पाकिस्तान क्रिकेट संघावर वेस्ट इंडिज-अमेरिकेत सुरू असलेल्या ट्वेन्टी२० वर्ल्डकप स्पर्धेत नवख्या अमेरिकेविरुद्ध पराभवाची नामुष्की ओढवली. रविवारी पारंपरिक प्रतिस्पर्धी भारताविरुद्ध खेळणार असलेल्या पाकिस्तानच्या वर्ल्डकप मोहिमेची सुरुवात अनपेक्षित पराभवाने झाली आहे. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना १५९ धावांचीच मजल मारली. अनेकविध देशातून अमेरिकेत स्थायिक झालेल्या खेळाडूंचा भरणा असलेल्या अमेरिकेने शिस्तबद्ध खेळ करत १५९ धावा केल्या आणि सामना टाय झाला. सुपर ओव्हरमध्ये अमेरिकेने १८ धावा केल्या. स्वैर गोलंदाजी आणि अगम्य क्षेत्ररक्षणाचा पाकिस्तानला फटका बसला. पाकिस्तानला हे लक्ष्य मानवलं नाही आणि त्यांना १३ धावाच करता आल्या.

डल्लासमधल्या ग्रँड प्राइरे स्टेडियमवर झालेल्या लढतीत अमेरिकेच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. आक्रमक फटकेबाजीसाठी प्रसिद्ध मोहम्मद रिझवानला मुंबईकर सौरभ नेत्रावळकरने दुसऱ्याच षटकात माघारी धाडलं. रिझवानला ९ धावाच करता आल्या. उस्मान खान अवघ्या ३ धावा करुन केनिंगेची शिकार ठरला. फखर झमान आणि बाबर आझम यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानात जन्मलेल्या, तिथे क्रिकेट खेळलेल्या अली खानने फखरला बाद केलं. त्याने ११ धावा केल्या. यानंतर बाबर आझमला शदाब खानची साथ लाभली. खेळपट्टीवर स्थिरावलेल्या शदाबला केनिंगेने माघारी धाडलं. त्याने एक चौकार आणि ३ षटकारासह २५ चेंडूत ४० धावांची खेळी केली. वादळी खेळीसाठी प्रसिद्ध आझम खान भोपळाही न फोडता तंबूत परतला. केनिंगनेच त्याला बाद केलं. सहकारी बाद होत असताना एका बाजूने किल्ला लढवणाऱ्या कर्णधार बाबर आझमची खेळी जसदीप सिंगने संपुष्टात आणली. त्याने ३ चौकार आणि २ षटकारासह ४४ धावांची खेळी केली. हाणामारीच्या षटकात पाकिस्तानला इफ्तिकार अहमदकडून अपेक्षा होत्या. पण तो १४ चेंडूत १८ धावांची खेळी करुन तंबूत परतला. वेगवान गोलंदाज शाहीन शहा आफ्रिदीने १६ चेंडूत एक चौकार आणि २ षटकारासह नाबाद २३ धावा केल्या. या खेळीमुळेच पाकिस्तानने दीडशेचा टप्पा ओलांडला. अमेरिकेकडून नोशतुथ केनिंगेने ३ तर सौरभ नेत्रावळकरने २ विकेट्स पटकावल्या.

india exports contract 1 percent in december 2024
डिसेंबरमध्ये देशाच्या निर्यातीत घसरण; नेमके कारण काय?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Why Rohit Sharma Will Visit Pakistan Ahead of ICC Champions Trophy 2025 According To Reports
Champions Trophy: रोहित शर्माला चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी पाकिस्तानला का जावं लागणार? का सुरू आहे चर्चा? वाचा कारण
India successfully tests anti tank missile Nag Mk 2
शत्रूचा थरकाप उडवणाऱ्या ‘नाग’ क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी; पाकिस्तान-चीनच्या कारवायांना चाप बसणार?
Will Pakistan lose hosting rights of Champions Trophy cricket tournament
चँपियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तान गमावणार? भारताच्या दबावाचा किती परिणाम?
PCB confident about stadium renovation assures that preparations for Champions Trophy are on track
स्टेडियम नूतनीकरणाबाबत ‘पीसीबी’ निश्चिंत; चॅम्पियन्स करंडकाची तयारी प्रगतिपथावर असल्याची ग्वाही
1.5 lakh Pakistan government jobs
एका झटक्यात गेल्या दीड लाख सरकारी नोकऱ्या; पाकिस्तान अभूतपूर्व संकटात, नेमकं घडतंय तरी काय?
Pakistan preparations for Champions Trophy slow sport news
चॅम्पियन्स करंडकाची तयारी पाकिस्तानकडून संथगतीने; बहुतेक केंद्रांचे नूतनीकरण अपूर्णच

प्रत्युत्तरादाखल खेळताना स्टीवन टेलर आणि मोनाक पटेल जोडीने ३६ धावांची चांगली सलामी दिली. नसीम शहाने स्टीव्हनला बाद केलं. त्याने १३ धावा केल्या. स्टीव्हन बाद झाल्यानंतर मोनाकला अँड्रियस गौसची साथ मिळाली. या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी ४८ चेंडूत ६८ धावांची खणखणीत भागीदारी केली. हारिस रौफने गौसला त्रिफळाचीत करत ही जोडी फोडली. त्याने २६ चेंडूत ५ चौकार आणि एका षटकारासह ३५ धावांची खेळी केली. मोनाक सूत्रधाराची भूमिका निभावत होता. मोहम्मद आमिरच्या ऑफकटरने मोनाकला चकवलं. त्याने ३८ चेंडूत ७ चौकार आणि एका षटकारासह ५० धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. मोनाक बाद झाल्यानंतर अमेरिकेची धावगती मंदावली. जोन्सने २६ चेंडूत २ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ३६ धावांची खेळी केली. शेवटच्या षटकात अमेरिकेला १५ धावांची आवश्यकता होती.

पहिल्या तीन चेंडूत केवळ ३ धावा झाल्या. चौथ्या चेंडूवर जोन्सने जोरदार षटकार लगावला. पुढच्या चेंडूवर एक धाव निघाली. शेवटच्या चेंडूवर नितीश कुमारने मारलेला फटका चौकार गेला आणि सामना टाय झाला. नितीशने १४ धावांची खेळी केली.

पाकिस्तानद्वारे मोहम्मद आमिरने सुपर ओव्हर टाकायचा निर्णय झाला. पण अत्यंत गचाळ क्षेत्ररक्षण आणि स्वैर गोलंदाजी यामुळे अमेरिकेच्या फलंदाजांनी १८ धावा कुटल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना सौरभ नेत्रावळकरच्या गोलंदाजीसमोर पाकिस्तानने नांगी टाकली. इफ्तिकारने एक चौकार लगावत आशा पल्लवित केल्या. पण सौरभच्या डोक्यावरून मोठा फटका खेळायचा इफ्तिकारचा प्रयत्न नितीशच्या अफलातून झेलमुळे यशस्वी झाला नाही. फटकेबाजीसाठी प्रसिद्ध फलंदाज संघात असतानाही शदाब खानला फलंदाजीसाठी पाठवण्यात आलं. पण सौरभने टिच्चून मारा करत अमेरिकेला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.

Story img Loader