Why Toss Important IND vs PAK Match : टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये रविवारी ९ जून रोजी भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी सामना होणार आहे. टी-२० विश्वचषकात भारताचा पाकिस्तान संघावर वरचष्मा राहिला आहे. मात्र, या सामन्यात नाणेफेक मोठी भूमिका बजावू शकते. जर आपण रेकॉर्डवर नजर टाकली तर, २००७ पासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सर्व टी-२० विश्वचषक सामन्यांमध्ये, लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाने सर्व सामने जिंकले आहेत. त्यामुळे दोन्ही संघ नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करताना दिसतील. अशा प्रकारे भारत-पाक सामन्यात नाणेफेक निर्णायक ठरणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत एकूण ७ सामने खेळले गेले आहेत. भारताने टी-२० विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध ७ पैकी ६ सामने जिंकले आहेत. पाकिस्तानने एक सामना जिंकला आहे. २००७ नंतर पासून टी-२० विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात ५ सामने खेळले गेले आहेत. २००९ आणि २०१० मध्ये दोघांमध्ये एकही सामना झाला नव्हता. २०१२ च्या टी-२० विश्वचषकापासून आतापर्यंत भारताने पाकिस्तानविरुद्ध ४ सामने धावांचा पाठलाग करताना जिंकले आहेत. त्याचबरोबर २०२१ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानने एका सामन्यात १० विकेट्सने विजय मिळवला आहे.

२००७ नंतरच्या टी-२० विश्वचषकात भारत-पाकिस्तानची कामगिरी –

टी-२० विश्वचषक २०१२ स्पर्धेत भारताने लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा ८ गडी राखून पराभव केला होता. यानंतर, २०१४ च्या टी-२० विश्वचषकात दोन्ही संघ आमनेसामने आले होते, जिथे भारताने लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा ७ विकेट्सने पराभव केला होता. २०१६ च्या टी-२० विश्वचषकात भारताने धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचा ६ गडी राखून पराभव केला होता. यानंतर २०२१ च्या टी-२० विश्वचषकात पाकिस्तानने एकमेव सामन्यात लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा १० विकेट्सने पराभव केला होता. यानंतर २०२२ च्या टी-२० विश्वचषकात भारताने लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा ४ गडी राखून पराभव केला.

हेही वाचा – IND vs PAK : रोहित शर्माला सराव सत्रात दुखापत! पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात खेळणार की नाही? जाणून घ्या

भारत विरुद्ध पाकिस्तान टी-२० विश्वचषक सामन्यांचे निकाल (२००७ नंतर पासून)

१. भारत विरुद्ध पाकिस्तान – २०१२ टी-२० विश्वचषक – भारत ८ विकेट्सनी विजयी
२. भारत विरुद्ध पाकिस्तान – २०१४ टी-२० विश्वचषक – भारत ७ विकेट्सनी विजयी
३. भारत विरुद्ध पाकिस्तान – २०१६ टी-२० विश्वचषक – भारत ६ विकेट्सनी विजयी
४. भारत विरुद्ध पाकिस्तान – २०२१ टी-२० विश्वचषक – पाकिस्तान १० विकेट्सनी विजयी
५. भारत विरुद्ध पाकिस्तान – २०२२ टी-२० विश्वचषक – भारत ४ विकेट्सनी विजयी

हेही वाचा – IND vs PAK : रोहितला आऊट करण्याच्या रणनीतीबद्दल आमिरचा मोठा खुलासा; म्हणाला, “त्याला फक्त…”

नाणेफेक जिंकणार संघ मारणार बाजी?

रविवारी, ९ जून रोजी भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी सामना होईल, तेव्हा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाला अधिक फायदा होईल, असे विक्रम दर्शवित आहेत. आता ९ जून रोजी पाकिस्तानविरुद्धच्या टी-२० विश्वचषक सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा काय निर्णय घेतो हे महत्त्वाचे ठरणार आहे. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार नाणेफेक जिंकून गोलंदाजी करणार संघ सामना जिंकताना दिसत आहे.

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Know why toss will be important in india vs pakistan match in t20 world cup 2024 vbm
Show comments