What is the semi-final equation for Group-1 : टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये आजचा दिवस ऐतिहासिक उलथापालथीचा राहिला. या फॉरमॅटचा चॅम्पियन असलेल्या ऑस्ट्रेलियन संघाचा अफगाणिस्तानकडून २१ धावांनी पराभव झाला. संपूर्ण सामन्यात ऑस्ट्रेलियन संघ संघर्ष करताना दिसला. याआधी सामन्यात अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला विकेट्ससाठी झुंजायला लावले. त्यानंतर अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी आपल्या करिष्माई गोलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. अफगाणिस्तानने हा ऐतिहासिक विजय मिळवून उपांत्य फेरीची शर्यत आणखी कठीण केली आहे. आता गट-१ चे समीकरणं पूर्णपणे गुंतागुंतीची झाली आहेत. गटातील कोणता संघ उपांत्य फेरीत प्रवेश करू शकतो? काय समीकरण असणार जाणून घेऊया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारताचा मार्ग झाला सुकर –

ऑस्ट्रेलियाच्या पराभवामुळे भारताचा मार्ग सुकर झाला आहे. भारताने आतापर्यंत २ सामने खेळले असून दोन्ही सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर भारताचे नेट रन रेट +२.४२५ आहे. संघाचा पुढील सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. भारताने हा सामना जिंकल्यास अपराजित राहून उपांत्य फेरीत प्रवेश करेल. मात्र भारताने हा सामना गमावला तरी भारताला उपांत्य फेरी गाठणे तितकेसे अवघड जाणार नाही. मात्र, भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोठ्या फरकाने सामना गमावून नये, याची काळजी घ्यावी लागेल. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हा सामना २४ जून रोजी होणार आहे.

अफगाणिस्तान संघाचे वाढले मनोबल –

भारताविरुद्धच्या दारुण पराभवानंतर अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे. या सामन्यातील विजयाने अफगाणिस्तानचे मनोबल वाढले आहे. उपांत्य फेरी गाठण्यासाठी संघाला बांगलादेशविरुद्धचा पुढील सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागेल. उपांत्य फेरी गाठण्यासाठी अफगाणिस्तानला बांगलादेशविरुद्ध चांगल्या फरकाने विजय मिळवावा लागेल. अफगाणिस्तानने बांगलादेशविरुद्धचा पुढचा सामना जिंकला आणि भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला नमवले तर अफगाणिस्तान भारतासोबत उपांत्य फेरीत पोहोचेल. त्याचबरोबर अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांनी आपापले सामने जिंकल्यास उपांत्य फेरीचा संघ नेट रन रेटच्या आधारावर निश्चित केला जाईल.

हेही वाचा – IND vs BAN : रोहित शर्माने रचला इतिहास! ख्रिस गेलचा ‘हा’ षटकारांचा विक्रम मोडत ठरला नवा ‘सिक्सर किंग’

ऑस्ट्रेलियाच्या वाढल्या अडचणी –

अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाला हरवून या विश्वचषकात आतापर्यंतचा सर्वात मोठी उलथापालथ केली आहे. या सामन्यातील पराभवामुळे ऑस्ट्रेलियाच्या अडचणी वाढल्या आहेत. ऑस्ट्रेलिया सध्या २ सामन्यांतून २ गुणांसह गटात दुसऱ्या स्थानावर आहे. अफगाणिस्तानकडून पराभूत झाल्यानंतर त्यांचा नेट रन रेटही खराब झाला आहे. ऑस्ट्रेलियाचा सध्याचा नेट रन रेट +०.२२३ आहे. उपांत्य फेरी गाठण्यासाठी ऑस्ट्रेलियाला भारताविरुद्धचा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागेल.

हेही वाचा – AUS vs AFG : अफगाणिस्तानचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय; गुलबदीन ठरला शिल्पकार

जर ऑस्ट्रेलिया संघाने भारताविरुद्धचा पुढील सामना जिंकला आणि अफगाणिस्तानने त्याच्या पुढील सामन्यात बांगलादेशचा पराभव केला, तर भारत, ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानचे प्रत्येकी ४ गुण होतील. अशा परिस्थितीत नेट रन रेटच्या आधारावर संघांना उपांत्य फेरीत प्रवेश मिळेल. त्याचवेळी जर ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धचा सामना गमावला आणि अफगाणिस्ताननेही आपला पुढचा सामना गमावला तर भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ उपांत्य फेरीत पोहोचतील.

हेही वाचा – AFG vs AUS : ग्लेन मॅक्सवेलचा झेल ठरला अफगाणिस्तानच्या ऐतिहासिक विजयाचा ‘टर्निंग पॉइंट’, VIDEO होतोय व्हायरल

बांगलादेशची एकमेव आशा उरली –

या गटात शेवटच्या स्थानावर असलेल्या बांगलादेशलाही उपांत्य फेरी गाठता येईल. यासाठी बांगलादेशला अफगाणिस्तानला मोठ्या फरकाने पराभूत करावे लागेल. त्याचबरोबर भारताने ऑस्ट्रेलियाला मोठ्या फरकाने पराभूत केल्यास, बांगलादेशला उपांत्य फेरीत पोहोचण्याची संधी निर्माण होण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Know the t20 world cup 2024 group 1 semi finals equation after afghanistans historic win over australia vbm