Pakistan Qualifies For T20 World Cup 2026: गेल्या आठवड्यात टी-20 विश्वचषकातुन पाकिस्तानचा संघ बाद झाला. सुरुवातीच्या सामन्यात, पाकिस्तानचा कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारताकडून पराभव झालाच पण त्यापूर्वी अमेरिकेने पाक संघाचा ऐतिहासिक व धक्कादायक पराभव केला. आयर्लंडच्या यूएस विरुद्धच्या विजयावर पाकिस्तानची या स्पर्धेत टिकून राहण्याची शक्यता अवलंबून होती, परंतु लॉडरहिलमधील हवामानामुळे एकही चेंडू टाकता आला नाही आणि सामना वाहून गेला परिणामी त्याच लाटेत पाकिस्तानच्या संघाची आशा सुद्धा बुडून गेली. साहजिकच या दयनीय स्थितीमुळे पाकिस्तानच्या संघावर सोशल मीडियावरील नेटकरी, माजी खेळाडू, आजी- माजी प्रशिक्षक सर्वांकडून टीका होत आहे. पुन्हा एकदा बाबर आझमच्या राजीनाम्याची सुद्धा मागणी होत आहे. याच दरम्यान एका नव्या मुद्द्याने क्रिकेटप्रेमींचे लक्ष वेधून घेतले आहे. पाकिस्तानचा माजी खेळाडू, रावळपिंडी एक्सस्प्रेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शोएब अख्तरचा एक दावा खोटा ठरवून पाकिस्तान थेट २०२६ च्या टी २० विश्वचषकासाठी पात्र झाला आहे. हे समीकरण काय, सविस्तर जाणून घ्या..

यूएसए विरुद्धच्या सुपर ओव्हरमधील पराभवानंतर, पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने पुढील T20 विश्वचषक स्पर्धेत भाग घेण्यासाठी पाकिस्तान संघाला पात्रता फेरीतून जावे लागेल असे सुचवून वादाला तोंड फोडले होते. बाबर आझम आणि संघाला सुपर आठच्या शर्यतीत स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी भारताला पराभूत करण्याची नितांत गरज आहे, तरच ते २०२६ मधील टी २० विश्वचषकात स्वतःसाठी स्थान कायम ठेवू शकतील असेही अख्तर म्हणाला होता. पाकिस्तानला भारताला पराभूत करणे काही जमले नाहीच आणि ते गट टप्प्यातून बाहेर सुद्धा पडले पण तरीही २०२६ च्या विश्वचषकातून त्यांना वगळण्यात येणार नाही.

Australia Beat Pakistan by 29 Runs in 7 Over Game PAK vs AUS 1dt T20I Gabba Glenn Maxwell Fiery Inning
AUS vs PAK: ७ षटकांच्या सामन्यातही पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव, ऑस्ट्रेलियाच्या विजयात मॅक्सवेलची स्फोटक खेळी
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
KL Rahul Statement on Sanjiv Goenka Animated Chat in IPL 2024 loss Said Wasn’t the nicest thing Ahead
KL Rahul: “मैदानावर जे काही घडलं ते फार चांगलं…”, संजीव गोयंका भर मैदानात भडकल्याच्या घटनेवर केएल राहुलने पहिल्यांदाच केलं वक्तव्य
shahbaz sharif government approves bill to extend army chief service tenure in pakistan
विश्लेषण : पाकिस्तानात शरीफ सरकारचा आत्मघातकी निर्णय… लष्करप्रमुखांचा कार्यकाळ दहा वर्षे… भारताची डोकेदुखी वाढणार?
Mohammad Rizwan Says I am only a captain for toss and presentation
Mohammad Rizwan : ‘मी फक्त टॉस आणि प्रेझेंटेशनसाठी कर्णधार…’, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ऐतिहासिक विजयानंतर मोहम्मद रिझवानचे मोठे वक्तव्य
Champions Trophy Mohammed Hafeez Big Statement About India wont travel to Pakistan Said Somehow Not Secure for India
Champions Trophy: “भारतीय संघासाठी पाकिस्तान सुरक्षित नाही…”, पाकिस्तानच्या माजी खेळाडूच्या पोस्टने उडाली खळबळ, PCBला दाखवला आरसा
Champions Trophy Javed Miandad Angry on India for Not Travelling Pakistan Said If We Dont Play India at all Pakistan cricket will Prosper
Champions Trophy: “भारत-पाकिस्तान सामनाच नाही झाला तर…”, टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी येणार नसल्याने BCCI, ICCवर संतापले जावेद मियांदाद

२०२६ च्या T20 विश्वचषकासाठी पाकिस्तान का व कसा झाला पात्र?

पाकिस्तानला २०२६ च्या टी २० विश्वचषकात मिळालेले स्थान हे स्पर्धेच्या काही मूळ नियमांना धरून आहे. या नियमांनुसार, २० सहभागी संघांपैकी १२ संघांना थेट प्रवेश मिळतो. सह-यजमान म्हणून, भारत आणि श्रीलंका हे तर स्पर्धेत असतीलच तसेच सध्याच्या विश्वचषकात सुपर ८ टप्प्यापर्यंत पोहोचणारे संघ पुढील वर्षीसाठी थेट पात्र होतात.

अ गटातून सुपर आठमध्ये पोहोचलेल्या भारताने हे निकष पूर्ण केले आहेत. त्याचप्रमाणे दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश (गट डी), वेस्ट इंडिज आणि अफगाणिस्तान (गट क), ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (गट बी), आणि यूएसए (गट अ) यांनी सुपर आठमध्ये व परिणामी २०२६ च्या विश्वचषकात आपले स्थान पक्के केले आहे.

हे ही वाचा<< “मला रंगांधळा म्हणत त्यांनी..”, सौरभ नेत्रावळकरने सांगितला भारत सोडण्याआधीचा किस्सा; म्हणाला, “दोन वर्षं मागितली..” 

सुपर आठमधील उर्वरित तीन स्पॉट्स ३० जून २०२४ रोजीच्या आयसीसी पुरुषांच्या टी २० क्रमवारीच्या आधारे निर्धारित केल्या जातील. सुपर आठमधील संघांव्यतिरिक्त क्रमवारीतील तीन सर्वोत्कृष्ट संघांची थेट निवड होईल. या यादीत सध्या न्यूझीलंड (सहाव्या), पाकिस्तान (सातव्या), आणि आयर्लंड (अकराव्या) यांचा समावेश आहे. त्यामुळे पाकिस्तान यंदा टी २० विश्वचषकातून बाहेर पडला असला तरी २०२६ मध्ये पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करण्याची संधी त्यांना मिळणार आहे. या व्यतिरिक्त इतर आठ जागा प्रादेशिक पात्रता फेरीद्वारे निश्चित केल्या जातील.