बुधवारी १२ जून रोजी टी-२० विश्वचषक २०२४ मधील सामन्यात भारताने अमेरिकेचा सात गडी राखून पराभव केला. हा सामना न्यूयॉर्कच्या नासाऊ काउंटी क्रिकेट स्टेडियमवर खेळवला गेला. भारत आणि अमेरिका यांच्यातील सामन्यासह न्यूयॉर्कमधील टी-२० विश्वचषकाचे सर्व सामने संपले. न्यूयॉर्कमधील टी-२० विश्वचषकाचा अखेरचा सामना खेळून झाल्यानंतर आता हे स्टेडियम पाडण्यात येणार आहे. नासाऊ काऊंटी स्टेडियमच्या बांधकामावर ३० दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे २४८ कोटी रुपये खर्च झाले आहेत. हे स्टेडियम आता अचानक पाडण्यात का येणार आहे, याच्यामागचे कारण काय आहे जाणून घेऊया.
विश्वचषकाच्या सुरुवातीपासूनच नासाऊ काऊंटी क्रिकेट इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडिमय चर्चेचा विषय राहिले. नासाऊचे ड्रॉप इन पिच हे या चर्चेमागील कारण आहे. आतापर्यंत या मैदानावर खेळलेले सर्व सामने लो स्कोअरिंगचे होते. पण न्यूयॉर्कच्या या अवघड खेळपट्टीवरही सर्वात मोठी धावसंख्या म्हणजेच १११ धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करणारा भारत पहिलाच देश ठरला. हे मैदान अवघ्या १०६ दिवसांत तयार झाले. याबाबत अनेक चर्चाही झाल्या. आता हे स्टेडियम पाडण्याचे काम सुरू झाले आहे.
नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम तयार करण्यासाठी १०६ दिवस लागले. जे आता ६ आठवड्यात पाडण्यात येणार आहे. क्रिकबझच्या वृत्तानुसार, भारत आणि अमेरिका यांच्यातील सामन्यानंतर हे स्टेडियम पाडण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या स्टेडियमच्या खेळपट्ट्यांबाबत आयसीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, जर नासाऊ काउंटीच्या अधिकाऱ्यांना या खेळपट्ट्या ठेवायचा असतील तर ते तसे करू शकतात आणि नको असल्यास या खेळपट्ट्या परत पाठवल्या जातील.
नासाऊ काउंटी स्टेडियम का पाडणार?
न्यूयॉर्कचे नासाऊ काउंटी स्टेडियम अवघ्या पाच महिन्यांत बांधले गेले. हे स्टेडियम केवळ टी-२० विश्वचषकातील सामन्यांसाठी बांधण्यात आले होते. अमेरिकेत क्रिकेटला लोकप्रियता मिळवून देण्यासाठी ICC ने टी-२० विश्वचषक सामने न्यूयॉर्कमध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेतला होता. याशिवाय डॅलस (टेक्सास) आणि फ्लोरिडा या ठिकाणांचीही स्पर्धेतील सामन्यांसाठी निवड करण्यात आली. नासाऊ काउंटी स्टेडियम तयार करण्याबाबत अंतिम निर्णय सप्टेंबर २०२३ मध्ये झाला.
#WATCH | Nassau County, New York (USA): Bulldozers placed at the Nassau Cricket Stadium as the temporary stadium is set to be dismantled from tomorrow.
— ANI (@ANI) June 13, 2024
The T20 World Cup match between India and the US yesterday was played here. pic.twitter.com/iYsgaEOWlP
याआधी नॉर्थ कॅरोलिना येथील मॉरिसविलेबद्दलही चर्चा करण्यात आली होती. पण लॉजिस्टिक्स आणि पर्यावरणाचे कमी नुकसान यामुळे नासाऊ काउंटीची निवड करण्यात आली. न्यूयॉर्क शहरापासून ते खूप लांब आहे. टी-२० वर्ल्ड कपसाठी स्टेडियम बांधण्यासाठी आयसीसीने ही जागा भाडेतत्त्वावर घेतली होती.