T20WC Virat Kohli Record Break: भारतानंतर झिम्बाब्वेनेही पाकिस्तानचा पराभव करून आज अवघ्या ऑस्ट्रेलियामध्ये अत्यंत तुफान खेळी दाखवली आहे. अवघ्या १३१ धावांचे लक्ष्य सुद्धा बाबर आझमच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पाकिस्तानी संघाला पूर्ण करता आले नाही. पाकिस्तान विरुद्ध या सामन्यात झिम्बाब्वेचा सिकंदर रझा याने चार षटकात केवळ २५ धावा देऊन तीन बळी घेतले होते. या दमदार खेळासाठी सिकंदर रझाला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. या सामनावीर पुरस्कारासह आता सिकंदर रझाने भारतीय स्टार खेळाडू विराट कोहलीला सुद्धा मागे टाकले आहे.
टी २० विश्वचषकात आज पाकिस्तान विरुद्ध झिम्बाम्बावे सामना अगदी अटीतटीचा ठरला. यावेळी शादाब खान आणि हैदर अली या दोघांना सिकंदरने एकाच षटकात तंबूत धाडल्याने पाकिस्तानवरील दबाव वाढला. पाकिस्तान अगदी शेवटच्या चेंडूवर एका धावेने पराभूत झाला. सिंकदरने या दमदार कामगिरीसाठी वर्षातील आपला सातवा सामनावीर पुरस्कार जिंकला आहे.
सर्वाधिक सामनावीराचे पुरस्कार जिंकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत यंदा म्हणजेच २०२२ मध्ये विराट कोहली टॉपला होता. विराट २०२२ या वर्षात टी २० सामन्यांमध्ये एकूण सहा वेळा सामनावीर ठरला आहे. तर आजच्या सामन्यानंतर सिकंदर रझा हा यादीत टॉपला पोहोचला आहे.
सिकंदर रझाने विराट कोहलीचा रेकॉर्ड मोडला
आज भारत विरुद्ध नेदरलँड सामन्यात विराट कोहलीनेही अर्धशतक पूर्ण करून ख्रिस गेलचा विक्रम मोडीत काढला आहे. विराट कोहली आज टी २० विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे.
PAK vs ZIM Video: सिकंदर रझाने सकाळी रिकी पॉंटिंगचे ‘ते’ शब्द ऐकले अन सामन्यात पाकिस्तानला..
दरम्यान, सिकंदर रझाने सामनावीराचा पुरस्कार स्वीकारताना आपल्या आजच्या खेळाचे श्रेय माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू व विद्यमान टीम ऑस्ट्रेलियाचा प्रशिक्षक रिकी पॉंटिंग याला दिले आहे. पाकिस्तानने टी-२० वर्ल्डकपमध्ये आतापर्यंतचे दोन्ही सामने गमावले आहेत. कट्टर प्रतिस्पर्धी भारतासमोर हरल्यावर पाकिस्तानला झिम्बाम्बावेनेही आता धूळ चारली आहे.