विश्वचषक टी-२० क्रिकेट स्पर्धेत भारताने बुधवारी बांगलादेशाचा संघर्षपूर्ण लढतीत ५ धावांनी पराभव करत उपांत्यफेरीतील मार्ग सुखकर केला असला तरी इतर संघांच्या कामगिरीवर भारताचा प्रवेश निश्चित होणार आहे. त्यापैकी अत्यंत महत्त्वाचा सामना आज पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान खेळवला जात आहे. या सामन्यामधून पाकिस्तानचं या स्पर्धेतील भवितव्य ठरणार आहे. अप्रत्यक्षपणे भारतावरही या सामन्याच्या निकालाचा परिणाम होणार असून सध्या दुसऱ्या गटामधील गुणतालिका कशी आहे आणि या सामन्यानंतर जर-तरची नेमकी काय शक्यता आहे हे जाणून घेऊयात..

नक्की वाचा >> गोलंदाजाच्या हाताने स्टम्प पडल्यानंतरही कार्तिकला Ind vs Ban सामन्यात धावबाद घोषित का केलं? समजून घ्या यामागील कारण

We always learn from a T20I Game Says Suryakumar Yadav after defeat against England in 3rd T20I
IND vs ENG : ‘…म्हणून पराभव पदरी पडला’, सूर्यकुमार यादवने सांगितला राजकोट सामन्यातील टर्निंग पॉइंट
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
veer pahariya
राजकारणाऐवजी बॉलीवूड का निवडलं? महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांचा नातू वीर पहारिया म्हणाला…
WTC Points Table Pakistan Finish Last After West Indies Defeat in Multan Test as Spin Plan Backfires
WTC Points Table: पाकिस्तानला लाजिरवाण्या पराभवानंतर अजून एक धक्का, WTC गुणतालिकेत पहिल्यांदाच…
West Indies Beat Pakistan by 120 Runs Records Historic Win at Multan Test After 35 Years
PAK vs WI: वेस्ट इंडिजचा पाकिस्तानवर ३५ वर्षांनी ऐतिहासिक कसोटी विजय, यजमान स्वत:च्याच जाळ्यात अडकले; सामन्यात नेमकं काय घडलं?
Tilak Verma and Suryakumar Yadav victory celebration video goes viral after India won Chepauk
Tilak Verma : तिलकच्या वादळी खेळीने जिंकलं सूर्याचं मन, वाकून सलाम करतानाचा VIDEO होतोय व्हायरल
Tilak Varma Scores Most T20I Runs in Between Two Dismissals Broke Mark Chapman Record
IND vs ENG: तिलक वर्माने घडवला इतिहास, टी-२० मध्ये नाबाद राहत केल्या इतक्या धावा; ‘ही’ कामगिरी करणारा पहिला फलंदाज
India Beat England by 2 Wickets Tilak Varma Fifty Ravi Bishnoi Washington Sundar
IND vs ENG: भारताचा विजयी ‘तिलक’, नाट्यमय लढतीत इंग्लंडवर केली मात; बिश्नोईची साथ ठरली निर्णायक

सध्या दुसऱ्या गटामध्ये भारत अव्वल स्थानी आहे. चारपैकी एका सामन्यात पराभव झाल्याने भारताच्या नावावर सहा गुण असून भारताचा नेट रन रेट हा +०.७३० इतका आहे. नेट रन रेटच्याबाबतीत पाकिस्तान भारताच्या पुढे आहे. पाकिस्तानच्या नावावर दोन गुण असले तरी दोन्ही सामने त्यांनी अंतीम चेंडूवर गमावल्याने त्याचा नेट रन रेट भारताहून ०.०३५ ने अधिक सरस आहे. प्रत्येक गटामधून दोन संघ उपांत्यफेरीसाठी पात्र ठरणार आहे. दक्षिण आफ्रिकेचा नेट रन रेट हा २.७७२ इतका असून एक सामना न झाल्याने वाटून दिलेला गुण आणि दोन सामन्यांमधील विजयामुळे त्यांचे एकूण पाच गुण आहेत. पात्रतेच्या फेरीमध्ये बांगलादेशही शर्यतीत दिसत आहे. बंगलादेशच्या नावावर चार गुण असून त्यांचा नेट रन रेट हा उणे १.२७६ इतका आहे. या स्पर्धेमध्ये दुसऱ्या गटातून झिम्बाब्वे आणि नेदरर्लण्ड्स बाहेर पडल्यात जमा आहे.

