PAK vs ZIM Sikandar Raza Highlights: टी २० विश्वचषकात झिम्बाम्बावेने धमाकेदार खेळाचे प्रदर्शन करून जगभरातील क्रिकेटप्रेमींना पर्वणीच दिली. पाकिस्तान विरुद्ध झिम्बाम्बावे हा सामना इतका रंजक व अटीतटीचा ठरला की अगदी शेवटच्या चेंडुवरही कोण जिंकणार याचा अंदाज लावणे कठीण होते, अखेरीस शेवटच्या चेंडूवर धाव बाद करून झिम्बाम्बावेने अवघ्या एका धावेच्या फरकाने विजय मिळवला. सिकंदर रझा हा कालच्या सामन्यात चार षटकात २५ धावा देत ४ बळी घेऊन झिम्बाम्बावेच्या विजयाचा हिरो ठरला. सिकंदर रझाचा सामन्यातील एक क्षण समोर येत आहे. यामध्ये सिकंदर झिम्बाम्बावेच्या यष्टिरक्षकाला सामन्यातच काहीतरी खुणवताना दिसत आहे. यावरून रझाने स्वतःच उत्तर देत झिम्बाम्बावेचा यष्टिरक्षक क्रेग एर्विन याच्याशी लागलेल्या एका पैजेविषयी सांगितले आहे.
टी २० विश्वचषक सुपर १२ मधील पाकिस्तान विरुद्ध झिम्बाम्बावे सामना खऱ्या अर्थानं हाय व्होल्टेज ठरला. याच सामन्यात झिम्बाम्बावेचा यष्टिरक्षक क्रेग व कालच्या सामन्यातील सामनावीर सिकंदर रझा यांच्यात खुणवाखुणवी होताना दिसली. सामना संपल्यावर रझाला याबाबत विचारणा केल्यावर त्याने दिलेले उत्तर आता खास ठरत आहे.
सिकंदर रझाने मैदानात का केली खुणवाखुणवी?
रझाने सांगितले की, “ऑस्ट्रेलियाला येत असताना झिम्बाम्बावेचा कर्णधार व यष्टीरक्षक क्रेग एर्विनने पैज लावली होती जर पाकिस्तान विरुद्ध सामन्यात त्याला सामनावीर म्हणून पुरस्कार मिळाला असता तर त्याला हवं ते घड्याळ मी विकत घेऊन देणार आणि जर मी सामनावीर ठरलो तर तो क्रेग मला घड्याळ घेऊन देणार. याच पैजेची आठवण करून देण्यासाठी मी त्याला मनगटावर टॅप करून दाखवत होतो की आता तू मला तीन घड्याळ द्यायला हवे”.
झिम्बाम्बावेचा कर्णधार म्हणतो, “आता माझं दिवाळं..
झिम्बाब्वेच्या कर्णधाराला याबद्दल विचारण्यात आले तेव्हा एर्विन म्हणाला, “रझाने महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या. आतापर्यंत त्याला तीन सामनावीर मिळाले आहेत त्यामुळे आता पुन्हा घरी जाईपर्यंत माझं अक्षरशः दिवाळं निघणार आहे”
दरम्यान, पाकिस्तानला हरवून सुपर १२ मध्ये सामन्यात चमकल्याचा आनंद एर्विन व सिकंदर रझा यांच्या डोळ्यातही दिसून आला. झिम्बाम्बावेने आतापर्यंत खूप मेहनत केली आहे आणि आता जेव्हा टॉपच्या खेळाडूंसमोर अशी कामगिरी करून दाखवली तेव्हा खरंच आनंद होतो असे एर्विनने सामन्यानंतर बोलूनही दाखवले .
PAK vs ZIM: विराट कोहलीचा रेकॉर्ड मोडून सिकंदर रझा ठरला नंबर १! पाकिस्तानला हरवून रचला ‘हा’ विक्रम
आतापर्यंत, झिम्बाब्वे सुपर १२ गुणतालिकेत दक्षिण आफ्रिकेच्या बरोबरीने होता मात्र आता आता दोन सामन्यांतून तीन गुण मिळवून झिम्बाब्वे तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. तर पाकिस्तान सलग दोन सामने हारून गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे.