T20 World Cup 2024, IND vs SA Final : रोहित शर्माचे निग्रही, निःस्वार्थी नेतृ्त्व, जसप्रीत बुमराची गोलंदाजी, हार्दिक-सूर्या-अक्षर-अर्शदीपसारख्या गुणी क्रिकेटपटूंचे योगदान, विराट कोहलीची मोक्याच्या क्षणी केलेली अमूल्य खेळी या सर्वांच्या जोडीला जिंकण्याविषयीची दुर्दम्य आत्मविश्वास यामुळे बार्बाडोसमध्ये शनिवारी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत भारताने विजय खणून काढला. भारताला ट्वेन्टी-२० प्रकारातील दुसरे जगज्जेतेपद मिळाले आहे. भारताच्या या ऐतिसाहिक दमदार कामगिरीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीम इंडियाशी संवाद साधला आहे.

“भारतीय क्रिकेट संघाशी संवाद साधला आणि T20 विश्वचषकातील त्यांच्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले. त्यांनी संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट कौशल्य आणि उत्साह दाखवला. प्रत्येक खेळाडूची बांधिलकी खूप प्रेरणादायी आहे”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

विराट कोहलीबद्दल काय म्हणाले नरेंद्र मोदी?

“तुझं उत्कृष्ट व्यक्तिमत्व आहे. तुझी आक्रमक खेळी, फलंदाजी आणि कर्णधारपद यामुळे भारतीय संघाला नवा आयाम मिळाला आहे. तुझी T20 कारकीर्द कायम लक्षात राहील. आज तुझ्याशी आधी बोलून आनंद झाला”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

नरेंद्र मोदींनी विराट कोहलीचंही केलं कौतुक

“तुझ्याशी बोलून आनंद झाला. फायनलमधील डावांप्रमाणेच तुझी भारतीय फलंदाजी शानदारपणे आहे. तू खेळाच्या सर्व प्रकारांमध्ये चमकला आहेस. T20 क्रिकेटमध्ये तुझी कायम आठवण येईल. पण मला विश्वास आहे की तू नवीन पिढीच्या खेळाडूंना प्रेरित करत राहशील”, असं मोदी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल द्रविडचंही केलं कौतुक

“राहुल द्रविड यांच्या अतुलनीय कोचिंगमुळे भारतीय क्रिकेट टीम यशाच्या शिखरावर पोहोचली आहे. राहुल द्रविड यांचं अतूट समर्पण, धोरणात्मक अंतदृष्टी, योग्य प्रतिभा यामुळे संघाचा कायापालट झाला आहे. त्यांच्या योगदानाबद्दल आणि पिढ्यांना प्रेरणा देणाऱ्यासाठी भारत त्यांचा आभारी आहे. त्याला विश्वचषक जिंकताना पाहून आम्हाला आनंद होत आहे”, असं म्हणत मोदींनी राहुल द्रविड यांचे आभार मानले.

भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव करत दुसऱ्यांदा विश्वचषकावर नाव कोरलं आहे. या विजयाबरोबरच भारताने १० वर्षांचा आयसीसी ट्रॉफिचा दुष्काळ संपवला आहे. सूर्यकुमार यादवचा अखेरच्या षटकातील झेल आणि जसप्रीत बुमराहच्या भेदक गोलंदाजीसह भारत टी-२० चॅम्पियन ठरला. भारताच्या या दमदार कामगिरीनंतर कालच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टीम इंडियाचं अभिनंदन करण्याकरता काल पोस्ट केली होती.

काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

“भारतीय संघाला मिळालेल्या भव्य विजयासाठी मी संपूर्ण देशवासियांकडून त्यांचं अभिनंदन करतो. १४० कोटी देशातील जनतेला त्यांच्यावर गर्व आहे. हा एक ऐतिहासिक विजय आहे. भारतीय संघाने विश्वचषक जिंकण्याबरोबरच संपूर्ण देशवासियांची मने जिंकली आहेत”, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान मोदी यांनी काल दिली होती. तसेच “हा विश्वचषक एका विशेष कारणामुळेही लक्षात ठेवला जाईल. ते म्हणजे या स्पर्धेत इतके सगळे देश सहभागी झाले होते. मात्र, भारतीय संघाचा एकाही सामन्यात पराभव झाला नाही. संपूर्ण स्पर्धेत अजेय राहणं ही छोटी गोष्ट नाही”, असेही ते म्हणाले होते.

हेही वाचा >> IND vs SA Final: “मुंबईचा राजा रोहित शर्मा”, मरीन ड्राईव्हवरील जल्लोषाचा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल! नेटिझन्स म्हणतात…

दरम्यान, शेवटच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या रोमहर्षक सामन्यात टीम इंडियाने १४० कोटी भारतीयांचे स्वप्न साकारले. सामन्यातील अखेरच्या षटकात हार्दिक पंड्याने दमदार गोलंदाजी केली. भारताला विजयासाठी ६ षटकांत १६ धावांची गरज होती. तर मैदानात मिलर आणि केशव महाराजची जोडी होती. हार्दिकने फुलटॉस चेंडू टाकला जो मिलरने जोरदार फटका लगावला पण सीमारेषेवर उभा असलेल्या सूर्याने आश्चर्यकारक झेल टिपला आणि भारताच्या दिशेने सामना फिरवला.