Mitchell Marsh give Updates on Mitchell Starc Injury : ऑस्ट्रेलियाने ओमानविरुद्ध आपल्या २०२४ च्या टी-२० विश्वचषक मोहिमेची सुरुवात केली. या स्पर्धेतील १०वा सामना ऑस्ट्रेलिया आणि ओमान यांच्यात खेळला गेला. केन्सिंग्टन ओव्हल, बार्बाडोस येथे झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ३९ धावांनी विजय मिळवला. मात्र, या विजयाच्या आनंदासोबतच वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कच्या दुखापतीनेही ऑस्ट्रेलियन कॅम्पच्या अडचणी वाढल्या आहेत.

वास्तविक, सामन्यादरम्यान स्टार्कला दुखापत झाली. आता प्रश्न उपस्थित होत आहे की स्टार्क इंग्लंडविरुद्धच्या पुढील सामन्यात खेळणार की नाही? यावर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्शने आता एक महत्त्वाची अपडेट दिली आहे. ओमानविरुद्ध स्टार्कने ३ षटकात २० धावा देऊन २ विकेट्स घेतल्या. विशेष म्हणजे त्याने डावाच्या पहिल्याच षटकात स्टार्कने विकेट घेतली.

Jasprit Bumrah and Tabraiz Shamsi have similar T20I stats
Jasprit Bumrah : तबरेझ शम्सीच्या पोस्टने क्रिकेट विश्वाला दिला आश्चर्याचा धक्का! जसप्रीत बुमराहबरोबर घडला असा योगायोग की विश्वासच बसणार नाही
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
KL Rahul returns to nets after injury scare ahead BGT
KL Rahul : टीम इंडियासाठी आनंदाची बातमी! पर्थ कसोटी सामन्यापूर्वी ‘हा’ स्टार खेळाडू दुखापतीतून सावरला
IND vs AUS Paine criticism of Gautam Gambhir ahead Border Gavaskar Trophy
IND vs AUS : ‘… तो भारतीय क्रिकेट संघासाठी योग्य नाही’, रिकी पॉन्टिंगनंतर टिम पेनने गौतम गंभीरवर साधला निशाणा
Sachin Tendulkar Cryptic post about Steve Bucknor
Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकरच्या ‘त्या’ पोस्टने चाहत्यांच्या वाईट आठवणी झाल्या ताज्या, ‘हा’ अनुभवी अंपायर पुन्हा आला चर्चेत
Shubman Gill injury update ahead Border Gavaskar Trophy
Shubman Gill : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पर्थ कसोटीतून शुबमन गिल बाहेर? पहिल्या सामन्यापूर्वीच भारताची वाढली डोकेदुखी
Tilak Verma scores centuries in two consecutive T20 matches in South Africa
Tilak Varma : ‘…मी कल्पनाही केली नव्हती’, विक्रमी शतकानंतर तिलक वर्माने देवासह ‘या’ खेळाडूचे मानले आभार

पहिल्याच सामन्यात मिचेल मार्शला दुखापत –

मिचेल स्टार्क तीन षटके टाकल्यानंतर, डावाच्या १५व्या षटकात जेव्हा स्टार्क त्याच्या स्पेलचे शेवटचे षटक टाकायला आला, तेव्हा तो अस्वस्थ दिसला. स्टार्कने षटकाचा पहिला चेंडू वाईड टाकला आणि त्यानंतर तो अडखळताना दिसला. यानंतर ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मैदानाबाहेर गेला आणि त्याच्या जागी ग्लेन मॅक्सवेलने षटक पूर्ण केले. मिचेल स्टार्कने मैदान सोडताच प्रत्येकाच्या मनात प्रश्न निर्माण झाला की तो इंग्लंडविरुद्धच्या पुढील सामन्यात खेळणार की नाही?

हेही वाचा – T20 WC 2024 : युगांडा संघाने पापुआ न्यू गिनीवर विजय मिळवल्यानंतर केला भन्नाट डान्स, VIDEO व्हायरल

स्टार्कच्या दुखापतीबद्दल मार्शने अपडेट दिली –

ओमानविरुद्धच्या सामन्यानंतर कांगारूंचा कर्णधार मिचेल मार्शने सांगितले की, स्टार्कला फक्त क्रॅम्प्स आले होते. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार म्हणाला, “स्टार्कला केवळ क्रॅम्प्स आले होते. त्यामुळे आम्हाला कोणतीही रिस्क घ्यायची नव्हती. जेव्हा स्टार्क म्हणाला की तो गोलंदाजी करण्यास समर्थ नाही समजले. तेव्हा आम्ही त्याला मैदानाबाहेर आरामसाठी पाठवले. आता आम्ही इंग्लंडविरुद्ध खेळण्यासाठी उत्सुक आहोत.”

हेही वाचा – Frank Nsubuga : युगांडाच्या ४३ वर्षीय गोलंदाजाने रचला इतिहास! टी-२० विश्वचषकात केला सर्वात मोठा पराक्रम

या सामन्यात ओमानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. त्यामुळे प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाने २० षटकांत ५ बाद १६४ धावा केल्या. मार्कस स्टॉइनिसने संघासाठी सर्वात मोठी खेळी खेळली. त्याने ३६ चेंडूत २ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने ६७ धावा केल्या. त्याचबरोबर डेव्हिड वॉर्नरनेही अर्धशतक झळकावले. प्रत्युत्तरात ओमान संघाला २० षटकांत ९ गडी गमावून केवळ १२५ धावाच करता आल्या. या दरम्याने ऑस्ट्रेलियाकडून मार्कस स्टॉइनिसने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. स्टॉइनिसला त्याच्या उत्कृष्ट अष्टपैलू कामगिरीबद्दल ‘प्लेअर ऑफ द मॅच’चा किताब देण्यात आला.