नेदरलँड्सने टी२० विश्वचषक मध्ये सुपर-१२ च्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे. मंगळवारी झालेल्या सामन्यात या संघाने नामिबियाचा पाच गडी राखून पराभव केला. संघाचा हा सलग दुसरा विजय आहे. यापूर्वी त्यांनी यूएईविरुद्धही विजय मिळवला होता. या सामन्यात प्रथम खेळताना नामिबियाने ६ बाद १२१ धावा केल्या.

वेगवान गोलंदाज बास डी लीडेने ३ षटकात १८ धावा देत २ बळी घेतले. प्रत्युत्तरात नेदरलँडने १९.३ षटकांत १२२ धावा करताना ५ गडी राखून लक्ष्य गाठले. पंजाबमध्ये जन्मलेल्या विक्रमजीत सिंगने नेदरलँडच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने ३१ चेंडूत ३९ धावा केल्या. त्याने पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारीही केली. लक्ष्याचा पाठलाग करताना मॅक्स ओडौड आणि विक्रमजीत सिंग यांनी नेदरलँडला चांगली सुरुवात करून दिली.दोघांनी पहिल्या विकेटसाठी ८.२ षटकांत ५९ धावा जोडल्या.

विक्रमजीतने आपल्या खेळीत ३ चौकार आणि २ षटकार ठोकले. यावेळी त्यांचा स्ट्राइक रेट १२६ चा होता. यानंतर ओडौड आणि बास डी लीडे यांनी धावसंख्या ९२ धावांवर नेली. औदौड ३५ चेंडूत ३५ धावा करून धावबाद झाला. जेजे स्मिथने १६व्या षटकात २ धक्के दिले. टॉम कूपर ६ आणि कॉलिन अकरमन शून्यावर बाद झाले.

नेदरलँड्सला शेवटच्या ४ षटकात २० धावांची गरज होती. १७ व्या षटकात डावखुरा वेगवान गोलंदाज जॉन फ्रायलिंकने एकही धाव न देता विकेट घेतली. स्कॉट एडवर्ड्स एक धाव काढून बाद झाला. १८ वे षटक वेगवान गोलंदाज डेव्हिड वेसने टाकले. त्याने ६ धावा दिल्या. यानतंर संघाला १२ चेंडूत १४ धावांची गरज होती. डावखुरा वेगवान गोलंदाज स्मितने १९ वे षटक टाकले आणि ८ धावा दिल्या. आता ६ चेंडूत ६ धावांची गरज होती. लीडेने पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकला आणि तिसऱ्या चेंडूवर २ धावा मिळवत संघाला विजय मिळवून दिला.

लीडेची अष्टपैलू कामगिरी –

लीडेने सामन्यात अष्टपैलू कामगिरी केली. ३० चेंडूत ३० धावा करत तो नाबाद राहिला. टीम प्रिंगलही ९ चेंडूत ८ धावा करून नाबाद राहिला. तत्पूर्वी, नामिबियाचा कर्णधार गेरहार्ड इरास्मसने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. संघाची सुरुवात चांगली झाली नाही. त्याने ३२ धावांत ३ गडी गमावले. जॉन फ्रायलिंकने ४८ चेंडूंत ४३ धावा करत संघाची धावसंख्या १०० च्या पुढे नेली. ज्यामध्ये एक षटकार आणि चौकाराचा समावेश आहे. त्यानंतर आलेल्या मायकेल व्हॅन लिंगेन या जोडीने कर्णधार इरास्मस अनुक्रमे २० आणि १६ धावा केल्या. नामिबियाकडून टीम प्रिंगलने ३ षटकात १५ धावा देत १ बळी घेतला. याशिवाय पॉल व्हॅन मीकेरेन, कॉलिन अकरमन आणि रोएलॉफ व्हॅन डर मर्वे यांनाही प्रत्येकी एक गडी बाद केला.

Story img Loader