टी-२० विश्वचषक २०२२ मधील दुसरा उपांत्य फेरीचा सामना आज (गुरुवार) अॅडलेड येथे खेळला जाणार आहे. हा सामना भारत विरुद्ध इंग्लड संघात पार पडणार आहे. या सामन्याला दुपारी १३० वाजता सुरुवात होणार आहे. या सामन्यात जो जिंकेल तो १३ नोव्हेंबरला पाकिस्तानविरुद्ध अंतिम सामन्यात भिडणार आहे. दरम्यान उपांत्य फेरीच्या अगोदर इंग्लंड संघाच कर्णधार जोस बटलरने एक मोठे वक्तव्य केले आहे. बटलरचा असा विश्वास आहे की हा सामना जिंकून त्याला टी-२० विश्वचषक ट्रॉफीच्या थोडे जवळ जायला आवडेल.
क्रिकबझच्या एका बातमीनुसार, जोस बटलर म्हणाला की, ”मला वाटते की आम्हाला विजयी गोष्टी साध्य करायच्या आहेत. आणि आम्ही क्रिकेट चांगले खेळलो असे म्हणणाऱ्या संघासारखे व्हायचे नाही. त्या दरम्यान तुम्हाला काही चांगल्या गोष्टी साध्य करायच्या आहेत.” याशिवाय बटलर म्हणाला की, उपांत्य फेरी आणि अंतिम फेरी गाठणे ही मोठी गोष्ट आहे. साहजिकच सामना संपल्यानंतर ट्रॉफीसोबत उभे राहणे हे एक बक्षीस आहे आणि तेच आपल्या सर्वांना साध्य करायचे आहे. पण आम्ही तिथे ज्या पद्धतीने खेळतो ते आम्हाला माहीत आहे, आम्हाला ते मिळवण्याची सर्वोत्तम संधी असेल.
त्याचवेळी उपांत्य फेरीबद्दल तो म्हणाला की, ”याआधी आम्ही दोन सामने जिंकले आहेत. त्यामुळे आम्हाला नॉकआउट क्रिकेटची जाणीव झाली आहे. त्यामुळे आम्हाला वाटते की, त्या सामन्यांमधून आम्हाला चांगला आत्मविश्वास मिळाला आहे. संघ खरोखरच आरामदायक वाटत आहे आणि उपांत्य फेरीच्या दिवशी काय होईल याबद्दल प्रत्येकजण खरोखर उत्सुक आहे.”
या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय संघाचे पारडे जड दिसत आहे. कारण फलंदाजीत विराट कोहली, सूर्यकुमार यादव आणि केएल राहुलही गेल्या दोन सामन्यांपासून फॉर्ममध्ये परतले आहेत. दुसरीकडे, मार्क वूड आणि डेव्हिड मलान या दोन जखमी खेळाडूंची इंग्लंडसाठी मोठी समस्या आहे. आता हा सामना कोण जिंकतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.