स्पेनचा महान टेनिसपटू राफेल नदाल पुढील आठवड्यात होणाऱ्या पॅरिस मास्टर्स टेनिस स्पर्धेतून कोर्टवर परतणार आहे. त्याचे प्रशिक्षक कार्लोस मोया यांनी वरील माहिती दिली. दुखापतींसह नदालने यंदाचे १४वे फ्रेंच ओपन विजेतेपद जिंकले आणि पोटाच्या समस्येमुळे तो विम्बल्डनमधून बाहेर पडला. नदालने सप्टेंबरमध्ये सांगितले होते की त्याला खेळातील काही गोष्टी दुरुस्त करण्याची गरज आहे म्हणून तो पुन्हा कधी खेळेल याची चाहत्यांना खात्री वाटत नव्हती. विक्रमी २२ ग्रँडस्लॅम जेतेपदे जिंकणाऱ्या नदालने विम्बल्डनमधून माघार घेण्यापूर्वी गेल्या महिन्यात लेव्हर चषकात दुहेरीच्या सामन्यात रॉजर फेडररसोबत सामना खेळला होता. त्याने ८ ऑक्टोबर रोजी पत्नी मेरी पेरेलोसोबत आपल्या पहिल्या मुलाच्या जन्मासाठी सुट्टी घेतली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पॅरिस मास्टर्सनं शुक्रवारी पॅलेस ऑम्निस्पोर्ट्स डी पॅरिस-बर्सी येथे ३१ ऑक्टोबरपासून सुरू होणार्‍या २०२२ स्पर्धेचा ड्रॉ जाहीर केला. दरम्यान, वेळा ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावणारा स्पेनचा राफेल नदाल  या स्पर्धेतून पुनरागमन करणार आहे. यूएस ओपनमधून बाहेर पडल्यानंतर स्पर्धात्मक टेनिसमधील ही त्याची पहिलीच स्पर्धा असेल. या ड्रॉमध्ये नोवाक जोकोविच देखील असेल, ज्यानं या महिन्याच्या सुरुवातीला दोन विजेतेपदे जिंकली आहेत. सध्याच्या जागतिक क्रमवारीत स्पेनचा टेनिसपटू कार्लोस अल्काराझ अव्वल स्थानी आहे.

यूएस खुल्या टेनिस स्पर्धेच्या टॉप-१६ फेरीत फ्रान्सिस टियाफोकडून पराभूत झाल्यानंतर, त्याने सांगितले की त्याला “खेळातील काही चुका सुधारायच्या आहेत त्यामुळे तो थोडा वेळ खेळातून विश्रांती घेणार आहे.” मानसिक स्थिती सुधारण्यासाठी देखील हे आवश्यक आहे. फ्रेंच ओपनच्या पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात जागतिक स्पेनच्या राफेल नदालनं जागतिक क्रमवारीत ८ क्रमांकाच्या नॉर्वेजियन कॅस्पर रुडचा पराभव केला. या विजयासह राफेल नदालनं चौदाव्यांदा फ्रेंच ओपनचं विजेतेपद जिंकलं. तर, २२वं ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावलं.

हेही वाचा :   T20 World Cup: केएलच्या जागी ऋषभ पंत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सलामीला खेळणार? फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांचे मोठे विधान

नदालनं २००५, २००६, २००७, २००८, २०१०, २०११, २०१२, २०१३, २०१४, २०१७, २०१८, २०१९, २०२०, २०२२ मध्ये असं १४ वेळा फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकली आहे. तर, २००९ आणि २०२२ ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकली.  याशिवाय, त्यानं २००८ आणि २०१० मध्ये वम्बिलडन आणि  २०१०, २०१३, २०१७, २०१९ मध्ये यूएस खुल्या टेनिस स्पर्धेचा खिताब जिंकला आहे.