ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या टी२० विश्वचषक २०२२ मध्ये सुपर-१२ टप्पा संपला असून आता उपांत्य फेरीची शर्यत सुरू झाली आहे. चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले असून यामध्ये भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि इंग्लंड यांचा समावेश आहे. पाकिस्तान उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला आहे आणि संघाचा मार्गदर्शक मॅथ्यू हेडनचा उत्साह खूप उंचावत आहे आणि त्याने इतर संघानाही सावध केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

टी२० विश्वचषकात पाकिस्तानच्या संघाला नशिबाने साथ देत त्यांनी उपांत्य फेरी गाठली आहे. उपांत्य फेरी गाठण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला नेदरलँड्सकडून पराभव पत्करावा लागणार होता. ही अशी गोष्ट होती, ज्याच्या पूर्ततेवर कदाचित पाकिस्तानी संघाचाही विश्वास बसला नसेल. झिम्बाब्वेविरुद्धच्या पराभवानंतर त्याचा कर्णधार बाबर आझम म्हणाला की, आता उपांत्य फेरी गाठण्याची शक्यता फारच कमी आहे. पण, क्रिकेटमध्ये सामन्याचे फासे उलटतात, असे म्हणतात.

तसेच झाले, नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला आणि त्यामुळे पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठण्याची संधी मिळाली आणि त्यानंतर पाकिस्ताने शेवटच्या सामन्यात बांगलादेशचा पराभव करून उपांत्य फेरीचे तिकीट मिळवले. मात्र, टी२० विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठल्यानंतर पाकिस्तानचा संघ अधिकच उत्साही झाला आहे. संघाबद्दल त्याचे मार्गदर्शक मॅथ्यू हेडन यांनी दिलेल्या ताज्या विधानावरून तरी असे दिसते.

मॅथ्यू हेडनने इतर संघांना इशारा दिला

रविवारी बांगलादेशविरुद्धच्या सामन्यानंतर हेडनने संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये आपल्या भाषणात सांगितले की, “आता आपला संघ इतरांसाठी खूपच धोकादायक झाला आहे आणि क्वचितच कोणत्याही संघाला पाकिस्तानशी सामना करायला आवडेल. त्यांना वाटले ते आमच्यापासून सुटतील पण आम्ही इथे आहोत. हाच चमत्कार आपण पाहिला. आम्हाला विश्वास नव्हता की आम्ही उपांत्य फेरी गाठू पण ती गाठली. आम्ही एकमेकांवर विश्वास ठेवला आणि मग एक चमत्कार घडला. आमचा रस्ता सोपा नव्हता. जर नेदरलँड्सने तो सामना जिंकला नसता, तर आम्ही येथे आलो नसतो. पण आता आम्ही येथे आहोत आणि मजबूत स्थितीत आहोत. पाकिस्तानने उपांत्य फेरी यावे असे कोणालाच वाटत नव्हते आणि संघ अनपेक्षितरित्या पोहोचल्याने आम्हाला आता त्या संघांना दाखवून देता येईल. या गोष्टीचा पाकिस्तान संघाला नक्कीच फायदा करून घेता येईल.”

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mentor matthew hayden gave a long speech to the pakistan team said we will become a threat to other teams avw