Team India T20 World Cup 2024 Victory Parade Updates, 4 July 2024 : आयसीसी टी२० विश्वचषक विजेता भारतीय क्रिकेट संघाच्या स्वागतासाठी वानखेडे स्टेडिअम ते मरीन ड्राईव्हपर्यंत विराट महासागर जमा झाला आहे. या जनसमुदायाचं नियंत्रण करण्याचं मोठं आव्हान मुंबई पोलिसांसमोर आहे. रोड शोमुळे मुंबईच्या इतर रस्त्यांवरही वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. परिणामी मुंबईकरांनी आता मरिन ड्राईव्हच्या दिशेने न येण्याचं आवाहन मुंबई पोलिसांनी केलं आहे.

भारतीय टी-२० विश्वचषक विजेता संघ आज भारतात परतला आहे. २९ जून रोजी झालेल्या विजेतेपदाच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव करत भारताने १७ वर्षांनंतर टी-२० विश्वचषकाचे जेतेपद पटकावले. या विजयानंतर भारतीय संघ वादळामुळे काही दिवस बार्बाडोसमध्ये अडकला होता. बीसीसीआय आणि बीसीसीआयचे सचिव जय शाह यांच्या सर्वोत्तम प्रयत्नांमुळे भारतीय संघ चार्टर्ड फ्लॅटद्वारे आज दिल्लीत पोहोचला. टीम इंडियाचे मोठ्या उत्साहात स्वागत होत आहे आहे. टीम इंडिया मुंबईत परतली असून मरिन ड्राईव्हवर ते वानखेडे स्टेडिअम रोड शो करण्यात येणार आहे.

हेही वाचा >> VIDEO : खेळाडू असावा तर असा! ज्या वानखेडेवर चाहत्यांनी हिणवलं आज त्याच मैदानावर हार्दिकच्या नावाचा जयघोष!

“भारतीय क्रिकेट संघाच्या विजय यात्रेसाठी वानखेडे स्टेडियम व आजूबाजूला परिसरात चाहत्यांची प्रचंड गर्दी झाली असून नागरिकांना विनंती आहे की त्यांनी मरीन ड्राईव्हच्या दिशेने जाणे टाळावे”, अशी सोशल मीडिया पोस्ट मुंबई पोलिसांनी केली आहे. तसंच, त्यांनी मरीन ड्राईव्हवरील विराट व्हिडिओही शेअर केला आहे.

हेही वाचा >> VIDEO : खेळाडू असावा तर असा! ज्या वानखेडेवर चाहत्यांनी हिणवलं आज त्याच मैदानावर हार्दिकच्या नावाचा जयघोष!

भारतीय क्रिकेट संघाने १७ वर्षांनंतर टी-२० विश्वचषक आणि १३ वर्षांनंतर आयसीसी स्पर्धा जिंकली आहे. विजयाचा हा आनंद साजरा करण्यासाठी आज मरीन ड्राईव्ह ते वानखेडे मैदानापर्यंत विजयी मिरवणूक काढण्यात येणार आहे. २००७ रोजी भारताने पहिलाच टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतरदेखील मरीन ड्राईव्ह ते वानखेडे अशी मिरवणूक काढली गेली होती. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील संघाचे स्वागत मुंबईकरांनी मोठ्या जल्लोषात केले होते. रोहित शर्मा त्या संघाचाही भाग होता आणि आजच्या जगज्जेत्या संघाचा तो कर्णधार आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही याबाबत पोस्ट केली आहे. ते म्हणाले, “आयसीसी टी२० विश्वचषक विजेता भारतीय क्रिकेट संघाच्या स्वागतासाठी जमलेल्या क्रिकेट प्रेमींच्या गर्दींचे संनियत्रण करण्याचे मुंबई पोलीस आयुक्तांना निर्देश दिले आहेत. विजयवीर संघाच्या स्वागतासाठी वानखेडे स्टेडियम तसेच नरीमन पॉईंट ते स्टेडियम दरम्यान, मरिन ड्राईव्ह या परिसरात मोठी गर्दी झाली आहे. या गर्दीमुळे वाहतुक विस्कळीत होऊ नये तसेच जमलेल्या क्रिकेट प्रेमींचीही गैरसोय होऊ नये याकडे मुंबई पोलीस दल आणि संबंधित यंत्रणांनी लक्ष पुरवावे, अनुषांगिक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना दुरध्वनीद्वारे दिल्या आहेत.”

“मला आमच्या नागरिकांना विनंती करायची आहे की गर्दी मोठ्या प्रमाणात झाली आहे. उत्साह देखील मोठा आहे. या उत्साहात सर्वांनी योग्य ती काळजी घेतली पाहिजे. प्रशासन आणि पोलिसांनी योग्य बंदोबस्त केला आहे. त्याला जनतेने सहकार्य करावं, अशी विनंती जनतेला करतो. एक भारतीय म्हणून मला देखील अतिशय आनंद आहे भारताने विश्वविजयी ट्रॉफी जिंकली आहे. टीम आपल्या मुंबईत आली आहे, मी त्यांचं मनापासून स्वागत करतो”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.