Pat Cummins Big Statement About Virat Fans : विराट कोहली हा क्रिकेट जगतातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. त्याने आपल्या फलंदाजीने जगाला प्रभावित केले आहे. सचिन तेंडुलकरनंतर किंग कोहलीचा क्रिकेटमध्ये मोठा दबदबा पाहिला मिळत आहे. सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलो केल्या जाणाऱ्या खेळाडूंमध्ये विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर आहे. यामुळेच विराटवर टीका करणाऱ्याला चाहत्यांकडून ट्रोलिंगला सामोरे जावे लागते. याचे ताजे उदाहरण म्हणजे गौतम गंभीर आणि नवीन उल हक. आता पॅट कमिन्सला पण विराटवर टीका करणे महागात पडले आहे, ज्याबद्दल त्याने स्वत: सांगितले आहे. यानंतर तो विराटच्या चाहत्यांच्या निशाण्यावर आला आहे.
कमिन्स काय म्हणाले?
३५ वर्षीय विराट कोहली हा जगातील सर्वाधिक फॉलोअर्सच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. कोहलीच्या पुढे ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी आहेत. त्यामुळे कोहलीबद्दल कोणताही चाहता किंवा क्रिकेटपटू विचित्र विधान केल्यास तो चाहत्यांच्या निशाण्यावर येतो. आता ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सचा अशाच एका घटनेबाबतचा एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये कमिन्स सांगतो की त्याने एकदा कोहलीबद्दल वक्तव्य केले होते, जे विराटच्या चाहत्यानंतर आवडले नव्हते. त्यानंतर विराटच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर खळबळ उडवली होती.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओनुसार, पॅट कमिन्स विराट कोहलीबद्दल एका मुलाखतीत म्हणताना दिसत आहे की, “जर तुम्ही सोशल मीडियावर राहत असाल तर तुम्हाला नक्कीच त्रास होतो. विराट कोहलीबद्दल काही बोललात तर येणारा काळ लक्षात ठेवा. मला आठवतं की मी काही वर्षांपूर्वी काहीतरी बोललो होतो आणि खरं तर ते विराट कोहलीचे कौतुक होते. मी म्हणालो होतो की कोहली ‘गन प्लेयर’ आहे आणि आशा आहे की तो आमच्याविरुद्ध शतक करू शकणार नाही. पण ६ महिन्यांनंतर जेव्हा त्याने शतक झळकावले तेव्हा सोशल मीडियावर खळबळ उडाली होती. कारण विराट कोहलीचे सर्वच्या सर्व चाहते बेरोजगार आहे.”
सध्या विराट कोहली आणि पॅट कमिन्स आपापल्या संघांचे टी-२० विश्वचषकात प्रतिनिधित्व करण्यासाठी अमेरिकेत पोहोचले आहे. स्टार फलंदाज विराट कोहली ५ जूनला आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाकडून खेळताना दिसणार आहे, तर कमिन्स ५ जूनला ओमानविरुद्ध ऑस्ट्रेलियाकडून खेळताना दिसणार आहे.