इंग्लंड विरुद्ध पाकिस्तानदरम्यान खेळवल्या जात असलेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम कॉट अॅण्ड बोल्ड झाला आहे. इंग्लंडचा फिरकीपटू अदील रशीदने भन्नाट फिरकी गोलंदाजीवर बाबरला तंबूत परत धाडलं. पाकिस्तानची सलामीची जोडी तुलनेनं लवकर फोडण्यात इंग्लंडच्या गोलंदाजांना यश आल्यानंतर पाकिस्तानचा दुसरा गडीतील लगेचच तंबूत परतला. त्यानंतर डावाला आकार देण्याचा प्रयत्न करणाऱ्या बाबबरला रशीदने आपल्या फिरकीच्या जाळ्यात गुंडाळलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय इंग्लंडने घेतला. पाकिस्तानच्या संघाने संयमी सुरुवात करत पहिल्या चार षटकांमध्ये २९ धावांपर्यंत मजल मारली. मात्र चौथ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर सॅम करनचा चेंडू टोलवण्याच्या नादात मोहम्मद रिझवान बोल्ड झाला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेला मोहम्मद हॅरिसही १२ चेंडूत मैदानात टिकला. सामन्याच्या आठव्या षटकामध्ये संघाची धावसंख्या ४५ वर असताना हॅरीस रशीदच्या फिरकीवर बेन स्ट्रोक्सकरवी झेलबाद झाला.

दोन गडी बाद झाल्यानंतर शान मसुद आणि बाबर आझमच्या भागीदारीचा पाया रचला जात असतानाच १२ व्या षटकामध्ये रशीदने पुन्हा एकदा पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली. विशेष म्हणजे थेट पाकिस्तानचा सेट बॅट्समन असलेल्या बाबरलाच रशीदने आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवला. रशीदने टाकलेला चेंडू टप्पा पडून अचानक लेग स्टम्पकडे वळला. चेंडू लेग साईडला टोलवण्याच्या नादात बाबरने बॅकफूटवर जात शॉट मारला. मात्र चेंडू बॅटची कड घेऊन रशीदच्या दिशेनेच उडाला. राशीदनेही झेप घेत अप्रतिम झेल टीपला.

२८ चेंडूंमध्ये ३२ धावांची खेळी करुन बाबर तंबूत परतला.

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pak vs eng world cup final video adil rashid gets babar azam caught and bowled for 32 scsg
Show comments