ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी२० विश्वचषकात गुरुवारी (१० नोव्हेंबर) भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यान दुसरा उपांत्य फेरीचा सामना खेळला गेला. भारतीय संघाने सांघिक कामगिरीच्या जोरावर उभारलेल्या १६८ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने आपल्या दोन्ही सलामीवीरांच्या शानदार खेळीच्या जोरावर भारताला १० गडी राखून पराभूत करत अंतिम फेरीत जागा मिळवली. यासह भारतीय संघाचे दुसऱ्या टी२० विश्वविजेतेपदाचे स्वप्न अधुरे राहिले. पण इंग्लंड आणि पाकिस्तान हे दोन संघ अंतिम फेरीत एकमेकांशी भिडणार असल्याने १९९२ च्या इतिहासाची पुनरावृत्ती होणार का? असा प्रश्न सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
टी२० विश्वचषक जिंकण्याची शक्यता भारताची संधी तर आजच्या पराभवाने हुकली. मात्र भारताच्या या पराभवाने पाकिस्तानच्या बाजूने मोठा योगायोग जुळून आला आहे तो म्हणजे १९९२ च्या विश्वचषकाचा. २०२२ च्या टी२० विश्वचषकात शेवटच्या क्षणी नशिबाने साथ देत पाकिस्तानने उपांत्य फेरी गाठली. तीच घटना १९९२ च्या विश्वचषकातही पाकिस्तानसोबत घडली होती. १९९२ प्रमाणे २०२२ मध्येही ही स्पर्धा ऑस्ट्रेलियात होत आहे. १९९२ मध्ये पाकिस्तानने उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा पराभव केला होता. येथेही त्यांनी न्यूझीलंडचा पराभव केला. हे दोघेही विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतील संघ होते आणि अंतिम फेरीत १९९२ मध्ये पाकिस्तान चॅम्पियन झाला होता.
१९९२ मध्ये इंग्लंडला हरवून पाकिस्तानने पहिल्यांदा विश्वचषक जिंकला होता
विश्वचषक १९९२ च्या साखळी फेरीत पाकिस्तानला एकूण ८ सामने खेळावे लागले होते. त्याचा प्रवास पराभवाने सुरू झाला. पहिला सामना गमावल्यानंतर पाकिस्तानने दुसरा सामना जिंकला आणि तिसरा सामना रद्द झाला. यानंतर पाकिस्तानला चौथ्या आणि पाचव्या दोन्ही सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर पाकिस्तान साखळी फेरीतून बाहेर पडेल असे मानले जात होते. पण पाकिस्तानने सर्वांचे दावे खोटे ठरवले आणि साखळी फेरीतील सलग तीनही सामने जिंकून उपांत्य फेरीतील आपले स्थान पक्के केले. यानंतर उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा पराभव करून पाकिस्तानने अंतिम फेरीत आपले स्थान पक्के केले आणि त्यानंतर अंतिम सामन्यात इंग्लंडला पराभूत केल्यानंतर इम्रान खानच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने प्रथमच विश्वचषक जिंकला.
२०२२ टी२० विश्वचषकाचा प्रवास १९९२ च्या विश्वचषकासारखाच आहे
२०२२ च्या टी२० विश्वचषकातही पाकिस्तानची अवस्था १९९२च्या विश्वचषकासारखीच राहिली. येथेही साखळी फेरीतील सुरुवातीच्या दोन सामन्यांमध्ये पाकिस्तानला भारत आणि झिम्बाब्वेविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. सलग दोन सामने गमावल्यानंतर पाकिस्तानला स्पर्धेतून बाहेर पडण्याचा धोका होता. पण पाकिस्तानने असे पुनरागमन केले, ज्याची कोणालाच अपेक्षा नव्हती. नेदरलँड्स, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशला लागोपाठ तीन सामन्यांत पराभूत केल्यानंतर पाकिस्तानने प्रथम उपांत्य फेरीत धडक मारली आणि नंतर उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा पराभव करून अंतिम फेरी गाठली.