PAK Vs NED: पाकिस्तानी संघाचा कर्णधार बाबर आझमसाठी आजचा नेदरलँड विरुद्ध अत्यंत महत्त्वाचा आहे. जर पाकिस्तानला टी २० विश्वचषकात आपले स्थान कायम ठेवायचे असेल तर आजचा सामना उत्तम रन रेटने जिंकण्याची गरज आहे. पाकिस्तानी गोलंदाजांच्या समोर नेदरलँडचा संघ फार टिकू शकला नाही. २० षटकात पाकिस्तानने नेदरलँडला १०० धावा सुद्धा पूर्ण करण्याची संधी दिली नाही. अवघ्या ९२ धावांचे लक्ष्य घेऊन पाकिस्तानी सलामीवीर बाबर आझम व मोहम्मद रिझवान हे मैदानात उतरले. दुबळ्या नेदरलँडसमोर आझम- रिझवान कमाल करून दाखवतील अशी अपेक्षाच नव्हे तर जवळपास खात्रीच पाकिस्तानी चाहत्यांना होती मात्र याही वेळेस बाबर आझम आपला खेळ दाखवण्यात अपयशी ठरला आहे.
बाबर आझम मैदानावर केवळ ५ बॉल खेळला त्यातील एका चेंडूवर एक चौकार ठोकून त्याने उत्तम सुरुवात केली पण लगेचच नेदरलँडच्या वान देर मिरवे याच्या गोलंदाजीवर बाबर धावबाद झाला. पुन्हा एकदा खात्यात फक्त ४ धावा घेऊन पाकिस्तानच्या कर्णधाराला नेदरलँडच्या संघाने तंबूत धाडले. बाबर आझमच्या या खेळामुळे ट्विटरवर अनेकांनी त्याला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.मागील काही सामन्यांमधील बाबर आझमचा खेळ पाहता ‘रावळपिंडी एक्स्प्रेस’ शोएब अख्तर यांच्यासह अनेक पाकिस्तानी दिग्गज्जांनी बाबरला सलामीवीर म्हणून मैदानात न उतरण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र बाबरने हट्टाने घेतलेले निर्णय पाकिस्तानी संघाला महाग पडत आहेत असेही क्रिकेटप्रेमींनी पोस्ट केले आहे.
बाबर आझमच्या खेळावर नेटकरी भडकले
विराट कोहलीचा फोटो होतोय शेअर
दरम्यान, आजच्या पाकिस्तान विरुद्ध नेदरलँड सामन्यात पाकिस्तानचा दुसरा सलामीवीर मोहम्मद रिझवान उत्तम फॉर्ममध्ये आहे. रिजवानने ९२ धावांपैकी ४९ धावा स्वतः पूर्ण केल्या आहेत.आज भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामनाही पाकिस्तानी चाहत्यांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. ३० ऑक्टोबरला सकाळी बांग्लादेश विरुद्ध झिम्बाम्बावे सामन्यात बांग्लादेश जिंकल्याने पाकिस्तानचा विश्वचषकात निभाव लागण्याची शक्यता वाढली आहे.