Why Kane Williamson left New Zealand Captaincy: टी-२० विश्वचषकात न्यूझीलंड संघाची कामगिरी अत्यंत खराब झाली आहे. त्यानंतर आता संघाचा कर्णधार केन विल्यमसनने किवी संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय विल्यमसनने केंद्रीय करार घेण्यासही नकार दिला आहे. खरे तर केन विल्यमसनच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंड संघ गट सामन्यांमध्ये खराब कामगिरीनंतर विश्वचषकातून बाहेर पडण्याची ही पहिलीच वेळ आहे. यावेळी किवी संघाला सुपर८ मध्येही स्थान मिळवता आले नाही. यानंतर विल्यमसनने हा मोठा आणि धक्कादायक निर्णय घेतला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने ही माहिती देताना सांगितले की, केन विल्यमसनने २०२४-२५ या वर्षासाठी केंद्रीय करार घेण्यास नकार दिला आहे. न्यूझीलंडकडून ३५० हून अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळलेला अनुभवी खेळाडू केन विल्यमसनने केंद्रीय करार आणि वनडे व टी-२० संघांचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, विल्यमसन कसोटीत संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे.

हेही वाचा – Super 8 Explainer: वर्ल्डकपमधील सुपर८चे सामने कसे खेळवले जाणार? काय आहे A1, B2 चं गणित; जाणून घ्या सविस्तर

केन विल्यमसनने न्यूझीडंचे कर्णधारपद का सोडले?

केन विल्यमसनला यावर्षी फार कमी क्रिकेट आणि टी-२० लीग खेळण्याची संधी मिळाली. दुसरीकडे, दुखापतीमुळे तो खेळू शकला नाही. त्यामुळेच त्याने यंदाच्या मोसमात करार न करण्याचा निर्णय घेतला आहे कारण आता संघात सर्वच फॉरमॅटमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारे युवा खेळाडू आहेत, त्यामुळे केनला संघात ही जागा सहजासहजी घ्यायची नाही.

हेही वाचा – ‘हा भारतीय असणार…’ असं म्हणत हारिस रौफ चाहत्यावर गेला धावून, संतापलेल्या हारिसने पत्नीलाही ढकललं; VIDEO व्हायरल

केन विल्यमसन म्हणाला, ‘मला संघाच्या प्रगतीसाठी मदत करण्याची खूप आवड आहे आणि त्यात योगदान देत राहायचे आहे. पण मी न्यूझीलंडच्या उन्हाळ्यात परदेशी लीगमध्ये खेळण्याची संधी शोधत आहे त्यामुळे मी केंद्रीय करार स्वीकारू शकत नाही. न्यूझीलंडकडून खेळणे ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे आणि संघासाठी काहीतरी करण्याची माझी इच्छा कमी झालेली नाही. माझे क्रिकेटबाहेरील जीवन बदलले आहे; माझ्या कुटुंबासोबत अधिक वेळ घालवणे आणि त्यांच्यासोबत देश किंवा परदेशात प्रवास करणे माझ्यासाठी अधिक महत्त्वाचे आहे.

हेही वाचा – T20 World Cup मध्ये मॅच फिक्सिंग? ‘या’ संघातील खेळाडूला वेगवेगळ्या नंबरवरून आले कॉल, ICC ला कळताच…

केन विल्यमसनने दीर्घकाळ एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमध्ये न्यूझीलंड संघाचे नेतृत्व केले आहे. पण आता लवकरच संघाला नवा कर्णधार मिळणार आहे. यानंतर चाहत्यांच्या मनात हा प्रश्न उपस्थित होत आहे की, आता वनडे आणि टी-२० मध्ये किवी संघाचा नवा कर्णधार कोण असणार?

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kane williamson steps down as new zealand captain and denies central contract after t20 world cup 2024 bdg