भारताची स्टार खेळाडू लोव्हलिना बोरगोहेन हिने आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती लव्हलिनाने शुक्रवारी (११ नोव्हेंबर) जॉर्डनच्या अम्मानमध्ये इतिहास रचला. तिने ७५ किलो गटात अंतिम फेरीत विजय मिळवला. लव्हलिना बोर्गोहाइनने विजेतेपदाच्या लढतीत उझबेकिस्तानच्या रुझमेटोवा सोखिबाचा ५-० असा पराभव केला. अन्य एका सामन्यात परवीनने ६३ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले. त्याचवेळी मीनाक्षीने ५२ किलो गटात रौप्य पदक जिंकले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तिच्या पहिल्या सामन्यात लव्हलिनाने कझाकस्तानच्या व्हॅलेंटिना खलजोवावर ३-२ असा विजय मिळवला. या विजयानंतर त्याने आपले पदक निश्चित केले होते. परवीनने जपानच्या किटो माईचा ५-० असा पराभव केला. परवीनने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकले होते. राष्ट्रकुल स्पर्धेत ती सहभागी होऊ शकली नाही. त्याने चौथ्या मानांकित जपानच्या खेळाडूला एकतर्फी लढतीत पराभूत केले.

याआधी तिने अल्फिया (८१+किलो वजनीगटात) हिने उपांत्य फेरीतही दमदार कामगिरी दाखवली आणि २०१६ च्या विश्वविजेत्या कझाकिस्तानच्या लज्जत कुंगेबायेवाचा ५-० असा पराभव केला. अल्फियाने या दिग्गज बॉक्सरला दुसऱ्यांदा पराभूत केले आहे. अंतिम फेरीत, लव्हलिनाला २०२१ आशियाई चॅम्पियनशिप रौप्यपदक विजेत्या रुझमेटोवा सोखिबाच्या आव्हानाचा सामना केला आणि विजयं मिळवला. तर अल्फियाला जॉर्डनच्या इस्लाम हुसेलीचे आव्हान असेल. दिवसाच्या अन्य उपांत्य फेरीत, अंकुशिता बोरो (६६ किलो) हिने उझबेकिस्तानच्या खामिदोवा नवबाखोर हिच्याकडून १-४ ने पराभूत होऊन कांस्यपदक जिंकले.

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lovelina borgohain puts in a stunning performance wins gold medal at asian boxing championships avw
Show comments