Rahul Dravid T20 World Cup 2024 Celebration: भारतीय संघ विश्वविजेता ठरला असून आयसीसी टी-२० विश्वचषकाचे जेतेपद पटकावले आहे. अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा अवघ्या ७ धावांनी पराभव करत जेतेपद आपल्या नावे केले. अशारितीने भारताने १७ वर्षांनंतर टी-२० मध्ये आयसीसीचे जेतेपद पटकावले. अखेर १० वर्षांनंतर टीम इंडियाने फायनल जिंकून जगातील अळ्वल संघ असल्याचे सिद्ध केले. या सामन्यात संपूर्ण भारतीय संघाने चमकदार कामगिरी केली. विराट कोहली, अर्शदीप सिंग, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या यांनी चमकदार कामगिरी केली. पण यानंतर ट्रॉफी स्वीकारल्यानंतर भारतीय संघासह राहुल द्रविड यांनी भन्नाट सेलिब्रेशन केले.
सामना जिंकल्यानंतर भारतीय संघाच्या सर्वच खेळाडूंच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले. भारतीय संघाने विजय मिळवल्यानंतर मेडल स्वीकारले आणि त्यानंतर जय शाह यांच्या हस्ते कर्णधार रोहितने टी-२० विश्वचषकाची ट्रॉफी स्वीकारली. यानंतर खेळाडूंनी एकच जल्लोष केला. नंतर सर्वांनी राहुल द्रविड यांना बोलावले आणि द्रविड यांच्या हातात ट्रॉफी दिली. द्रविड यांनी ट्रॉफी घेताच असं काही सेलिब्रेशन केलं की विराट कोहली आणि इतर खेळाडूंनाही लाजवेल. राहुल द्रविडने अक्षरश: सिंहगर्जना करत या विजयाचे सेलिब्रेशन केले. कायम शांत, संयमी असलेल्या राहिल द्रविडचा हा अवतार पाहून सगळेच अवाक् झाले.
हेही वाचा – T20 World Cup 2024: भारत ठरला विश्वविजेता, सूर्यकुमार यादवचा झेल आणि जसप्रीत बुमराहचे षटक ठरला टर्निंग पॉईंट
Rahul Dravid showing emotion.Ive seen it all. pic.twitter.com/rdaC3JqoKX
— R? (@findgoddd) June 29, 2024
Never expected idhi #RahulDravid ?❤️
— Harsha… (@harshatweets03) June 29, 2024
pic.twitter.com/n7o3Ffa83O
राहुल द्रविडच्या कार्यकाळात भारतीय संघाने आशिया चषक जिंकला, पण एकही आयसीसी ट्रॉफी जिंकता आली नाही. राहुल द्रविडच्या मुख्य प्रशिक्षकाच्या कार्यकाळात, टीम इंडियाने ३ आयसीसी स्पर्धांमध्ये भाग घेतला (टी-२० विश्वचषक २०२४ वगळता). या कालावधीत भारतीय संघाने दोनदा अंतिम फेरी गाठली होती, पण विजेतेपदापासून दूर राहिले. पण आता संघाने जेतेपद पटकावत राहुल द्रविडला एक उत्तम अलविदा केला आहे. टी-२० विश्वचषक २०२४ मधील अंतिम सामना राहुल द्रविड यांच्यासाठी भारताचे प्रशिक्षक म्हणून अखेरचा सामना होता.