टी-२० विश्वचषक २०२२ चा २७ व्या सामन्यात न्यूझीलंड आणि श्रीलंका आमने-सामने आले आहेत. या सामन्यात न्यूझीलंड संघाने प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेला सामना जिंकण्यासाठी १६८ धावांचे लक्ष्य दिले आहे. एके काळी किवीज अडचणीत आले होते, पण त्यानंतर ग्लेन फिलिप्सने अशी खेळी खेळली ज्यासाठी विश्वचषकापेक्षा मोठा मंच असूच शकत नाही. त्याचबरोबर मिचेल सँटनरच्या एका षटकाराचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

फिलिप्सने आपल्या टी-२० कारकिर्दीतील दुसरे शतक आणि विश्वचषकातील पहिले शतक झळकावून चाहत्यांचे मनोरंजन केले. त्याने ६४ चेंडूत १० चौकार आणि ४ षटकार लगावत १०४ धावांची खेळी साकारली. यादरम्यान डॅरेल मिशेल आणि मिचेल सँटनर यांनीही फिलिप्सला चांगली साथ दिली.

या संपूर्ण सामन्यात फिलिप्सची खेळी हे मुख्य आकर्षण होते. परंतु किवी संघाच्या डावाच्या शेवटच्या षटकात सॅन्टनरनेही आपले हात मोकळे करताना या डावातील सर्वात शानदार शॉट खेळला. लाहिरू कुमाराच्या चेंडूवर सॅंटनरने बॅकफूटवर जाऊन जबरदस्त षटकार ठोकला.

हा षटकार २० व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर दिसला. जेव्हा लाहिरू कुमाराने एक वेगवान आणि शॉर्ट चेंडू स्टंपवर टाकला, परंतु सँटनर लेग-स्टंपच्या बाहेर जात बॅकवर्ड पॉइंटवर जबरदस्त षटकार मारला. बॅकफूटवरील त्याच्या षटकाराने प्रत्येक क्रिकेट चाहत्यांली मंत्रमुग्ध केले. आयसीसीनेही या षटकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून चाहत्यांनाही तो खूप आवडत आहे.

त्याचवेळी या सामन्याच्या महत्त्वाबद्दल बोलायचे झाले तर, दोन्ही संघांपैकी जोही संघ हा सामना जिंकेल, तो केवळ गुणतालिकेत नंबर वन बनणार नाही तर उपांत्य फेरीच्या दिशेने एक पाऊल टाकेल. अशा परिस्थितीत दोन्ही संघांमध्ये अटीतटीचा सामना होण्याची आशा आहे.

हेही वाचा – Round Bottom Bat : काय आहे राउंड बॉटम बॅट आणि त्याचे फायदे? धोनीच्या सांगण्यावरुन ‘हे’ दोन खेळाडू वापरतात ही बॅट, घ्या जाणून