मेलबर्नच्या ऐतिहासिक क्रिकेट मैदानावर इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान संघात टी-२० विश्वचषक २०२२ मधील फायनल सामना खेळला जाणार आहे. या सामन्याला दुपारी १:३० वाजता सुरुवात होणार आहे. तत्पुर्वी बाबर आझम आणि जोस बटलर यांच्यात १ वाजता नाणेफेक पार पडेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या अगोदर पाकिस्तान संघाने १९९२ मध्ये मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर इंग्लंडचा पराभव करून पहिले जागतिक विजेतेपद पटकावले होते. सध्याच्या टी-२० विश्वचषकाच्या फायनल सामन्यात त्याला या निकालाची पुनरावृत्ती करण्याची संधी मिळाली आहे. त्याचबरोबर इंग्लंड संघाला ३० वर्षांपूर्वीचा हिशोब चुकता करण्याची संधी असणार आहे.

टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम शर्यतीतून भारत आधीच बाहेर पडला आहे. टीम इंडियाला सेमीफायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध १० विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला होता. आता अंतिम फेरीत आज दुपारी १:३० वाजता इंग्लंडचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. हा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर होणार आहे.

इंग्लंड-पाकिस्तान संघांची हेड टू हेड आकडेवारी –

दोन्ही संघांनी प्रत्येकी एकदा टी-२० विश्वचषक जिंकला आहे. २००९ आणि २०१० च्या चॅम्पियन संघांमधील सामन्यापूर्वीची काही आकडेवारी पुढील प्रमाणे आहे –

इंग्लंड आणि पाकिस्तान ३० वर्षांनंतर पुन्हा एकदा विश्वचषकाच्या फायनलमध्ये भिडणार आहेत.
पाकिस्तानने १९९२ मध्ये एमसीजी मैदानावर इंग्लंडचा २२ धावांनी पराभव करून त्यांचा एकमेव एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता.
१९९२ च्या विश्वचषकाप्रमाणे यावेळीही पाकिस्तानचा संघ न्यूझीलंडला हरवून अंतिम फेरीत पोहोचला आहे.
टी-२० विश्वचषकात इंग्लंड आणि पाकिस्तान दोनदा आमनेसामने आले आहेत. दोन्ही वेळा इंग्लंडने विजयाची चव चाखली आहे.
एकदिवसीय विश्वचषकात, दोघांमधील १० सामन्यांत विजयाच्या बाबतीत इंग्लंज पाकिस्तानच्या ५-४ ने पुढे आहे. एका सामन्याचा निकाल लागला नाही.
दोन्ही संघांना सुपर १२ टप्प्यात कमकुवत संघांविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. पाकिस्तानला झिम्बाब्वेने तर इंग्लंडला आयर्लंडने पराभूत केले होते.
टी-20 विजय-पराजयाच्या बाबतीत इंग्लंडचा संघ पाकिस्तानपेक्षा १८-९ ने पुढे आहे. एका सामन्याचा निकाल लागला नाही.
या दोन्ही संघांनी प्रतिष्ठित मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर एकही टी-२० आंतरराष्ट्रीय सामना जिंकलेला नाही.
खेळाच्या या सर्वात लहान आंतरराष्ट्रीय फॉर्मेटमध्ये, इंग्लंडविरुद्ध पाकिस्तानची सर्वोच्च धावसंख्या २३२ आहे आणि सर्वात कमी धावसंख्या ८९ धावा आहे.

हेही वाचा – भर कार्यक्रमात ‘हा’ प्रश्न विचारताच लाइव्ह टीव्हीवर ढसाढसा रडला शोएब मलिक, पाहा व्हिडिओ

पाकिस्तानविरुद्ध इंग्लंडची सर्वोच्च धावसंख्या २२१ आणि सर्वात कमी १३५ धावा आहे.
कर्णधार बाबर आझम (५६०) याने इंग्लंडविरुद्ध पाकिस्तानकडून सर्वाधिक टी-२० आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत.
या वर्षी सप्टेंबरमध्ये कराचीमध्ये ६६ चेंडूत नाबाद ११० धावा केल्या होत्या.
हॅरिस रौफने इंग्लंडविरुद्ध पाकिस्तानकडून सर्वाधिक (१४) विकेट घेतल्या आहेत. इंग्लंडकडून ग्रॅम स्वान आणि आदिल रशीद यांनी १७-१७ विकेट्स घेत आघाडीवर आहे.

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pak vs eng head to head war for the title in england pakistan who is dominant in stats vbm
Show comments