AUS vs BAN Match Updates: टी-२० विश्वचषक २०२४ मधील सुपर८ च्या सामन्यात ऑस्ट्रेलिया वि बांगलादेशचे संघ आमनेसामने आहेत. या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत बांगलादेश संघाला २० षटकांत केवळ १४० धावांवर रोखले. ऑस्ट्रेलियासाठी पॅट कमिन्सने गोलंदाजीत ऐतिहासिक कामगिरी केली ज्यात त्याने ४ षटकांत २९ धावा देत ३ विकेट घेत हॅटट्रिक देखील घेतली. यासह कमिन्स टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात हॅट्ट्रिक घेणारा ७वा गोलंदाज ठरला आहे.
या सामन्यात बांगलादेशच्या फलंदाजांनी सर्वांना निराश केले, त्यात ऑस्ट्रेलियासाठी डावातील १८वे षटक टाकण्यासाठी आलेल्या पॅट कमिन्सने या षटकाच्या पाचव्या चेंडूवर महमुदुल्लाला अवघ्या २ धावांवर बाद केले. यानंतर या षटकातील शेवटच्या चेंडूवर कमिन्सने मेहदीला गोल्डन डकवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. अठराव्या षटकातील अखेरच्या दोन्ही चेंडूवर विकेट्स घेतल्याने कमिन्स पुढच्या षटकात हॅटट्रिकवर होता.
हेही वाचा – T20 WC 2024: टीम इंडियाने पार केली ‘अफगाण खिंड’; सूर्यकुमार यादवची अर्धशतकी खेळी ठरली निर्णायक
कमिन्सने यानंतर डावाच्या शेवटच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर तौहिद ह्रदयची विकेट घेत या सामन्यात आपली हॅटट्रिक पूर्ण केली. पॅट कमिन्स आता टी-२० विश्वचषकात हॅट्ट्रिक घेणारा दुसरा ऑस्ट्रेलियन गोलंदाज ठरला आहे, यापूर्वी ब्रेट लीने २००७ च्या टी-२० विश्वचषकात हॅटट्रिक घेतली होती आणि तीही बांगलादेशविरुद्धच्या सामन्यातच घेतली होती.
या सामन्यात कमिन्सने चार षटकांत २९ धावा देत ३ विकेट घेतले. पॅट कमिन्स सध्या जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे. असे असूनही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्याची ही पहिली हॅट्ट्रिक आहे. ३१ वर्षीय कमिन्सने ६२ कसोटी, ८८ वनडे आणि ५५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
हेही वाचा – IND vs AFG सामन्यात भारतीय संघ हातावर काळी पट्टी बांधून का उतरला? BCCI ने सांगितलं नेमकं कारण
???-????? ??? ???????!?#PatCummins becomes only the second Australian after Brett Lee to claim a hattrick in T20 World Cup.
— Star Sports (@StarSportsIndia) June 21, 2024
The Australian star has light up Super Contest of the ????? ? with three key wickets. ?#AUSvBAN | LIVE NOW |… pic.twitter.com/JD1JlSHgwP
T20 विश्वचषकाच्या इतिहासात हॅट्ट्रिक घेणारे गोलंदाज
ब्रेट ली – विरुद्ध बांगलादेश (केप टाउन, २००७)
कुर्तिस कॅम्फर – विरुद्ध नेदरलँड्स (अबू धाबी, २०२१)
वानिंदू हसरंगा – विरुद्ध दक्षिण आफ्रिका (शारजाह, वर्ष २०२१)
कागिसो रबाडा – विरुद्ध इंग्लंड (शारजाह, २०२१)
कार्तिक मयप्पन – विरुद्ध श्रीलंका (गीलॉन्ग, २०२२)
जोशुआ लिटल – वि न्यूझीलंड (ॲडलेड, २०२२)
पॅट कमिन्स – विरुद्ध बांगलादेश (अँटिगा, २०२४)