पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात टी२० विश्वचषक २०२२ चा अंतिम सामना रविवारी, १३ नोव्हेंबर रोजी मेलबर्नमध्ये खेळवला जात आहे. या जेतेपदाच्या लढाईपूर्वी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने गर्जना केली आणि तो म्हणतो की अंतिम सामन्यासाठी तो पूर्णपणे तयार आहे. भारताविरुद्धच्या उपांत्य फेरीत इंग्लंडने १० गडी राखून सामना जिंकला. बाबर आझमने जॉस बटलर आणि अॅलेक्स हेल्स यांच्या कामगिरीचे कौतुक करताना विरोधी संघाला इशारा दिला की त्यांचे गोलंदाजी आक्रमण जगातील सर्वोत्तम वेगवान आक्रमणांपैकी एक आहे.
सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत जोस बटलर म्हणाला, “इंग्लंड सर्वोत्तम संघांपैकी एक आहे. आम्ही त्याच्याविरुद्ध एक मालिका खेळली जी खूप स्पर्धात्मक होती. जोस बटलर आणि अॅलेक्स हेल्स यांनी उपांत्य फेरीत चांगली कामगिरी केली पण आम्ही अंतिम फेरीत आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू. आमच्याकडे सर्वोत्तम वेगवान आक्रमणांपैकी एक आहे आणि आम्ही आमच्या ताकदीवर टिकून राहण्याचा आणि आमच्या योजना अंमलात आणण्याचा प्रयत्न करू.”
भारत आणि झिम्बाब्वे यांच्याकडून सुरुवातीचे दोन सामने गमावून विश्वचषकातून बाद होण्याच्या मार्गावर असलेल्या पाकिस्तानची या स्पर्धेत चांगली सुरुवात झाली नाही. पण सुपर-१२ सामन्यांच्या शेवटच्या दिवशी नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मोठा अपसेट करत पाकिस्तानला पुनरागमनाची आणखी एक संधी दिली. त्यानंतर उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा पराभव करून पाकिस्तानने तिसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला.
हेही वाचा : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज उमरान मलिक न्यूझीलंड दौऱ्यासाठी सज्ज, फिटनेस व्हिडिओ व्हायरल
पाकिस्तान संघाच्या कामगिरीबद्दल बोलताना बाबर म्हणाला, “होय, आम्ही पहिले दोन सामने गमावले होते पण ज्या प्रकारे संघाने शेवटच्या चार सामन्यांमध्ये पुनरागमन केले आणि अतिशय चांगली कामगिरी केली ते विलक्षण आहे. गेल्या चार सामन्यांपासून आम्ही चांगले क्रिकेट खेळत आहोत. अंतिम फेरीतही हीच गती कायम ठेवण्याचा आमचा प्रयत्न असेल.”
टी२० विश्वचषक अंतिम सामन्यासाठी पाकिस्तानचा कर्णधार म्हणाला, “उत्साह तर आहेच! पण एक संघ म्हणून आम्ही चांगली कामगिरी केली आहे. आम्हाला विश्वास होता की आम्ही हे करू शकतो आणि आम्ही ते अंतिम फेरीत नेऊ. होय, दडपण आहे पण तुम्ही जितका जास्त दबाव कमी घ्याल तितकी चांगली कामगिरी कराल. एक संघ आणि कर्णधार म्हणून आम्ही स्वत:ला शांत ठेवत आहोत आणि एकमेकांवर विश्वास ठेवल्याने निकाल चांगला लागेल अशी आम्हाला अपेक्षा आहे.”