Rahul Dravid not re applying for coaching post : वेस्ट इंडिज-अमेरिकेत आयोजित ट्वेन्टी२० वर्ल्डकप प्रशिक्षक म्हणून माझी शेवटची स्पर्धा असेल असं राहुल द्रविड यांनी स्पष्ट केलं आहे. द्रविड भारतीय प्रशिक्षकपदासाठी पुन्हा अर्ज करतील अशी अटकळ होती पण त्यांनी स्वत:च शर्यतीत नसल्याचं स्पष्ट केलं आहे. ते संध्या भारतीय संघासोबत शेवटचे विश्वचषकात सहभागी झाले आहेत. जिथे भारताला आपला पहिला सामना ५ जानेवारीला आयर्लंडविरुद्ध खेळायचा आहे.

राहुल द्रविड म्हणाले प्रत्येक स्पर्धा महत्त्वाची असते. मी ज्या ज्या सामन्यात भारतीय संघाचा प्रशिक्षक म्हणून काम पाहिलं तो महत्त्वाचाच होता. ही प्रशिक्षक म्हणून माझ्यासाठी शेवटची स्पर्धा आहे. पण त्याने माझ्या दृष्टिकोनात बदल होणार नाही. मला हे काम आवडतं. भारताचा प्रशिक्षक म्हणून काम करताना मला प्रचंड आनंद आणि समाधान मिळालं. प्रशिक्षकपद हा मोठा बहुमान आहे. या संघाबरोबर काम करणं अतिशय आनंददायी होतं. सगळेच खेळाडू प्रतिभाशाली आहेत.

IND vs BAN Ravichandran Ashwin praise T Dilip
VIDEO : अश्विनने भारताच्या क्षेत्ररक्षण प्रशिक्षकांबद्दल सांगितला मजेशीर किस्सा; म्हणाला, ‘इंटरनेटवर जेव्हा त्यांचे नाव सर्च केले…’
china biggest dam in the world
चीनमधील ‘या’ अवाढव्य धरणामुळे पृथ्वीचा वेग मंदावला? धरणाचा…
R Ashwin opinion on coaches Rahul Dravid and Gautam Gambhir
द्रविडच्या शैलीत शिस्त, तर गंभीर अधिक निश्चिंत!
Fake blood donation by bjp leader
भाजपा नेत्याची चमकोगिरी; मोदींच्या वाढदिवसानिमित्त केलं बोगस रक्तदान, व्हिडीओ व्हायरल होताच म्हणाले…
Morne Morkel Favourite Indian Food
Morne Morkel : टीम इंडियाच्या मॉर्केल गुरुजींना कोणते भारतीय पदार्थ आवडतात? पाहा VIDEO
Vinesh Phogat slams PT Usha
Vinesh Phogat on PT Usha: “पीटी उषा यांनी गुपचूप फोटो घेतला आणि त्यानंतर राजकारण…”, विनेश फोगटचा मोठा आरोप
Danish Kaneria Statement on Gautam Gambhir about Pakistan Cricket
‘पाकिस्तानला गौतम गंभीरसारख्या कणखर प्रशिक्षकाची गरज…’, दानिश कनेरियाचे वक्तव्य; म्हणाला, तो मागे न बोलता समोरच…
teacher gave reply after the student wished him a Happy Teacher's Day
“शिक्षक जोमात, विद्यार्थी कोमात…” विद्यार्थ्याने शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्यानंतर शिक्षकाने दिलं भन्नाट उत्तर; व्हॉट्सॲप चॅट VIRAL

आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं वेळापत्रक अतिशय व्यग्र आहे. कौटुंबिक आघाडीवर माझ्यावर जबाबदारी आहे. ते पाहता हे दोन्ही एकाचवेळी सांभाळणं कठीण आहे. त्यामुळे मी प्रशिक्षकपदासाठी पुन्हा अर्ज करणार नाही. यात काहीही अनोखं नाही. मी जेव्हापासून ही जबाबदारी स्वीकारली, तेव्हापासून प्रत्येक सामना तितकाच महत्त्वाचा आहे.

हेही वाचा – Sri Lanka vs South Africa : दक्षिण आफ्रिकेची श्रीलंकेवर सरशी; नॉर्किए, रबाडाचा प्रभावी मारा

भारतीय संघ सातत्याने चांगला खेळत आहे. ऑस्ट्रेलियात झालेल्या ट्वेन्टी२० सामन्यात संघाने सेमी फायनलपर्यंत वाटचाल केली होती. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्येही आम्ही अंतिम फेरी गाठली. भारतात झालेल्या २०२३ वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाने दिमाखदार कामगिरी करत अंतिम फेरी गाठली होती. आम्ही चांगलं खेळत या वर्ल्डकपमध्ये जेतेपद पटकावू. वातावरण आणि खेळपट्टी यांचा अंदाज घेणं आवश्यक आहे. भारतीय संघाचे जगभर प्रचंड चाहते आहेत.