नक्की वाचा >> Ind vs Ban: बॅट, बॉलऐवजी हातात ब्रश घेत ‘त्याने’ भारतीय संघाला जिंकून दिला सामना; जाणून घ्या या व्यक्तीनं नेमकं केलं तरी काय

पाहा T20 World Cup Points Table Group 2:

…तर पाकिस्तान निव्वळ धावगतीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेलाही मागे टाकेल
बांगलादेशवर संघर्षपूर्ण विजय मिळविल्यानंतर भारताचा उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित नाही, तर फक्त सुकर झाला आहे. उपांत्य फेरीतील प्रवेशावर शिक्कामोर्तब करण्यासाठी भारताला झिंम्बाब्वेवर विजय आवश्यक आहे. भारत सध्या गटात आघाडीवर आहे. पाकिस्तानला अजून आशा आहेत. पण, त्यांना दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशवर मोठे विजय आवश्यक आहेत.

नक्की पाहा >> Ind vs Ban: के. एल. राहुलचा हा थ्रो ठरला सामन्याचा टर्निंग पॉइंट; Rain Break नंतर दुसऱ्याच चेंडूवर काय घडलं पाहा Video

अर्थात, पाकिस्तान गुरुवारी दक्षिण आफ्रिकेकडून पराभूत झाल्यास भारताचा उपांत्य फेरीतील प्रवेशाला बळकटी मिळेल आणि पाकिस्तानचे आव्हान संपुष्टात येईल. मात्र त्याचवेळी दक्षिण आफ्रिकाही सात गुणांसहीत भारताच्याही पुढे जाईल. म्हणजेच आजचा सामना आफ्रिकेने जिंकला तर भारताची गुणतालिकेमध्ये दुसऱ्या स्थानी घसरण होईल. त्याचवेळी पाकिस्तानच्या पराभवामुळे झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यामध्ये भारतावर कमी प्रेशर असेल. मात्र पाकिस्तानने सुपर १२ फेरीतील आपले दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकले आणि झिम्बाब्वेने रविवारी भारताला हरवले तर सरस धावगती राखल्यास पाकिस्तान गुणतक्त्यात भारताच्या पुढे जाईल. मात्र आजच्या सामन्यानंतर गुणांच्या आधारे तरी पाकिस्तान भारताच्या खालीच असेल. मात्र दोन्ही सामने जिंकल्यास त्यांचे एकूण सहा गुण होतील आणि ते भारताहून सरस ठरतील.

नक्की वाचा >> Ind vs Ban: पाऊस सुरु होण्याच्या तीन चेंडूंआधी विराटच्या त्या एका कृतीमुळे भारताने गमावला असता सामना? ‘त्या’ धावा चर्चेत

नेदरलॅंड्सनी अखेरच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला हरवले किंवा पावसामुळे सामनाच झाला नाही, तर पाकिस्तान निव्वळ धावगतीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेलाही मागे टाकू शकेल. बांगलादेशने पाकिस्तानला हरवल्यास ते देखील स्पर्धेत राहतील. पण, त्यासाठी झिम्बाब्वेने भारताला हवरणे आवश्यक असेल. अर्थात, अशा वेळी बांगलादेशला निव्वळ धावगतीचा फटका बसू शकतो.

नक्की पाहा >> Ind vs Ban: बांगलादेशने दिनेश कार्तिकची विकेट ढापली? ‘थर्ड अंपायर आंधळा आहे का?’ चाहत्यांचा Video शेअर करत प्रश्न

भारताचा एकमेव सामना शिल्लक
भारताच्या हातात आता रविवारी होणारा झिम्बाब्वेविरुद्धचा एकमेव सामना शिल्लक आहे. झिम्बाब्वेला लिंबू-टिंबू संघ समजणं पाकिस्तानप्रमाणे भारतालाही महागात पडू शकतं. त्यामुळेच भारत या सामन्यामध्येही मोठ्या विजयासहीत उपांत्यफेरीत आपलं स्थान पक्क करण्याच्या निर्धारानेच मैदानात पाऊल ठेवेल.

Story img Loader