Nepal fan jumps into swimming pool video viral : बांगलादेशने सोमवारी नेपाळविरुद्ध २१ धावांनी विजय मिळवत सुपर ८ साठी पात्रता मिळवली आहे. आता त्यांच्या खात्यात सहा गुण झाले आहेत. त्याचबरोबर त्यांचा नेच रन रेटही नेदरलँडपेक्षा चांगला झाला आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने १०७ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात नेपाळचा संघ केवळ ८५ धावाच करू शकला. दरम्यान या सामन्यातील नेपाळच्या एका चाहत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बांगलादेशच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेला नेपाळचा संघ १९.२ षटकांत ८५ धावा करून सर्वबाद झाला. नेपाळच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. मात्र फलंदाजांना विशेष काही करता आले नाही. कुशल मल्लाने ४० चेंडूत २७ धावा केल्या. दीपेंद्र सिंगने ३१ चेंडूत २५ धावा केल्या. सलामीवीर आसिफ शेख १७ धावा करून बाद झाला. त्याने ४ चौकार मारले. सलामीवीर कुशल भुरटेल अवघ्या ४ धावा करून बाद झाला. अशाप्रकारे संघाला २१ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले.

बांगलादेशच्या डावातील सहावे षटक टाकण्यासाठी नेदरलँड्सचा रोहित पडौल आला होता. त्याने आपल्या या षटकांतील चौथ्या चेंडूवर तौहीद हृदोय आपल्या जाळ्यात अडकवले. तौहीद हृदोय या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या नादात संदीप लामिछानेच्या हाती झेलबाद झाला. या विकेटनंतर नेपाळच्या एका चाहत्याच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्याने आनंदाच्या भरात स्विमिंग पूलमध्ये उडी मारत सेलिब्रेशन केले. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा –Team India : गौतम गंभीरचं नाव कोचपदासाठी शर्यतीत, राहुल द्रविडच्या जागी सांभाळणार टीम इंडियाची धुरा?

नेपाळच्या चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल –

हेही वाचा – T20 World Cup 2024 : रोमहर्षक लढतीत नेपाळला नमवत बांगलादेशने गाठली सुपर८ फेरी

बांगलादेश सुपर ८ साठी पात्र –

बांगलादेशने नेपाळला हरवून सुपर ८ मध्ये प्रवेश केला आहे. त्याने आतापर्यंत ४ सामने खेळले असून ३ जिंकले आहेत. यासोबतच एका सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. बांगलादेशचे ६ गुण आहेत. हा संघ ड गटात आहे. यासह दक्षिण आफ्रिका सुपर ८ मध्ये पोहोचली आहे. बांगलादेश सुपर ८ साठी पात्र ठरल्याने नेदरलँड्सचे स्वप्न भंगले आहे.

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nepal fan jumping into pool after towhid hridoys wicket video goes viral in ban vs nep match in t20 wc 2024 vbm