Jasprit Bumrah thanks PM Modi and shares photo with son : भारताचा टी-२० विश्वचषक विजेता संघ गुरुवारी सकाळी दिल्लीत पोहोचला. त्यानंतर सर्व खेळाडू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी पोहोचले आणि त्यांच्याबरोबर नाश्ताही केला. दरम्यान, जसप्रीत बुमराहने ‘एक्स’ वर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तो त्याची पत्नी आणि पंतप्रधान मोदीं दिसत आहे. एका फोटोत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुमराहच्या मुलाला कडेवर घेतलेले दिसत आहे.

भारतीय संघाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या मुलाचे नाव अंगद असून त्याचा जन्म ४ सप्टेंबर २०२३ रोजी झाला होता. जसप्रीत बुमराहने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये पीएम मोदींबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. बुमराहने लिहिले, “आज सकाळी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी आमंत्रित होणे माझ्यासाठी खूप सन्मानाची गोष्ट आहे. या उत्साही क्षणांसाठी आणि पाहुणचारासाठी मोदी सरांचे खूप खूप आभार.”

Lakhat Ek Aamcha dada
Video: तेजूच्या लग्नाची सुपारी फुटली; डॅडी म्हणाले, “खरे नवरदेव…”, पाहा प्रोमो
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
bhagare guruji son Akhilesh bhagare will get marriage anagha atul share video
भगरे गुरुजींचा मुलगा लवकरच अडकणार लग्नबंधनात; लेकीने लग्नघराचा व्हिडीओ केला शेअर
vidya balan on sridevi
दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचं कौतुक करत विद्या बालनने व्यक्त केली इच्छा; म्हणाली, “मला त्यांना…”
actor himansh kohli wedding photos out
बॉलीवूड अभिनेत्याने मंदिरात साधेपणाने केलं अरेंज मॅरेज; लग्नातील फोटो आले समोर
khushi kapoor boyfriend vedang raina name spotted on her bracelet
खुशी कपूरने स्वत: दिली प्रेमाची कबुली; बॉयफ्रेंडचं नाव लिहिलेला ‘तो’ फोटो सोशल मीडियावर व्हायरल
Batoge To Katoge wedding card viral
हद्दच झाली! लग्नाच्या पत्रिकेवरही आता ‘बटोगे तो कटोगे’चा नारा; व्हायरल होणाऱ्या लग्नपत्रिकेत मोदी-योगींचा फोटो
shatrughan sinha cheated on poonam sinha
“पत्नीने मला एकदा रंगेहात पकडलं होतं…”, शत्रुघ्न सिन्हांनी स्वतःच केलेला खुलासा, म्हणाले होते…

याआधी नरेंद्र मोदींनी संपूर्ण भारतीय संघाची भेट घेतली, सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसोबत फोटोशूट केले. त्याचबरोबर पंतप्रधान मोदींनी सर्व सदस्यांशी आपुलकीने संवाद साधला. त्याचबरोबर टी-२० विश्वचषक जिंकल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी टीम इंडियाचे अभिनंदन करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी टीम इंडिया बार्बाडोसमध्ये असतानाही त्यांनी फोनवर बोलून भारतीय खेळाडूंना दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषकावर नाव कोरल्याबद्दल शुभेच्छा दिल्या होत्या.

हेही वाचा – Team India Victory Parade : विराटने दिल्लीत कुटुंबासह टी-२० विश्वचषकाच्या विजयाचे केले सेलिब्रेशन, फोटो व्हायरल

टीम इंडिया मुंबईसाठी रवाना –

गुरुवारी सकाळी भारतीय संघाची पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर विशेष बैठक पार पडली. यानंतर, संघ मुंबईला रवाना झाला आहे. जिथे बीसीसीआयने नरिमन पॉइंट ते वानखेडेपर्यंत एक किलोमीटरच्या विजय परेडची योजना आखली आहे. जेणेकरून चाहत्यांना टी-२० विश्वचषक ट्रॉफीसह त्यांच्या आवडत्या खेळाडूंची झलक जवळून पाहायला मिळू शकेल. यानंतर प्रतिष्ठेच्या वानखेडे स्टेडियमवर विजेत्या संघाचा गौरवही करण्यात येणार आहे.

हेही वाचा – Team India Celebration : टीम इंडियाच्या स्वागतासाठी मुंबईत जंगी तयारी, वानखेडेवर चाहत्यांना मोफत प्रवेश, पाहा VIDEO

वानखेडे स्टेडियममध्ये चाहत्यांना मोफत प्रवेश –

भारतीय क्रिकेट संघाच्या या ऐतिहासिक विजयाबद्दल बीसीसीआयच्या वतीने वानखेडे स्टेडियमवर खेळाडूंच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला जास्तीत जास्त लोकांनी हजेरी लावावी यासासाठी आज वानखेडे स्टेडियममध्ये मोफत प्रवेश देण्यात आला आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सचिव अजिंक्य नाईक यांनी ही घोषणा केली आहे. स्टेडियममध्ये प्रथम येणाऱ्यास प्रथम सेवा या तत्त्वावर प्रवेश मिळेल.