Nicholas Pooran equals Yuvraj Singhs record : टी-२० विश्वचषक २०२४ चा ४० वा सामना वेस्ट इंडिज आणि अफगाणिस्तान यांच्यात खेळला गेला. नाणेफेक हारल्यानंतर फलंदाजीला आलेल्या वेस्ट इंडिज संघाने आक्रमक फलंदाजी करत २१८ धावांची मोठी धावसंख्या फलकावर लावली. प्रत्युत्तरात अफगाणिस्तानचा संघ स्फोटक ११४ धावांवर गारद झाला. या सामन्यात निकोलस पूरन (९८ धावा) याने आपल्या झंझावाती फलंदाजीने अफगाणिस्तानच्या गोलंदाजीला खिंडार पाडले. निकोलस पूरनच्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर वेस्ट इंडिजनेही विश्वविक्रम आपल्या नावावर केला, जो यापूर्वी नेदरलँडच्या नावावर होता. त्याचबरोबर निकोलस पूरनने युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी साधली आहे. त्याचबरोबर वेस्ट इंडिजने अफगाणिस्तानचा १०४ धावांनी पराभव केला.
निकोलस पूरनची वादळी खेळी –
अफगाणिस्तान संघासाठी अझमतुल्ला उमरझाईने तिसरे षटक टाकले. या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर निकोलस पुरनने षटकार ठोकला. त्यानंतर दुसरा चेंडू नो बॉल होता, ज्यावर चौकार मारला गेला. त्यामुळे अजमतुल्ला उमरझाई दडपणाखाली आला आणि त्याने तिसरा चेंडू वाईड टाकला, जो चौकार गेला. अशाप्रकारे, षटकात फक्त एक कायदेशीर चेंडू झाला आणि अझमतुल्लाहने १६ धावा दिल्या. ओव्हरच्या दुसऱ्या कायदेशीर चेंडूवर फ्री हिट असतानाही एकही धाव झाली नाही. त्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर चौकार मारले गेले. तिसऱ्या चेंडूवर लेगबायमधून चौकार आला. फलंदाज निकोलस पुरनने पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर षटकार ठोकला. अशा प्रकारे या षटकात त्याने एकूण ३६ धावा झाल्या.
अझमतुल्ला उमरझाईच्या षटकात याप्रमाणे ३६ धावा झाल्या –
पहिला चेंडू – षटकार मारला
दुसरा चेंडू – जो नो बॉल झाला, ज्यावर चौकार मारला गेला
त्यानंतर पुढचा चेंडू वाईड गेला, त्यावर चौकार आला.
दुसरा चेंडू – एकही धाव नाही
तिसरा चेंडू – लेगबायचा चौकार
चौथा चेंडू – चौकार मारला
पाचवा चेंडू – षटकार मारला
सहावा चेंडू – षटकार मारला
टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांतील एका षटकात सर्वाधिक धावा –
३६ – युवराज सिंग (भारत) विरुद्ध स्टुअर्ट ब्रॉड (इंग्लंड), डर्बन, २००७
३६ – किरॉन पोलार्ड (वेस्ट इंडिज) विरुद्ध अकिला धनंजय (श्रीलंका), कूलिज, २०२१
३६ – रोहित शर्मा आणि रिंकू सिंग (भारत) विरुद्ध करीम जनात (अफगाणिस्तान), बेंगळुरू, २०२४
३६ – दीपेंद्र सिंग ऐरी (नेपाळ) विरुद्ध कामरान खान (कतार), अल अमिराती, २०२४
३६ – निकोलस पूरन आणि जॉन्सन चार्ल्स (वेस्ट इंडीज) विरुद्ध अजमातुल्ला ओमरझाई (अफगाणिस्तान), सेंट लुसिया, 2024
वेस्ट इंडिजने केली विश्वविक्रमाची नोंद –
टी-२० विश्वचषकात पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रम वेस्ट इंडिजने नोंदवला आहे. अफगाण गोलंदाजांचा धुलाई करत वेस्ट इंडिज संघाने सामन्याच्या पहिल्या ६ षटकात ९२ धावा केल्या होत्या, जी कोणत्याही पॉवरप्लेमधील सर्वोच्च धावसंख्या आहे. यापूर्वी हा विक्रम नेदरलँडच्या नावावर होता. नेदरलँडने २०१४ मध्ये आयर्लंडविरुद्ध सिलहेटमध्ये फलंदाजी करताना पहिल्या ६ षटकात ९१ धावा ठोकल्या होत्या. जर आपण टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक धावसंख्येच्या विक्रमाबद्दल बोलायचे, तर या बाबतीत वेस्ट इंडिज चौथ्या स्थानावर आहे.
टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांत पॉवरप्लेमधील सर्वोच्च धावसंख्या –
१०२ – दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज, सेंच्युरियन, २०२३
९८/४ – वेस्ट इंडीज विरुद्ध श्रीलंका, कूलिज, २०२१
९३/० – आयर्लंड विरुद्ध वेस्ट इंडीज, सेंट जॉर्ज, २०२०
९१/१ – वेस्ट इंडिज विरुद्ध अफगाणिस्तान, ग्रोस आयलेट, २०२४