ICC T20 World Cup 2024 USA vs IND Highlights: भारत विरुद्ध अमेरिका यांच्यात १२ जून रोजी झालेल्या सामन्यात टीम इंडियाने सात गडी राखून विजय मिळवला. टीम इंडियाने या विजयासह सुपर८ फेरीत आपले स्थान पक्के केले. वनडे विश्वचषक २०२३ पासून सामन्यात उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूला मेडल देण्याची परंपरा सुरू केली आहे, जी आचा टी-२० वर्ल्डकपमध्येही कायम आहे. प्रत्येक सामन्यानंतर संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप खेळाडूंना सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक पदकासाठी नामांकित करतात. हा ट्रेंड अमेरिकेविरुद्धच्या सामन्यानंतरही कायम होता. गेल्या वेळी रवी शास्त्री मेडल देण्यासाठी टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममध्ये पोहोचले होते तर यावेळी एक खास खेळाडू ड्रेसिंग रूम मध्ये मेडल देण्यासाठी हजर होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमेरिकेविरूद्धच्या सामन्यानंतर भारताचा माजी खेळाडू आणि टी-२० विश्वचषक २०२४ चा ब्रँड अॅम्बेसेडर असलेला युवराज सिंग भारताच्या ड्रेसिंग रूममध्ये उपस्थित होता. भारताचे फिल्डिंग कोच टी दिलीप यांनी अमेरिकेविरूद्ध सामन्यातील बेस्ट फिल्डरसाठी ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव आणि मोहम्मद सिराज यांना नॉमिनेट केले. तर सिराज मोहम्मदला पुन्हा एकदा त्याच्या उत्कृष्ट झेलसाठी बेस्ट फिल्डरचे मेडल देण्यात आले. भारताटचा सिक्सर किंग युवराज सिंगने हे मेडल सिराजला दिले.

हेही वाचा – IND v USA: बोरिवलीतील अनेक खेळाडू या सामन्यात असं शास्त्रींनी म्हणताच रोहित शर्मा पाहा काय म्हणाला, “त्यांच्यासोबत एकत्र क्रिकेट…”

मोहम्मद सिराजने अमेरिकेविरूद्ध शानदार फिल्डिंग केली. अमेरिकेचा फलंदाज नितीश कुमारचा एक अप्रतिम झेल सिराजने टिपला. सिराज त्यावेळेस सीमारेषेवर फिल्डिंगसाठी तैनात होता. नितीश चांगली फटकेबाजी करत होता , यानंतर त्याने पुढचा चेंडूही षटकारासाठी पाठवण्याचा प्रयत्न केला पण सिराजने चेंडू येताच हवेत झेप घेतली आणि तो अनपेक्षित झेल टिपला. त्याची ही कॅच पाहून सर्वच अवाक् झाले. याशिवाय अमेरिकेचा फलंदाज स्टीव्हन टेलर याचाही एक उत्कृष्ट झेल सिराजने टिपला. तर अखेरच्या यासाठी त्याला बेस्ट फिल्डरचं मेडल युवराज सिंगकडून देण्यात आलं.

हेही वाचा – IND VS USA T20 World Cup: पेनल्टीचा भुर्दंड बसला आणि अमेरिकेने टाकली मान; काय आहे नवीन नियम?

युवराजने भारतीय संघाच्या कामगिरीचे कौतुक केले. त्याचसोबत अर्शदीपची गोलंदाजी आणि गेल्या सामन्यातील त्याच्या फलंदाजीचेही कौतुक केले. वर्ल्डकपमध्ये संघासाठी धावा काढून सामना जिंकवल्याचा खेळाडू म्हणून फायदा होतो असे म्हणत युवराजने शिवम दुबेचे कौतुक केले. तर सूर्यकुमारच्या संयमी खेळीसाठी त्याची पाट थोपटली पण म्हणाला सूर्या स्टाईल खेळी नव्हती पण परिस्थितीला साजेशी खेळी केल्याबद्दल कौतुक. तर संघाला खेळाचा आनंद लुटण्यासही सांगितले. यानंतर सिराजला मेडल देत भाषण संपलं असं म्हणतं एकच हशाही पिकवला.

वर्ल्डकप २०२३ मधील ११ सामन्यांमध्ये मोहम्मद सिराजला एकदाही बेस्ट फिल्डरचे मेडल मिळाले नव्हते. पण टी-२० विश्वचषकात त्याला दोन वेळा हे मेडल मिळाल्याने तो खूप आनंदी आहे. तर फिल्डिंग कोच टी दिलीप यांनीही त्याचे खूप कौतुक केले.

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mohammed siraj gets best fielder medal from yuvraj singh suryakumar yadav watch video ind vs usa t20 world cup 2024 bdg
Show comments