Rashid Khan Creates History: टी-२० विश्वचषक २०२४ च्या मध्ये अफगाणिस्तान संघाने बलाढ्य न्यूझीलंड संघाचा पराभव करत मोठा उलटफेर केला. अफगाणिस्तानने न्यूझीलंडचा ८४ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव करत सर्वांनाच चकित केले. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात अफगाणिस्तानचा न्यूझीलंडविरुद्धचा हा पहिला विजय ठरला. कर्णधार रशीद खानने या ऐतिहासिक विजयात महत्त्वाची भूमिका बजावत इतिहास रचला. रशीद या कामगिरीसह मोठी कामगिरी करणारा टी-२० मधील पहिला कर्णधार ठरला आहे.

टी-२० विश्वचषकातील १४ व्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने २० षटकांत ६ गडी गमावून १५९ धावा केल्या होत्या, त्यानंतर न्यूझीलंडचा संघ ७५ धावांत गारद झाला. टी-२० विश्वचषकात अफगाणिस्तानने पहिल्यांदाच न्यूझीलंडचा पराभव केला आहे. एकीकडे रशीदने ४ विकेट घेतल्या, तर दुसरीकडे फजलहक फारुकीनेही ४ विकेट घेण्यात यश मिळविले. गोलंदाजांशिवाय अफगाणिस्तानच्या फलंदाजांनीही शानदार फलंदाजी केली, रहमानउल्ला गुरबाजने ५६ चेंडूंत ५ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ८० धावा केल्या, तर इब्राहिम झद्रानने ४१ चेंडूंत ३ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ४४ धावा केल्या. या दोघांच्या भागीदारीने अफगाणिस्तानने चांगली धावसंख्या उभारली.

maharashtra vidhan sabha election 2024 sudhir mungantiwar vs santosh singh Rawat Ballarpur Assembly constituency
लक्षवेधी लढत : मुनगंटीवार यांच्यासमोर कडवे आव्हान
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Australia Beat Pakistan by 29 Runs in 7 Over Game PAK vs AUS 1dt T20I Gabba Glenn Maxwell Fiery Inning
AUS vs PAK: ७ षटकांच्या सामन्यातही पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव, ऑस्ट्रेलियाच्या विजयात मॅक्सवेलची स्फोटक खेळी
Sanju Samson reach 39th position in ICC T20I rankings
Sanju Samson : संजू सॅमसनची आयसीसी टी-२० क्रमवारीत मोठी झेप! सलग दोन सामन्यात शतक झळकावत पटकावले ‘हे’ स्थान
Mohammad Rizwan Says I am only a captain for toss and presentation
Mohammad Rizwan : ‘मी फक्त टॉस आणि प्रेझेंटेशनसाठी कर्णधार…’, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ऐतिहासिक विजयानंतर मोहम्मद रिझवानचे मोठे वक्तव्य
Afghanistan Batter Rahmanullah Gurbaj Surpasses Virat Kohli in Youngest to 8 Hundreds in Mens ODI Equals Sachin Tendulkar Record
AFG vs BAN: अफगाणिस्तानच्या फलंदाजाची ऐतिहासिक कामगिरी, विराट कोहलीला मागे टाकलं तर सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची केली बरोबरी
Sanju Samson broke Yusuf Pathan's 15-year-old record
IND vs SA : संजू सॅमसनने सलग दोन शतकांनंतर केला नकोसा विक्रम, ‘या’ बाबतीत युसूफ-रोहितला टाकले मागे
smriti irani in Vasai Assembly constituency for Maharashtra Assembly Election 2024
वसईची परिस्थिती जैसे थे; स्मृती इराणी, महायुतीच्या प्रचारासाठी वसईत सभा

हेही वाचा – बाबर आझमला इंग्रजीत विचारलेला प्रश्नच कळला नाही, पाकिस्तानच्या कर्णधाराचं उत्तर ऐकाल तर… VIDEO व्हायरल

कर्णधार रशीद खानने भेदक गोलंदाजी करत न्यूझीलंडविरुद्ध टी-२० मध्ये पहिला विजय नोंदवला. या सामन्यात अफगाणिस्तानचा कर्णधार रशीद खानने आपल्या उत्कृष्ट गोलंदाजीने १७ वर्ष जुना विक्रम मोडीत काढला. सामन्यादरम्यान, रशीदने ४ षटकांत केवळ १७ धावा देत चार महत्त्वपूर्ण विकेट घेतल्या आणि टी-२० विश्वचषकात सर्वोत्तम गोलंदाजी करणारा पहिला कर्णधार ठरला.

रशीदने न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्यात १७ धावा देत ४ विकेट्स घेत न्यूझीलंडचा माजी कर्णधार डॅनियल व्हिटोरीचा विक्रम मोडला आहे. रशीदने किवी संघाच्या कर्णधाराचा विक्रम त्याच्या संघाविरूद्ध मोडला आहे. न्यूझीलंडच्या दिग्गज फिरकीपटूने २००७ मध्ये झालेल्या टी-२० विश्वचषकाच्या पहिल्याच सत्रात भारताविरुद्ध २० धावांत चार विकेट घेतल्या होत्या. आता या यादीत रशीद खानचे नाव पहिल्या क्रमांकावर आले आहे.

टी-२० विश्वचषकातील कर्णधाराची सर्वोत्तम गोलंदाजी
४/१७ – रशीद खान विरुद्ध न्यूझीलंड, २०२४*
४/२० – डॅनियल व्हिटोरी विरुद्ध भारत, २००७
४/२० – झीशान मकसूद वि पापुआ न्यु गिनी, २०२१

अफगाणिस्तानकडून रशीद खानसह गोलंदाज फजलहक फारुकीनेही ४ विकेट्स घेतल्या आहेत. फजलहकने सुद्धा १७ धावा देत ४ विकेट्स आपल्या नावे केल्या. यासह वर्ल्डकपच्या एकाच डावात प्रत्येकी ४ विकेट्स घेणारे दोन गोलंदाजांच्या यादीत अफगाणिस्तानच्या या दोन गोलंदाजांनी आपले नाव नोंदवले आहे.

हेही वाचा – T20 WC 2024: विल्यमसनला अफगाणिस्तानविरूद्ध पराभवाची आधीच होती कल्पना? सामन्यापूर्वी म्हणाला होता….

टी-२० विश्वचषकाच्या एका डावात ४ विकेट घेणारे दोन गोलंदाज
उमर गुल (४/२५) आणि शाहिद आफ्रिदी (४/१९) विरुद्ध स्कॉटलंड, २००७
मुजीब रहमान (५/२०) आणि रशीद खान (४/९) विरुद्ध स्कॉटलंड, २०२१
फजलहक फारुकी (४/१७) आणि रशीद खान (४/१७) विरुद्ध न्यूझीलंड, २०२४*