टी-२० विश्वचषक २०२२ मधील अंतिम सामना आज इंग्लंड आणि पाकिस्तान संघात मेलबर्न येथे खेळला जात आहे. या सामन्याची नाणेफेक जिंकून इंग्लंडने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पाकिस्तान संघाने प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडला १३९ धावांचे लक्ष्य दिले आहे. या सामन्यात सॅम करनने पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिझवानला बाद करून एक विक्रम केला आहे.

मोहम्मद रिझवान आणि बाबर आझम यांनी अंतिम फेरीत चांगली सुरुवात केली पण सॅम करनने पाचव्या षटकात ही जोडी फोडली. रिझवान १५ चेंडूत १४ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. रिझवान बाद झाल्याने सॅम कुरन टी-२० विश्वचषकात इंग्लंडकडून सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्याचबरोबर त्याने शान मसूद आणि मोहम्मद नवाजला देखील बाद केले.

आयसीसी टी-२० फलंदाजांच्या क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेला मोहम्मद रिझवान २०२२ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत त्याच्या क्षमतेनुसार सर्वोत्तम कामगिरी करू शकला नाही. सॅम कुरनने त्याला विजेतेपदाच्या सामन्यात बोल्ड करून टी-२० विश्वचषकात इंग्लंडकडून सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज बनला. सॅम करनने आता १३ विकेट्स घेतल्या आहेत. याआधी रायन साइडबॉटमने इंग्लंडकडून टी-२० विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स घेतल्या होत्या. २०१० च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत त्याने १० विकेट घेतल्या आणि यादरम्यान इंग्लंड विश्वविजेता ठरला.

हेही वाचा – PAK vs ENG Final: पाकिस्तानचा ‘हा’ गोलंदाज करायचा सेल्समनचे काम, आता घालतोय विश्वचषकात धुमाकूळ

टी-२० विश्वचषकात इंग्लंडकडून सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज –

१३ सॅम करन (२०२२)*
१० रायन साइडबॉटम (२०१०)
१० ग्रॅम स्वान (२०१०)
१० डेव्हिड विली (२०१६).

Story img Loader