले. त्याच्या या विकेटमुळे सामन्याचा रोख बदलला याचं त्याला समाधान आहे आणि त्याने कशी गोलंदाजी केली याबाबतही त्याने सांगितले. गेल्या वनडे वर्ल्डकपमध्येही बुमराहने मोहम्मद रिजवानला क्लीन बोल्ड केले होते, टी-२० विश्वचषकातही बुमराहने सारखीच कामगिरी केली. यावरून रिजवानची विकेट त्याची फेव्हरेट विकेट असते का असा प्रश्न संजनाने विचारला त्यावर बुमराहने एक शानदार उत्तर दिले.
बुमराह म्हणाला, ” मी असा काही विचार करत नाही. माझ्यासाठी सर्वात मोठा आनंद हा आहे की जेव्हा जेव्हा एखादी समस्या किंवा कोडे असते तेव्हा मी ते कसे सोडवायचे? माझ्याकडे पर्याय काय आहेत? समोर कोणती टीम आहे यापेक्षा मी संघाला कशी मदत करू शकतो आणि मी ही समस्या कशी सोडवू शकेन यावर मी लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करतो. मी संघासाठी ही कामगिरी करू शकलो याचा मला खूप आनंद झाला, पण मी विरोधी संघाचा जास्त विचार करत नाही.
हेही वाचा – IND vs PAK: ऋषभने रचला पाया, बुमराहने रचला कळस; भारताचा पाकिस्तानवर चित्तथरारक विजय
भारत याआधी न्यूयॉर्कमध्ये दोन सामने खेळला आहे आणि अजून एक सामनाही याच मैदानावर खेळणार आहे. याच मैदानावर भारताने राव सामनाही खेळला होता, ज्यात संघाने बांगलादेशवर विजय मिळवला होता. १२ जून रोजी यूएसए विरुद्ध याच मैदानावर आणखी एक सामना संघ खेळणार आहे. न्यूयॉर्कमध्ये खेळण्याच्या अनुभवाविषयी बोलताना बुमराह म्हणाला, “खूप छान वाटलं. सर्व प्रथम, मैदान खूपच मोठं आहे, त्यामुळे एक चांगली गोष्ट आहे. या मैदानावर गोलंदाजांना मदत मिळत आहे, त्यामुळे मी एक गोलंदाज म्हणून कधीही तक्रार करणार नाही कारण… ज्या सामन्यात बॅट आणि बॉलमध्ये चुरस असते तो नेहमीच चांगला आणि पाहण्यासारखा असतो.”
मुलाखतीत, संजनाने स्पर्धेतील भारताच्या दुसऱ्या विजयाबद्दल बुमराहचे अभिनंदन केले आणि सांगितले की पुन्हा लवकरच भेटू. यावर बुमराहने उत्तर दिले, “धन्यवाद; मी ३० मिनिटांत भेटूया. यावर संजना म्हणाली- डिनरमध्ये काय आहे?” या दोघांच्या या छोट्याशा पण गोड संभाषणाचा व्हीडिओ आता व्हायरल होत आहे. आयसीसीने हा व्हीडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.