Lockie Ferguson Created History in NZ vs PNG T20 WC 2024: न्यूझीलंडने विजयासह टी-२० विश्वचषकाची सांगता केली. न्यूझीलंड संघाचा अखेरचा सामना पापुआ न्यु गिनी विरुद्ध होता. पावसामुळे हा सामना उशिरा सुरू झाला. पण सामना सुरू होण्यापूर्वीच न्यूझीलंड संघ हा सामना जिंकू शकतो याची शक्यता होती. या सामन्यात न्यूझीलंड संघाच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली. पण वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसनने एक असा पराक्रम केला आहे जो आजपर्यंतच्या टी-२० वर्ल्ड कपच्या इतिहासात प्रथमच घडला. त्याने एक दुर्मिळ विक्रम आपल्या नावे केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – Super 8 Explainer: वर्ल्डकपमधील सुपर८चे सामने कसे खेळवले जाणार? काय आहे A1, B2 चं गणित; जाणून घ्या सविस्तर

टी-२० विश्वचषकात ही कामगिरी करणारा लॉकी फर्ग्युसन ठरला पहिला गोलंदाज

किवी गोलंदाज लॉकी फर्ग्युसनने भेदक गोलंदाजी करत सर्वांनाच चकित केले. त्याने पापुआ न्यू गिनीविरुद्ध ४ षटके टाकली आणि यादरम्यान त्याने चारही षटके मेडन म्हणून टाकली. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसनने आपल्या चार षटकांच्या स्पेलमध्ये एकही धाव दिली नाही. डावाच्या चौथ्या षटकात तो पहिल्यांदा गोलंदाजी करायला आला. यासह फर्ग्युसनने पहिल्याच चेंडूवर असद्दोला वाला याला बाद केले. यानंतर सहाव्या षटकातही त्याने एकही धाव दिली नाही. त्यानंतर तो १२ षटकांत तिसरे टाकण्यासाठी आला आणि एकही धाव न देता एक विकेट घेतली. त्याच्या स्पेलच्या शेवटच्या षटकात त्याने दोन धावा दिल्या पण ते बाय रन होते. गोलंदाजाच्या खात्यात या लेग बायच्या धावा जोडल्या जात नाहीत. टी-२० विश्वचषकात ही कामगिरी करणारा तो पहिलाच गोलंदाज तर जगातील दुसरा गोलंदाज ठरला आहे.

हेही वाचा – गौतम गंभीर भारताच्या प्रशिक्षकपदासाठी एकमेव अर्जदार; आज होणार मुलाखत

टी-२० विश्वचषकात ४ मेडेन षटके टाकण्याची ही पहिलीच वेळ आहे आणि टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दुसऱ्यांदा कोणत्याही गोलंदाजाने चारही षटके टाकून एकही धाव दिली नाही. कॅनडाचा कर्णधार शाद बिन जफरने यापूर्वीही अशी कामगिरी केली आहे. २०२१ मध्ये पनामा विरुद्धच्या सामन्यात सादने चारही षटके मेडन म्हणून टाकत २ विकेट घेतल्या होत्या. याआधी टी-२० विश्वचषकात किफायतशीर गोलंदाजी करण्याचा विक्रम टीम साऊदीच्या नावावर होता. न्यूझीलंडच्या युगांडाविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात त्याने ४ षटकात ४ धावा देऊन ४ विकेट घेतले होते.

टी-२० विश्वचषकातील सर्वात किफायतशीर गोलंदाजी करणारे खेळाडू
३/० – लॉकी फर्ग्युसन (न्यूझीलंड) वि पापुआ न्यु गिनी, त्रिनिदाद, २०२४
३/४ – टिम साउथी (न्यूझीलंड) विरुद्ध युगांडा, त्रिनिदाद, २०२४
२/४ – फ्रँक न्सुबुगा (युगांडा) वि पापुआ न्यु गिनी, गयाना, २०२४
४/७ – एनरिक नॉर्टजे (दक्षिण आफ्रिका) विरुद्ध श्रीलंका, न्यूयॉर्क, २०२४
२/७ – ट्रेंट बोल्ट (न्यूझीलंड) विरुद्ध युगांडा, त्रिनिदाद, २०२४

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lockie ferguson created history with most economical spell in t20 world cup history with four overs four maidens nz vs png t20 world cup 2024 bdg
Show comments