भारत विरुद्ध इंग्लंड संघात आज टी-२० विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य फेरीचा दुसरा सामना खेळला जाणार आहे. हा सामना अॅडलेड येथील मैदानावर दुपारी १:३० वाजता सुरु होईल. तत्पुर्वी या सामन्यांची नाणेफेक १ वाजता पार पडेल. दरम्यान या सामन्यापूर्वी भारतीय संघाचा माजी खेळाडू मोहम्मद कैफ याने रोहित शर्माबद्दल एक महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या भारतीय संघासाठी चिंतेची बाब म्हणजे रोहित शर्माचा फॉर्म. आत्तापर्यंत शर्माने या स्पर्धेत केवळ एक अर्धशतक झळकावले आहे. तो त्याच्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये दिसला नाही.परंतु, भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफला विश्वास आहे की रोहित शर्मा इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीत मोठी धावसंख्या करेल आणि आपल्या संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावेल. त्याच्या मते, रोहित शर्मा मोठ्या सामन्यांचा खेळाडू आहे आणि तो संघासाठी एक्स फॅक्टर सिद्ध होऊ शकतो.

स्पोर्ट्सकीडाला दिलेल्या मुलाखतीत मोहम्मद कैफ म्हणाला, ‘रोहित शर्माने अजून जास्त धावा केल्या नाहीत, पण मला वाटते की तो मोठ्या सामन्यांचा खेळाडू आहे. त्याला इंग्लंडविरुद्ध खेळायला आवडते. जर उपांत्य फेरीत त्याने मोठी धावसंख्या केली, तर मला आश्चर्य वाटणार नाही. तो संघासाठी एक्स फॅक्टर आहे आणि जेव्हा जेव्हा संघ दबावाखाली असतो, तेव्हा त्याने मॅच-विनिंग इनिंग खेळल्या आहेत.’

उपांत्य फेरीत इंग्लंडला पराभूत करून पाकिस्तानविरुद्ध अंतिम सामना खेळावा, अशी प्रार्थनाही भारतीय संघ करत असेल. मोहम्मद कैफने रोहित शर्माबद्दल म्हटले आहे की, इंग्लंडविरुद्धचा सामना त्याच्यासाठी कर्णधार म्हणून खूप मोठा असणार आहे.

IND vs ENG 2nd Semifinal : विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत ३५ वर्षांनंतर दुसऱ्यांदा आमनेसामने, पाहा दोन्ही संघाची आकडेवारी

मोहम्मद कैफ पुढे म्हणाला की, ‘मी रोहित शर्माला खूप चांगला खेळाडू मानतो. आता वेळ आली आहे की त्याला पुढील दोन सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करायची आहे. कर्णधार म्हणून रोहित शर्मासाठी पुढचा सामना मोठा असणार आहे. जेव्हापासून त्याने टी-२० मध्ये कर्णधारपद स्वीकारले आहे, तेव्हापासून त्याचा रेकॉर्ड चांगला आहे. मला वाटते की त्याने आपल्या कर्णधारपदाने संघात खोलवर प्रभाव पाडला आहे.’

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mohammad kaif backs skipper rohit sharma to come well against england in t20 world cup semifinal vbm
Show comments