IND vs CAN T20 World Cup Match: भारत आणि कॅनडामध्ये प्रथमच क्रिकेट सामना खेळवला जाणार होता. पण फ्लोरिडामधील सततच्या पावासामुळे सामना रद्द करण्यात आला. भारतीय संघ पहिले तीन सामने जिंकत सुपर८साठी क्वालिफाय झाला होता. तर कॅनडाचा संघ स्पर्धेतून बाहेर झाला होता. पण कॅनडाच्या संघाला टी-२० चॅम्पियन संघाविरूद्ध खेळण्याची मोठी संधी होती ती अपूर्णच राहिली. फ्लोरिडाचे मैदान ओले राहिल्याने हा सामना अखेरीस रद्द करण्यात आला. या सामन्यानंतर भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी कॅनडाच्या ड्रेसिंग रूमला अचानक भेट दिली. ज्याचा व्हीडिओ आयसीसीने शेअर केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

द्रविड यांनी कॅनडा संघाला भेट देत त्यांचे कौतुक केले. २००३ मध्ये स्कॉटलंडमध्ये खेळतानाचा एक किस्सा त्यांना यावेळेस आठवला आणि त्यांनी सांगितले की सहयोगी राष्ट्र म्हणून खेळण्याच्या संघातील संघर्षांचा उल्लेख केला. उल्लेखनीय म्हणजे, द्रविडने स्कॉटलंडसाठी त्यांच्या राष्ट्रीय क्रिकेट लीगमध्ये ११ एकदिवसीय सामने खेळले. कॅनडा संघातील खेळाडूंशी बोलताना द्रविड म्हणाले, “खूप धन्यवाद. या स्पर्धेत तुम्ही दिलेल्या अप्रतिम योगदानाचे कौतुक आहे. मला वाटते की हा खेळ खेळण्यासाठी तुम्हा सर्वांना ज्या संघर्ष आणि आव्हानांना सामोरे जावे लागेल ते आपल्या सर्वांना माहित आहे.”

हेही वाचा – IND vs CAN सामना रद्द झाल्याने सुनील गावसकर ICC वर भडकले, म्हणाले; “मॅच खेळवूच नका…”

कॅनडा संघातील खेळाडूंचं द्रविड यांनी केले कौतुक

पुढे द्रविड म्हणाले, “हे सोपं नाहीय. स्कॉटलंडमध्ये २००३ मध्ये क्रिकेट खेळलो होतो. त्यामुळे मला माहित आहे की सहयोगी देशांसाठी खेळण्यासाठी किती संघर्ष आहे. पण म्हणून तुम्ही लोक आम्हा सर्वांसाठी खरोखरच प्रेरणा आहात, ज्यांनी या खेळावर त्यांच खरंच किती प्रेम आहे, हे दाखवून दिले. तुम्ही या स्पर्धेत खेळण्यासाठी ज्या प्रकारचा त्याग करण्यास तयार आहात, ते कौतुकास्पद आहे. मी हेच सांगेन की तुम्ही तुमच्या देशातील तरुण मुला-मुलींना क्रिकेट खेळण्यासाठी अधिक प्रेरणा देत आहात. जे जागतिक क्रिकेटसाठी खूप चांगले आहे.”

हेही वाचा – IND vs CAN: पाऊस नसतानाही का रद्द झाला भारत वि कॅनडा सामना? जाणून घ्या कारण

हेही वाचा – ‘क्रिकेटमध्ये सेक्स ही अत्यंत सामान्य गोष्ट…’, अभिषेक नायरचे मुलाखतीत मोठे वक्तव्य, म्हणाला; “एवढं दडपण असतं की…”

कॅनडाच्या खेळाडूंनीही साईन केलेली जर्सी राहुल द्रविड यांना संघाने भेट म्हणून दिली. कॅनडाने चारपैकी एका सामन्यांत आयर्लंडविरुद्ध एकहाती विजय मिळवून गुणतालिकेत तिसरे स्थान पटकावले. अ गटात चौथ्या स्थानावर असलेल्या पाकिस्तानला फ्लोरिडामध्ये रविवारी आयर्लंडविरुद्ध अखेरचा सामना खेळायचा आहे. तर भारतीय संघ सुपर८ चे सामने खेळण्यासाठी वेस्ट इंडिजला रवाना झाला आहे. भारताचा पुढील सामना आता २० तारखेला अफगाणिस्तानविरूद्ध होणार आहे.

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul dravid surprises canada by entering dressing room after ind vs can match washout watch video t20 world cup 2024 bdg