रविवारी (१३ नोव्हेंबर) टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत इंग्लंडचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. या मैदानावर दोन्ही संघ ३० वर्षांनंतर विश्वचषकात आमनेसामने येणार आहेत. पाकिस्तानने शेवटच्या वेळी १९९२ मध्ये एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात इंग्लंडला पराभूत करून विजेतेपद पटकावले होते. त्या विजयाचा हिरो इम्रान खान ठरला होता. आता बाबर आझमही तेच स्वप्न पाहत आहेत. आता प्रश्न असा पडतो की पाकिस्तान १९९२ च्या इतिहासाची पुनरावृत्ती करू शकणार की इंग्लंड बदला घेणार? ही येणारी वेळच सांगेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१९९२ चा विश्वचषकाची कहाणी –

हा पाचवा विश्वचषक होता. यापूर्वी १९७५ आणि १९७९ मध्ये वेस्ट इंडिजचा संघ चॅम्पियन बनला होता. भारताने १९८३ मध्ये आणि ऑस्ट्रेलियाने १९८७ मध्ये ही स्पर्धा जिंकली होती. १९९२ मध्ये नऊ संघांनी भाग घेतला होता. आठहून अधिक संघांनी विश्वचषकात प्रवेश करण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यापूर्वी चार स्पर्धांमध्ये प्रत्येकी आठ संघ सहभागी झाले होते. ऑस्ट्रेलिया प्रथमच या स्पर्धेचे यजमानपद भूषवत होता. तसेच न्यूझीलंड सह यजमान होते.

इंग्लंड दुसऱ्या तर पाकिस्तान चौथ्या क्रमांकावर होता –

ही स्पर्धा राऊंड रॉबिन प्रकारात होती. अशा स्थितीत सर्व संघांना एकमेकांविरुद्ध खेळावे लागले. न्यूझीलंड आठ सामन्यांत १४ गुणांसह अव्वल स्थानावर होता. त्यानंतर इंग्लंडकडे ११, दक्षिण आफ्रिकेकडे १० आणि पाकिस्तानचे ९ गुण होते. या चारही संघांनी उपांत्य फेरी गाठली. ऑस्ट्रेलिया पाचव्या, वेस्ट इंडिज सहाव्या, भारत सातव्या, श्रीलंका आठव्या आणि झिम्बाब्वे नवव्या स्थानावर होते.

पाकिस्तानने उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा पराभव केला होता –

उपांत्य फेरीत पाकिस्तानने न्यूझीलंडचा चार गडी राखून पराभव केला होता. न्यूझीलंडने ५० षटकात ७ विकेट गमावत २६२ धावा केल्या होत्या. वसीम अक्रम आणि मुश्ताक अहमद यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. इंझमान-उल-हकने ३७ चेंडूत ६० धावांची जबरदस्त खेळी करत पाकिस्तानला अंतिम फेरीत नेले. पाकिस्तानने ४९ षटकांत ६ बाद २६४ धावा केल्या. दुसऱ्या उपांत्य फेरीत इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेचा १९ धावांनी पराभव केला होता.

अंतिम फेरीत वसिम अक्रम हिरो ठरला –

आता फायनलची पाळी होती. पाकिस्तानचा कर्णधार इम्रान खानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. इम्रानच्या ११० चेंडूत ७२, जावेद मियांदादच्या ९८ चेंडूत ५८, इंझमामच्या ३५ चेंडूत ४१ आणि वसीम अक्रमच्या १८ चेंडूत ३३ धावांच्या जोरावर पाकिस्तानने ५० षटकांत ६ बाद २४९ धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा डाव ४९.२ षटकांत २२७ धावांत गुंडाळला गेला. मुश्ताक अहमद आणि वसीम अक्रम यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. आकिब जावेदला दोन आणि इम्रान खानला एक यश मिळाले. हा सामना जिंकून पाकिस्तान पहिल्यांदाच चॅम्पियन बनला.

पाकिस्तानसोबत १९९२ चा योगायोग कसा जुळला –

यावेळी नशिबाने साथ दिल्याने पाकिस्तानने अंतिम फेरी गाठली आहे. ११९२ च्या विश्वचषकातही पाकिस्तानचे असेच काहीसे घडले होते. १९९२ प्रमाणे २०२२ मध्येही ही स्पर्धा ऑस्ट्रेलियात होत आहे. १९९२ मध्ये पाकिस्तानने उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा पराभव केला होता. येथेही त्यांनी उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा पराभव केला आहे. दोन्ही विश्वचषकातील दुसऱ्या उपांत्य फेरीत इंग्लंड संघ खेळला.

त्याचप्रमाणे १९९२ च्या विश्वचषकात पाकिस्तानचा भारताकडून सिडनी येथे ४३ धावांनी पराभव झाला होता. येथेही भारताने त्याचा पराभव केला आहे. त्याचवेळी १९८७ च्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पाकिस्तानचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला होता. २०२१ च्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतही पाकिस्तानचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला आहे.

हेही वाचा – इंग्लंड-पाकिस्तान संयुक्त विजेते?; ट्वेन्टी-२० विश्वचषक अंतिम लढतीवर पावसाचे सावट

यावेळी इंग्लंडला बदला घेण्याची संधी –

इंग्लंडचा संघ यावेळी पाकिस्तानकडून बदला घेऊ शकतो. उपांत्य फेरीत भारताचा पराभव केल्यानंतर त्यांचे मनोबल उंचावले आहे. त्यांचे सर्व ११ खेळाडू फलंदाजी करू शकतात. शेवटच्या क्रमावर खेळणारा आदिल रशीदही उपयुक्त धावा करण्यात माहीर आहे. जोस बटलर आणि अॅलेक्स हेल्स तुफानी फॉर्मात आहेत. मधल्या फळीत फिल सॉल्ट, लियाम लिव्हिंगस्टोन, बेन स्टोक्स, हॅरी ब्रुक असे स्फोटक फलंदाज आहेत. त्याच वेळी, मोईन अली, ख्रिस वोक्स, सॅम करन आणि ख्रिस जॉर्डन टिच्चून मारा करण्यास सज्ज आहेत. गोलंदाजीत संघाकडे सात पर्याय आहेत. आता इंग्लंडचा संघ हा शेवटचा अडथळा पार करू शकतो की नाही हे पाहायचे आहे.

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pak vs eng final pakistan and england 1992 world cup journey will jos buttler team take revenge vbm
Show comments