Why Indian Bowlers Failed in IND vs ENG: टी २० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत इंग्लंडकडून टीम इंडियाचा दहा गडी राखून दारुण पराभव झाला. संपूर्ण विश्वचषकात गट सामन्यात टॉपला राहिलेल्या रोहित शर्माच्या संघाला हा एक पराभव खूपच जिव्हारी लागणारा ठरला. या सामन्यातील भारताच्या खेळावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माने संघ तणावात होता व प्रेशरमध्ये चुका होत गेल्या असे स्पष्टीकरण देताच यावरूनही अनेक माजी खेळाडूंनी टीका केली आहे. पाकिस्तानचे माजी वेगवान गोलंदाज वकार युनिस व वसीम अक्रम यांनी भारतीयांच्या वाईट खेळासाठी आयपीएलला दोष दिला आहे. गोलंदाजांवर टीका करताना आयपीएलमध्ये दिल्या जाणाऱ्या मानधनावरही वसीम अक्रम यांनी प्रश्न केले आहेत.
A स्पोर्ट्सवर चर्चेत वसीम अक्रम म्हणाले की, “आशिया चषकादरम्यान मी भारतीय गोलंदाजांचे निरीक्षण करत होतो, तेव्हा ही गोष्ट लक्षात आली की आयपीएलनंतर वेगवान गोलंदाजांचा वेग कमी होतो.” “उदाहरणार्थ, आवेश खान 145 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करत होता परंतु आयपीएलच्या एका हंगामानंतर ते 130-135 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करू लागला. बीसीसीआयने यामागचे कारण तपासायला हवे.
तसेच अक्रम यांनी यावेळी आयपीएलमध्ये मिळणाऱ्या मानधनावरही टीका केली, आयपीएलमध्ये खेळाडूंसाठी मानधनावर मर्यादा असायला हवी जेणेकरून त्यांना भूक काय आहे हे लक्षात येईल. जर मी पाकिस्तानमध्ये महिन्याला २४ कोटी रुपये कमावले असते तर मी फार मेहनत घेण्याचा प्रयत्नच केला नसता. आम्ही ज्या (खेळाच्या) संस्कृतीमधून आलो आहोत त्यानुसार आम्ही खेळाला हलक्यात घेऊच शकत नाही.
आयपीएलचे पैसे कमी करा मग…
.. तर पाकिस्तान होणार मालामाल! World Cup जिंकल्यास मिळणार ‘इतके’ कोटी; भारताला काय मिळालं पाहा
वसीम अक्रम यांनी भारतीय गोलंदाजांच्या वेग कमी होण्याबाबत चिंता व्यक्त करताना म्हंटले की, आम्ही जेव्हा कसोटी सामने खेळत होतो तेव्हा आघाडीच्या गोलंदाजना विश्रांती दिली जात होती मात्र तरीही इम्रान खानने त्याच्या सर्व शक्तीनिशी चार षटके पूर्ण केली, मलाही तसेच करण्यात सांगण्यात आले,याचा फायदा असा झाला की, जेव्हा तुम्ही थकलेले असता तेव्हा तुम्ही तुमची सर्व शक्ती जलद गोलंदाजी करण्यासाठी वापरता, तुम्ही तुमचा वेग वाढवता कारण त्यामुळे तुमचे स्नायू मजबूत होतात. तुम्ही जितकी जास्त गोलंदाजी कराल तितका वेग वाढतो.
पण आजकाल गोलंदाजांना वाटते की मला १८ चेंडू टाकायचे आहेत आणि माझं काम झालं, अशा समजुतींमुळेच योग्य हवा तास परिणाम दिसून येत नाही.